शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा यांना दिले निवेदन.
शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा यांना दिले निवेदन.
शिराळा शहरातील मुख्य बाजारपेठ शेतक-यांना शेतमाल विक्री करण्यासाठी जागा मिळणेबाबत.
शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे .)
शिराळा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवार पेठेत, बाजारादिवशी शेतक-यांना मालविक्री करण्यासाठी जागा मिळणेबाबत अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. पंचक्रोशीतील कष्टकरी, शेतक-यांचे जागेअभावी हाल सुरू आहेत. सदर विषयाबाबत, आम्ही समस्त युवकांनी 'शेतक-यांकरिता संपूर्ण बाजारपेठेत मधली लाईन (जागा) आरक्षित व्हावी', आवाज उठविला होता.
आज यासंदर्भात सविस्तर निवेदन, शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, मा. सौ. सुनिता राजेंद्र निकम व प्रशासनास सादर करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्षा व नगरपंचायत प्रशासनाने ' बाजारादिवशी शेतक-यांसाठी संपूर्ण मुख्य बाजारपेठेतील मधली लाईन (जागा) आरक्षित करण्याची स्पष्टपणे ग्वाही दिलेली आहे.' शेतमालाची विक्री करणा-या शेतक-यांकरिता महत्त्वाच्या असणा-या या निर्णयाची, येत्या सोमवारपासून कार्यवाही करण्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
याप्रसंगी लालासाहेब शिंदे (सरकार), कुलदीप निकम (काका),कैलास देसाई, राहुल खबाले, नितेश निकम, तुषार यादव, सुमित निकम,अविनाश निकम, अजिंक्य पाटील, राहुल निकम फौजी, आदिनाथ इंगवले, सत्यम पोटे, यश इंगवले आदि उपस्थित होते.
Comments
Post a Comment