शिराळा तालुका काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ : नामदार विश्वजित कदम.
शिराळा तालुका काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ : नामदार विश्वजित कदम.
शिराळा - प्रतिनिधी.
शिराळा तालुका काँग्रेस कमिटीची मंत्री विश्वजीत कदम व नूतन काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार श्री.विक्रम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नागमणी विश्रामगृह येथे बैठक पार पडली.यावेळी प्रदेश कार्यकारिणीतील श्री.नंदकुमार शेळके,श्री.विनय कांबळे,श्री.नंदकुमार कुंभार,तालुका कार्यकारणी व गावोगावचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
यावेळी बोलताना नामदार कदम यांनी वाकुर्डे पाणीप्रश्न, चांदोली अभयारण्य वन्यश्वापदापासून होत असलेला नागरिकांना त्रास, पूर हानी व इतर अनेक प्रश्न मार्गी लावून काँग्रेस मजबूत करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाध्यक्ष आमदार सावंत यांनी तालुक्याच्या प्रश्नावर विशेष बैठकीचे आयोजन करून पक्ष बळकट करण्याचे आश्वासन दिले.
तालुका काँग्रेस कमिटी कडून तालुक्यातील राजकीय सामाजिक सद्य परिस्थितीची माहिती देऊन पक्षबांधणीसाठी वरिष्ठांकडून आवश्यक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तालुका संघटक श्री तुकाराम चव्हाण, भटवाडी यांनी मोरणा, चांदोली धरण,शिराळा एसटी डेपो,अनेक रस्ते,पूल याची उभारणी करून कै.भगवानराव पाटील यांनी रोड मॅप तयार केला, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अध्यक्षांनी वकिलीची फी खर्च करून तालुका काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त करून दिली असल्याचे सांगितले,श्री सुनील घोलप चिंचोली यांनी शासकीय योजनांच्या कार्यवाही मध्ये गरीब वंचितांना लाभ मिळाला पाहिजे याकरता आग्रही मागणी केली,श्री यशवंत पाटील मनदुर यांनी पुर हाणी आणि अभयारण्य परिसरातील गावांच्या व्यथा मांडल्या,श्री सयाजी पाटील अंत्रि खुर्द व श्री संपत पाटील पाचुंब्री यांनी तालुक्याने अर्धा भाग धरणासाठी अर्पण करून उत्तर भाग कोरडा ठणठणीत असल्याने संघर्षाची भूमिका घेतल्यास श्रेष्ठींनी पाठिंबा देण्याची भूमिका मांडली,श्री कादर नायकवडी चरण यांनी डावा कॅनॉल गळतीने होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय योजनांची मागणी केली, श्री राजाभाऊ चरणकर यांनी चरण येथे नदीघाट दुरुस्तीची मागणी केली तर श्री रविंद्र कोकाटे मांगले, श्री विकास साळुंखे निगडी यांनी पक्ष बळकटीसाठी ताकद देण्याचे आवाहन केले,श्री पोपट कदम व श्री राजेंद्र माने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांची गरजूंची कामे त्वरित होण्याबद्दल तसेच नवीन विकास कामांची मागणी केली.
यावेळी शिराळा तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी चरण येथील श्री संजय नायकवडी तर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी निगडी येथील सौ अलका साळुंखे यांना पाहुण्यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे देण्यात आली.
नामदार कदम व जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनामुळे तालुका काँग्रेसला चांगली ताकद मिळाल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली. आभार सेवादल अध्यक्ष श्री सर्जेराव कोकाटे सर यांनी मांडले.
Comments
Post a Comment