मिरज येथील शास्त्री चौक मध्ये भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा अर्धकृती पुतळा बसवून संबधित हेटाळणी करणाऱ्या आस्थापनावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन.

मिरज येथील शास्त्री चौक मध्ये भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा अर्धकृती पुतळा बसवून संबधित हेटाळणी करणाऱ्या आस्थापनावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन.

मिरज - प्रतिनिधी.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज शहरातील शास्त्री चौक मधील गेल्या एक - दीड वर्षा पूर्वी शास्त्री चौक सुशोभिकरण करण्याचे काम सुरू आहे. सदर चौकात सेवासदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या आस्थापणाला काम करण्यास दिले आहे. सदर सुशोभिकरण करत असताना सदर आस्थापना ला भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्यापेक्षा आपल्या आस्थापनाचे प्रसिद्धी महत्वाची वाटत आहे. सदर जागेत या आस्थापनाने फक्त स्वतः च्या नावाची स्टेनलेस स्टील मधील डिझाईन व नाव लावून आपली प्रसिद्धी केली आहे व भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा अर्धकृती पुतळा अद्यापपर्यंत बसविण्यात आलेला नाही. दरवर्षी प्रमाणे येत्या २ ऑक्टोबर ला माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. तरी वंचित बहुजन आघाडीकडून आमची मागणी आहे की, येत्या ३० सप्टेंबर पर्यंत शास्त्री चौक, मिरज येथे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण करावे व त्याच बरोबर माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा न बसवता फक्त स्वतच्या  जाहिरात बाजी कडे लक्ष देणाऱ्या   आस्थापना विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे सुशोभिकरण करण्याचे काम काढून घ्यावे व त्याची लावण्यात आलेली प्रसिद्धी सामग्री काढून टाकण्यात यावी. अन्यथा आम्ही १ ऑक्टोबरला त्या आस्थापना व  महानगरपालिकेच्या संबधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी करिता तीव्र आंदोलन छेडू असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. यावेळी सांगली जिल्हा महासचिव (दक्षिण) उमर फारूक ककमरी, मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .