उंडाळे येथील सार्वजनिक गणेश मंडळांचा महत्वपूर्ण निर्णय.

 उंडाळे येथील सार्वजनिक गणेश मंडळांचा महत्वपूर्ण निर्णय.



उंडाळे - गोंडवाना न्युज 

   उंडाळे ता.कराड येथील सार्वजनिक गणेश मंडळानी या वर्षी होणाऱ्या मुर्ती स्थापना न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना पार्श्वभूमीवर रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, उंडाळे येथील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांची नवनिर्वाचित तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील व उंडाळे गावचे पोलीस पाटील निवास पाटिल यांनी मिंटिग बोलवुन कोरोना पार्श्वभूमीवर गावातील गणेश मंडळानी या वर्षी सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापना न करता होणारी गर्दी व अनुषंगाने होणारे कोरोना संक्रमण याचे नियंत्रण करण्यासाठी चालू वर्षी गणेश मुर्ती स्थापना न करण्याबाबत आवाहन केले. त्यास प्रतिसाद म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या  निर्णयात नवनिर्वाचित तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व उंडाळे गावचे पोलीस पाटील तसेच सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी  महत्वपूर्ण भूमिका बजावली. उंडाळे गावातील सार्वजनिक गणेश मंडळानी घेतलेल्या या निर्णयाचे उंडाळे तसेच उंडाळे परिसरात कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .