साळशिरंबे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी धनाजीराव पाटील.

 साळशिरंबे गावच्या तंटामुक्ती यामध्ये अध्यक्षपदी धनाजीराव पाटील.

     


उंडाळे - प्रतिनिधी,

  साळशिरंबे गावचे सामाजिक कार्यकर्ते स्व. विलासरावजी उंडाळकर यांचे विश्वासू निकटवर्तीय माजी मंडल अधिकारी श्री.धनाजीराव पाटील यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.गावात कोणतेही पद नसतानासुद्धा विकासकामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,गावातील तंटे सामोपचाराने मिटवण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.याबद्दल यांचे माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण(बाबा)व रयत सहकारी कारखान्याचे चेअरमन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.एड.उदयसिंह पाटील उंडाळकर (दादा)यांनी त्यांचे अभिनंदन केले,उपाध्यक्ष धनाजी चवरे,सचिव अमोल पाटील यांची निवड करण्यात आली,यावेळी गावातील तुकाराम पाटील पं स सदस्य ,सरपंच कुंभार मॅडम,  उपसरपंच अभिजित चवरे,  रमेश पाटील ,पै.तात्या पाटील,पै.तानाजी चवरे,जालिंदर देशमुख,ज्ञानेश्वर कुंभार,उत्तम पाटील,दिलीप मोहिते,ग्रामसेवक श्री. शरद चव्हाण, कृषी अधिकारी श्री.बाबा तोरणे,ग्रामपंचायत सदस्य,सद्दाम मुल्ला, शकुर मुल्ला, श्री.दिपक पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य,विकास सेवा सोसायटी चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ,सर्व ग्रामस्थ या सर्वांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .