शिराळा एसटी बसस्थानक मुंबईकर प्रवाशांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार.

 शिराळा एसटी बसस्थानक मुंबईकर प्रवाशांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार.

शिराळा - प्रतिनिधी.

शिराळा तालुक्यातील प्रवाशांची मागणी आणि प्रतिसादानुसार स्लीपर सीटर, शिवशाही, शिवनेरी आदी अद्ययावत गाड्यांची सोय, तालुक्याच्या प्रत्येक कोप-यातून करणार असल्याची ग्वाही शिराळा बसस्थानक प्रशासनाने आज, शिराळा तालुका प्रवासी संघाच्या शिष्टमंडळास दिली.

याप्रसंगी मुंबईकर प्रवाशांच्या प्रश्नांसोबतच शिराळा तालुकाअंतर्गत प्रवासी वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, नवीन रूट निवडणे आदी विषयांवर सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली. भविष्यात सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, कष्टकरी प्रवाशांच्या अडीअडचणी समजावून घेऊन, प्रवाशांची व्यापक जनजागृती करणे आणि एसटी वाहतूक अधिकाधिक सक्षम करणे आदी बाबतीत सकारात्मक विचारविनिमय झाला. सर्वसामान्य, शेवटचा प्रवासी केंद्रस्थानी ठेवून, एकमताने वाटचाल करण्याचा इरादा शिराळा एसटी प्रशासन, मा. कर्मचारी वर्ग आणि शिराळा तालुका प्रवासी संघाने व्यक्त केला आहे.


यावेळी आगार व्यवस्थापिका विद्या कदम, वाहतुक नियंत्रक आदिनाथ हुंडूरगे, सद्दाम मुल्ला-वाहतुक नियंत्रक, सहाय्यक वाहतुक नियंत्रक मिलिंद कुंभार, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक  अजितकुमार घोसारडे, मा. एसटी कर्मचारीवर्ग, सचिन पाटील, सुधीर पाटील, अमर पाटील, महादेव रोकडे,विश्वजित यादव, मारूती रोकडे, प्रसाद पाटील, अमोल पाटील, कैलास देसाई आदी उपस्थितीत होते.


"शिराळा तालुक्यातील मुंबईकर प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेऊन, एसटी प्रशासन सर्व सोयींनी युक्त अशा अद्ययावत गाड्यांची सोय करेल. याकरिता प्रवाशांची जनजागृती करण्याकरिता व्यापक मोहिम आखली जाईल. मुंबईकर प्रवाशांनी या सर्व सकारात्मक बदलांना चांगला प्रतिसाद देणे अत्यंत आवश्यक आहे."

- श्रीमती विद्या कदम, आगार व्यवस्थापक, रा.प. शिराळा



"शिराळा तालुक्यातील मुंबईकर प्रवासी तसेच तालुकाअंतर्गत प्रवाशांच्या हितासाठी, शिराळा तालुका प्रवासी संघ सातत्याने प्रयत्नशील राहील. एसटी प्रशासन, कर्मचारी वर्ग आणि प्रवाशांनी संघटीत लोकचळवळ उभारल्यास प्रवाशांचे तसेच एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट सुधारण्यास मदत होणार आहे."

- अमोल वि. पाटील, समन्वयक- शिराळा तालुका प्रवासी संघ

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .