जयश्री कुंभार यांना कराड तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त.

जयश्री कुंभार यांना कराड तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त.




कराड - प्रतिनिधी 
भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमत्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्वाचा दुवा असतो. दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. 
याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरेगाव ता. कराड येथील प्राथमिक शाळेचे आदर्श उपक्रमशील शिक्षिका जयश्री अरुण कुंभार यांना स्व.यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले . जयश्री कुंभार यांचे मुळगाव कराड तालुक्यातील तळबीड आहे. त्या गेली 27 वर्ष शैक्षणिक सेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्यांनी आतापर्यंत त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या स्कॉलरशिप व नवोदय स्पर्धा परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र केले आहेत. मॅडम च्या बाबतीत सांगायचे झाली तर स्पर्धा परीक्षा या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त आहेत . आत्तापर्यंत त्यांच्या या सेवा कालामध्ये नवोदय साठी सात विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती साठी आठ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस व सातारा जिल्हा परिषद सदस्य अँड.उदयसिंह पाटील दादा , जि.प. सदस्य प्रदीप पाटील, शिक्षण, अर्थ व क्रीडा समिती जि.प. साताराचे सभापती मानसिंगराव जगदाळे , कराड पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटशिक्षण अधिकारी शबनम मुजावर ,प्रा. गणपतराव कणसे, यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .