आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न.

 आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  सत्कार समारंभ  संपन्न.

' प्रशांतकुमार पाटील व माणिकराव दिवे यांचा भव्य नागरी सत्कार.'

कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)

सागाव (ता. शिराळा) : येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू श्री. प्रशांतकुमार पाटील यांनी आज (ता. २६) सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने त्यांचा व सागावचे सुपुत्र व मंत्रालयात अप्पर सचिव पदावर कार्यरत असणारे माणिकराव दिवे यांचा सत्कार समारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी आमदार नाईक, कुलगुरू पाटील, अप्पर सचिव दिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्तविक उपसरपंच सत्यजीत पाटील यांनी केले. कार्यक्रमास विश्वासचे संचालक मानसिंग पाटील, सरपंच तात्यासो पाटील, उपसरपंच सत्यजीत पाटील, वारणा बँकेचे संचालक बळीदाजी पाटील, माजी सरपंच रामचंद्र संकपाळ, दूध संघाचे संचालक सदाशिव संकपाळ व बबन पाटील, जयसिंग पाटील, तालुक्याचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, प्रा. बाळासो लाडगावकर, माजी पोलीस उप निरीक्षक वसंत बागल, चिकूर्डेचे माजी उपसरपंच श्रीनिवास बागल, बाबासो पाटील, सुशांत पाटील, शिवाजी माने, जितेंद्र देशमुख आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उदयसिंह पाटील यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .