Posts

Showing posts from August, 2023

मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट.

Image
मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमती २०० रुपयांनी कमी करत ओनम तसेच राखी पोर्णिमेच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशभरातील भगिनींना मोठे गिफ्ट दिले आहे. नव्या किमती आज बुधवारपासून लागू होणार आहेत. सोबतच उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत ७५ लाख मोफत नवे गॅस कनेक्शन मिळणार आहे. वापरकर्त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. त्यासाठी सरकारला ७६८० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील माहिती मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिली.   

भाषिक कौशल्ये यशस्वी होण्याची स्वप्ने पूर्ण करतात.

Image
  भाषिक कौशल्ये यशस्वी होण्याची स्वप्ने पूर्ण करतात. _________ प्रा. संभाजी देसाई. सातारा - प्रतिनिधी.          भाषा बोलता येते म्हणून बोलणे व हृदयातील भाव-भावना, विचार व सूचना प्रभावात्मक पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचविणे यांमध्ये फरक असतो. भाषा शिकताना ऐकणे, बोलणे व लिहिणे या क्रमाने शिकली तर भाषेची जाणं येणे सुलभ होते. रोजच्या व्यावहारिक जीवनात बोलण्यातील कौशल्ये यशस्वी होण्यास मदत करतात. भाषेच्या विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यातील वाचन , लेखन, चिंतन व संभाषणातील बारकावे माहित असणे आवश्यक आहे. कोणत्याही हाती घेतलेल्या कार्यावरील निष्ठा, श्रम व भाषिक कौशल्ये माणसाच्या यशस्वी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. असे विचार ब्राईट फ्युचर अकॅडमीचे संचालक प्रसिद्ध वक्ते प्रा. संभाजी देसाई यांनी व्यक्त केले. ते सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज मधील हिंदी विभागाच्या वतीने बी.ए. भाग -1 व एम. ए. भाग -1 च्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभा वेळी 'भाषा कौशल और जीवन शिक्षण' या विषयावर आयोजित विशेष...

दिव्यांगांसाठींच्या योजनांच्या माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.

Image
  दिव्यांगांसाठींच्या योजनांच्या माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.         सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : दिव्यांगांसाठी अनेकविध योजना शासन राबवित आहे. या योजनांच्या दिव्यांग व्यक्तींकरिता असलेल्या सवलती, सुविधा, लाभ दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी व याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद सांगलीच्या  जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या 0233-2372714 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dswozpsangli@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.  शासकीय संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण व प्रशिक्षण, स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या संस्थांमधून दिव्यांगांचे शिक्षण प्रशिक्षण, शालांत परिक्षा पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती, शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे, दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय, दिव्यांग कल्याण राज्य ...

कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारवाडी येथे ९१ लाखांचे रक्तचंदन जप्त.

Image
  कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारवाडी येथे ९१ लाखांचे रक्तचंदन जप्त. कासेगाव - प्रतिनिधी. कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केदारवाडी येथील जयकर तुकाराम पाटील यांच्या मालकीचे घरात युनुस भैय्या (पूर्ण नाव माहित नाही) व विजय बाळासाहेब तांबवे राहणार केदारवाडी ता- वाळवा, जि- सांगली दोघांनी दोन दिवसापूर्वी रक्तचंदन लाकडाचे ओंडके बेकायदेशीर प्रमाणे विक्री करण्याच्या उद्देशाने आणले आहेत अशी माहिती कासेगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली. कासेगाव पोलीस ठाणे व वन विभाग पथक यांच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात जयकर तुकाराम पाटील यांच्या घरात रक्तचंदनाचे एकूण  20 लाकडी ओंडके वजन 758.400 कि. ग्रॅ. सध्याचे बाजार भाव प्रमाणे मूल्य 9100800 रुपये एवढा मुद्देमाल मिळून आला. यासंदर्भात विजय बाळासाहेब तांबे राहणार केदारवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली यास ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपी यांचे विरुद्ध कासेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म घोगाव महाविद्यालयाच्या वतीने विविध आजाराबद्दल जनजागृती.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म घोगाव महाविद्यालयाच्या वतीने विविध आजाराबद्दल जनजागृती. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयाच्या वतीने बाळसिद्ध विद्यालय घोगाव या विद्यालयांमध्ये विविध आजारांबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी तेथील विद्यार्थ्यांना हार्टअटॅक, कॅन्सर, कोरोना, या आजारांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये आजारांची कारणे लक्षणे व औषध निर्माण शास्त्रांचा सहभाग, पोष्टिक आहार, आरोग्य व स्वच्छता  याविषयी माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.                        *********************************

संत रोहिदास विकास प्रतिष्ठान तर्फे यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संपन्न.

Image
  संत रोहिदास विकास प्रतिष्ठान तर्फे यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संपन्न.   उंडाळे  - प्रतिनिधी. मुलांना चांगले संस्कार देणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे  आश्या उगवत्या पिढीतील  तरुण युवा वर्गाला  प्रोसाहित करण्याचे यशस्वी कार्य सुरुवातीपासून उराशी बाळगणाऱ्या संत रोहिदास विकास प्रतिष्ठानचे विशेष अभिनंदन करावे वाटते असे व्याख्याते दत्तात्रय पवार यांनी कराड येथील संत  रोहिदास विकास प्रतिष्ठान आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कराड पोलीस अधिकारी अजय गोरड व्याख्याते व कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पवार गुरुजी ग्रामविकास अधिकारी श्रीकांत होलमुखी उपस्थित होते आजच्या स्पर्धात्मक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून आपलं अस्तित्व निर्माण करणे गरजेचे आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टीवर पाणी सोडण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे त्यांनी या वेळी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती पदव्या ग्रहण केल्या याचा पाढा वाचला त्यांनी देशासाठी जी घटना लिहिली ती जोपर्यंत सूर्य चंद्र असतील त...

विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : आमदार शिवेंद्रसिंहराजे.

Image
  विकासकामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर : आमदार शिवेंद्रसिंहराजे. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- सातारा- जावली मतदार संघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्या, गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असून याद्वारे सातारा व जावली तालुक्‍यातील एकूण 36 विकासकामे मार्गी लागणार आहेत. सातारा तालुक्‍यातील आरे तर्फ परळी येथील गोवर्धन नगरमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 20 लाख, नागेवाडी पंचशीलनगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरणासाठी 10 लाख, वर्ये बौद्ध वस्ती येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, गटर बांधण्यासाठी 10 लाख, काळोशी गंगावणे वस्ती येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी 15 लाख, शेंद्रे अण्णाभाऊ साठे येथे बंदिस्त गटर 15 लाख, शेंद्रे आंबेडकर नगर येथे समाजमंदिर दुरुस्ती 10 लाख, कुमठे गायकवाड वस्ती येथे आसनगाव- कुमठे- सातारा जोड रस्ता करणे 20 लाख, करंडी प्रशिक नगर येथे समाजमंदिर दुरुस्ती व पेव्हर बस...

उत्तरपत्रिकेचे चुकीचे मूल्यांकन विद्यार्थिनीची शिक्षण मंडळाला नोटीस.

Image
  उत्तरपत्रिकेचे चुकीचे मूल्यांकन विद्यार्थिनीची शिक्षण मंडळाला नोटीस. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- हुशार आणि मेहनती विद्यार्थी परीक्षेत मोठे यश मिळवण्यासाठी अभ्यास करून प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्यास चुकीचा निकाल होऊन त्या हुशार विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.असाच प्रकार नेवासा तालुक्यातील गीतांजली साळुंखे या विद्यार्थिनी बरोबर घडला आहे. या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाला पाच लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. भरपाई न दिल्यास फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शाळेत हुशार विद्यार्थिनी गीतांजली जनार्दन साळुंखे राहणार करजगाव तालुका नेवासा ही छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी असून इयत्ता दहावीला तिला कमी गुण मिळाल्याने ती विद्यालयात द्वितीय आली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे तिने भूगोल ,हिंदी व बीजगणित या तीन विषयांच्या उत्तर पत्रिकांच्या फोटोकॉपीची मागणी केली. त्या मिळाल्यानंतर गीतांजलीला भूगोल हिंदी व बीजगणित या विषयात बरोबर उत्तर लिह...

सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे 'नॅशनल आयकॉन'.

Image
  सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे 'नॅशनल आयकॉन'. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी 'भारतरत्न' तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने  'नॅशनल आयकॉन' म्हणुन नियुक्त केले आहे. बुधवारी नवी दिल्लीतील आकाशवाणी रंग भवन येथे भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढव‍िण्यासाठी तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक फायदा होण्याच्या दिशेने त्यांचे ईसीआयचे 'नॅशनल आयकॉन' होणे अधिक महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सचिन तेंडुलकर म्हणाले, भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरूणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प...

शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब आक्रमक शिक्षक दिनी काढणार मोर्चा .

Image
शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब  आक्रमक शिक्षक दिनी काढणार मोर्चा  . गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मागणीबाबत भाजप आमदार प्रशांत बंब  पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आमदार प्रशांत बंब हे येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा शिक्षक, शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार विरुद्ध आमदार प्रशांत बंब असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आमदार बंब यांनी शिक्षकांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाल्यानं मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचीही मोठी अडचण झालीय. विशेष म्हणजे 5 सप्टेंबर रोजीच्य मोर्चात पालकही सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी हाच मुद्दा विधानसभेत देखील मांडला होता. मुख्यालयाचा ठिकाणी राहत नसलेल्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी देखील आमदार बंब यांच्याकडून सतत केली जात आहे. त्यामुळ...

मुक्त विद्यापीठात विज्ञान पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी बनावट प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस.

Image
मुक्त विद्यापीठात विज्ञान पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी बनावट प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विज्ञान पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन (एमएलटी) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) या अभ्यासक्रमांना प्रवेशच न घेता बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दिलेल्या पदव्यांची नाशिक ग्रामीण पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या विद्यार्थ्यांमार्फत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. यात चार जणांनी नाशिक, अहमदनगर, अकोला, जळगाव, यवतमाळ, पनवेल, ठाणे, पालघर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी १३ विद्यार्थ्यांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी नगरमधील दोन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएलटी आणि डीएमएलटी या अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. तरीही, चार संशयित आरोपींनी २० विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाच्या नावाने बनावट गुणपत्रक, पदवी, पदविका तसेच विद्यापीठाच्या बनाव...

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था नागपूर या‎ संस्थेमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा समान पूर्वतयारीकरिता प्रशिक्षण.

Image
  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था नागपूर या‎ संस्थेमार्फत  मागास वर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा   पूर्वतयारीकरिता प्रशिक्षण. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या‎ संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त‎ जाती-भटक्या जमाती व विशेष मागास‎ प्रवर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकयुगात समान संधी प्राप्त व्हावी याकरिता परीक्षेची पूर्वतयारीकरिता प्रशिक्षण देण्यात येते. याचाच भाग म्हणून यंदा 2023-24 सालात इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) तसेच भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसीे)तर्फे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या‎ दोन शहरात एकूण 600 विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 21 स्पटेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विशेष म्हणजे, 6 महिने घेण्यात होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्...

सरकारी अधिकाऱ्यांना कोर्टात पाचारण करण्यास देशभर एकसमान मार्गदर्शक तत्वे .

Image
  सरकारी अधिकाऱ्यांना कोर्टात पाचारण करण्यास देशभर एकसमान  मार्गदर्शक तत्वे . गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- विविध खटल्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना कोर्टात पाचारण केले जाते. या संबंधात सर्व देशभर एकसमान पद्धतीने लागू होतील अशी मार्गदर्शक तत्वे आम्ही तयार करीत आहोत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, अनेक ठिकाणी कोर्टाने आदेश देऊनही संबंधीत सरकारी अधिकारी उपस्थित न राहू शकल्याने त्यांच्या वर कोर्टाचा अवमान केल्याच्या कारणावरून खटले गुदरले आहेत. त्या संबंधात आता विस्तृत मार्गदर्शक तत्वे निश्‍चीत केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे मांडू. प्रलंबित प्रकरणांचे विभाजन केले पाहिजे, ज्या प्रकरणांची सुनावणी पुर्ण झाली आहे, आणि ज्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे या बाबतीत हे विभाजन करून मार्गदर्शक तत्वे निश्‍चीत करावी लागतील. ज्यांची सुनावणी सुरू आहे अशा प्रकरणांमध्ये संबंधीत सरका...

सावंतवाडी ता-कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार.

Image
  सावंतवाडी ता-कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात  रेडकू ठार. उंडाळे - प्रतिनिधी.  सावंतवाडी (ता. कऱ्हाड) येथे  काल रात्री  बिबट्याने   संजय करमळकर यांच्या शेडमधुन शेडनेट बांधलेले तोडुन ४ महीन्याचे  रेडकू ठार केले. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांना आढळून येत आहे.  सावंतवाडी, खुडेवाडी, मनव, साळशिरंबे, नांदगाव, ओंड, उंडाळे संगम यासह परिसरात सातत्याने खाद्याच्या शोधात भटकत असल्याचे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत आहेत.         गत आठवड्यात    मनव येथील डांगे, दगडे वस्तीवर दोन शेळ्या फस्त केल्या होत्या.याशिवाय डांगे वस्तीवर कोंबड्या, पाळीव कुत्री व भटकी कुत्रीही ठार केली आहेत. संबंधित वन विभागाने या घटनेची दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांच्या कडून होत आहे.                             *********** साळशिरंबे तालुका कराड येथे श्वान शर्यत मैदान उत्साहात संपन्न.  

केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा.

Image
केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा शरद पवार यांची मागणी. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- कांद्यावरील निर्यातशुल्काच्या दर वाढीच्या बाबतीत आता शरद पवारांनी आपली भूमिका मांडली  आहे. केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी पवारांनी केली आहे. २४१० रुपयांचा दर शेतक-यांना परवडणारा नाही. यात त्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची भूमिका पवारांनी घेतली आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात शुल्कावर ४० टक्के कर लादल्याने नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी बंद आहे. खरेदी बंद असल्यामुळे कांदा तीनशे रुपयांनी घसरला आहे. कांद्याचा भाव २००० ते २४०० च्या दरम्यान आला आहे.                                                                   ******               ...

' मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र ' ला राष्ट्रीय पुरस्कार.

Image
  " मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र " ला राष्ट्रीय पुरस्कार. कराड - प्रतिनिधी.  ' मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र ' ला राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. हा पुरस्कार  शाहिद भगतसिंह यांचे पुतणे श्री करणंजीत सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हरिदास सेमिनार सभागृह, गया जी, बिहार येथे शहीद भगतसिंग युवा ब्रिगेडच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात रक्तदान या सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र ला राष्ट्रीय सन्मानाने  सन्मानित करण्यात आले.  शहीद भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग सिद्धू, बाबा कमल किशोर, गणेश पासवान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन सरचिटणीस संजय विनायक यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.  मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र  च्या वतीने संकेत साळुंखे यांनी बिहार गया येथे  हा सन्मान स्वीकारला. या राष्ट्रीय सत्कार समारंभात देशभरातील दीडशेहून अधिक रक्तदान संस्था चा सत्कार करण्यात आला. दुसरीकडे या सत्कार समारंभासाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून केवळ 4 संस्थाना आमंत्रित करण्यात आल...

गूळाचे गुणकारी फायदे.

Image
              गूळाचे गुणकारी फायदे. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- गुळ  आपल्या देशात नैसर्गिक गोड म्हणून ओळखला जातो. आजकाल तरुणांमध्ये गूळ फारसा लोकप्रिय नसला तरी आजच्या काळातही बरीच मंडळी आपल्या दिवसाची सुरुवात गुळापासून करतात. अनेकजण जेवणानंतर गूळ  खातात. गुळाचे सेवन शरीरासाठी  फायदेशीर आहे. हे शरीराला अनेक पोषक तत्वांनी समृद्ध ठेवते. यामुळेच लोकांना जेवणानंतर गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदे मिळतात . रोगप्रतिकारशक्ती वाढते  तुम्हाला शरीरात ऊर्जा भरून ठेवायची असेल, रोगप्रतिकारशक्ती मजबूत हवी असेल तर जेवणानंतर गूळ खावा. वजन कमी होते  वज न कमी करायचे असेल तर तुम्ही रोज गुळाचे सेवन करा. जेवणानंतर गूळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते, ती वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते. पचनसंस्था मजबूत होते  पचनक्रिया मजबूत करायची असेल तर त्याने रोज गुळाचे सेवन करावे. असे केल्याने गॅस, अपचन, मळमळ यासारख्या तक्रारी दूर होतात. रक्तदाब नियंत्रण राहतो.  जर तुम्हाला रक्तदाबाचा आ...

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभरटक्के खर्च करा - पालकमंत्री शंभूराज देसाई.

Image
  जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभरटक्के खर्च करा.                   - पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा दि.21 (जिमाका) : गतवर्षी जिल्हा सर्वसाधरणसाठी 411 कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला होता. 99.71 टक्के निधी यंत्रणांनी खर्च केला आहे. यावर्षीसाठी 460 कोटींचा आराखडा जिल्हा सर्वसाधारण योजनेचा असून हा निधी विहित मुदतीत यंत्रणांनी 100 टक्के खर्च करावा यासाठी आत्तापासून नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हा नियोजन समितची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये संपन्न झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अरुण लाड, शशिकांत शिंदे, महेश शिंदे, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, दूरदृष्यप्रणालीद्वारे जयकुमार गोरे, प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्या...

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर आता 40% शुल्क आकारले .

Image
  केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर आता 40% शुल्क आकारले .  गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- कांद्याच्या  किमतींना लगाम घालण्यासाठी तसेच देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 19 ऑगस्टपासून कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारले आहे. 31 डिसेंबर पर्यंत हे शुल्क आकारले जाणार आहे.  कांद्यामध्ये दरवाढ होण्याचे संकेत असल्याने शेतकरी सुखावला होता. शुल्क लादण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांद्यावर आकारण्यात आलेल्या निर्यात शुल्कामुळे काय होणार? केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर आता 40% शुल्क आकारले आहे. जगातील कांद्याचा मोठा निर्यातदार असणाऱ्या भारतातील शेतकऱ्यांना कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकायचा असेल तर त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. परिणामी, देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढेल. हा साठा वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फटका बसणार असल्याचे चित्र आहे. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतातील कांद्याची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 63 टक्क्यांनी वाढली आहे. 1.46 दशलक्ष मॅट्रिक टन एवढी नि...

आरोग्याकरता शेवग्याच्या शेंगाचे फायदे.

Image
  आरोग्याकरता शेवग्याच्या शेंगाचे  फायदे. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट - आजकाल बहुतांश घरात शेवगाच्या शेंगांचा वापर केला जातो. कधी याची आमटी बनवली जाते, तर सांबर बनवताना याचा वापर केला जातो. अनेक जण चवीने शेवगाच्या शेंगा खातात. शेवग्याच्या शेंगांना मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टीक (Drumstick)असेही म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगाचे आहारात सेवन केले तर शरीराला मोठा फायदा मिळतो. काय आहेत याचे फायदे? जाणून घेऊयात... गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर गरोदर महिलांकरता शेवगाच्या शेंगाचे मोठे महत्व आहे. यात कॅल्शियम चे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे गरोदर महिलेच्या शरीरात दुधाची पातळी नियंत्रीत राहते. शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, बी आणि खनिजे- लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात आणि त्या फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे हे सर्व गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही अनेकदा अपचन झाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. मात्र शेवगाच्या शेंगाचा वापर आहारात केल्यास पोटाच्या सर्व ...

पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर उपयुक्त.

Image
  पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर उपयुक्त                  - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे. पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरचीमधील वैद्यकीय शिबिरात 700 जणांची तपासणी व उपचार.           सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : प्रशिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना पोलिसांनी तंदुरुस्त असायला हवे. त्यासाठी वैद्यकीय शिबीर उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची व इंडियन मेडिकल असोसिएशन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तुरची  येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन, मिरजचे सचिव डॉ. जीवन माळी, डॉ. भास्कर प्राणी, प्राचार्य धीरज पाटील, उप प्राचार्य सर्वश्री उदय डुबल आणि सूरज घाटगे, राखीव पोलीस निरीक्षक आनंदा वरेकर आदिसह असोसिएशनचे पदाधिकारी, केंद्राचे प्रशिक्षक, आं...

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Image
  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. कोल्हापुर :- प्रतिनिधी.  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदीप भाऊ गवई,व तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर  जिल्ह्यातील पेठ वडगांव ( सोनार्ली वसाहत ) येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अंगणवाडी मध्ये शालेय वस्तू व गणवेश व शालेय बॅग वाटप करण्यात आले. तसेच कोल्हापुर जिल्हयातील तथागत ग्रुप हातकणंगले तालुक्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष पदी सूरज घोलप,तालुका उपाध्यक्ष प्रज्वल घोलप यांची निवड करण्यात आली.  यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष सचिन भाऊ लोखंडे, सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव भाऊ काळे,शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा भाऊ कांबळे,शिराळा तालुका उपाध्यक्ष विशाल साठे,महिला आघाडी शिराळा तालुका अध्यक्षा सौ. मीराताई कांबळे,शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष अक्षय फाळके, अंगणवाडी शिक्षिका सौ.नीलम लोखंडे,सौ.सोनाली गोटल,आदी तथागत ग्रुपचे समस्त प...

तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई याच्या हस्ते तथागत सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन.

Image
  तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई याच्या हस्ते तथागत सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन. शिराळा - प्रतिनिधी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदीप भाऊ गवई,व तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तथागत सार्वजनिक वाचनालयाचे मा.संदीप भाऊ गवई यांच्या हस्ते भव्य उदघाटन समारंभ सोहळा पार पडला.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनच्या परिसरामध्ये सर्वाच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.   यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई,तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश कांबळे,सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे,शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे,शिराळा तालुका उपाध्यक्ष विशाल साठे व महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता ताई बनसोडे (गवई),महिला आघाडी शिराळा तालुका अध्यक्षा मिरा ताई कांबळे,सरपंच शंकर पाटील,उपसरपंच सुषमा कांबळे, सेवासो...

अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन.

Image
  अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. राज्यभरात विविध पत्रकार संघटनांच्या वतीने आंदोलन .   कराड -प्रतिनिधी.  पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटनानी आज ठिकठिकाणी याबाबतचा निषेध नोंदवत आंदोलने केली सातारा जिल्हा अखिल मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील आज दुपारी १२ वाजता कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे याना याबाबत निषेध व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर कार्याध्यक्ष दिनकर थोरात सचिव अतुल होनकळसे तसेच  खंडू इंगळे संतोष शिंदे सौ प्रगती पिसाळ उपाध्यक्ष हरून मुलाणी सुहास पाटील विकास साळुंखे कैलास थोरवडे इलाही मुल्ला प्रकाश पिसाळ संतोष गुरव संकलेन मुलाणी अस्लम मुल्ला आदी पत्रकार उपस्थित होते.  पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येवती येथे मोठ्या उत्हासात संपन्न..

Image
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येवती येथे मोठ्या उत्साहात संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी.   जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येवती. ता. कराड आणि येवती विद्यालय येवती ता. कराड या दोन्ही शाळांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.  प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण  दिपक बाबूराव शेवाळे (शेठ)यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. येवती विद्यालय येवती या विद्यालयाचे ध्वजारोहण  सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी येवती गावातील तसेच हणमंतवाडी व कुंभारवाडा येथील विविध संस्थांचे पदाधिकारी 'ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी' विविध मंडळाचे कार्यकर्ते 'जेष्ठ नागरिक' दोन्ही शाळांचे माजी विद्यार्थी 'तरुण कार्यकर्ते आणि शिक्षण प्रेमी दानशूर मंडळी उपस्थित होते.  ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्राथमिक शाळा येवती च्या मैदानावर  सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी दिपक शेवाळे  अमोल झेंडे, प्रदीप पाटील,बाजीराव शेवाळे, विक्रम,आनंदा शेवाळे, दादासाहेब शेवाळे, मारुती शेवाळे, राहुल सोरटे ,अरुण मोरे ,अंकुश मोरे ,मारुती...

संजय विष्णू कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न.

Image
संजय विष्णू कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न. मुंबई -प्रतिनिधी.        इंग्रुळ गावचे सुपुत्र संजय विष्णू कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुंबई- बेस्ट मध्ये ३१ वर्ष सेवा करत असतानाच,  सामाजिक कार्यकर्ते तसेच बुद्ध, शिव, शाहू , फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारे, सहकारी म्हणून ओळख असणारे श्री. संजय कांबळे  यांचा सत्कार  मा. बाबासो कांबळे व मा. जगनाथ कांबळे यांनी केला.  मा. पोपट सवाखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संत्कार सोहळ्याला उपस्थित मा. पांङुरंग कांबळे, मा. सुदाम कांबळे  व सह मित्र परिवार उपस्थित होते. मा. बाबासो कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  सेवानिवृत्ती नंतर सर्वांनी आपल्या माय भुमीकडे लक्ष दिले पाहिजे, कुणाला शिक्षण घेण्यात मदत केली पाहिजे. ज्या गावच्या शाळेतुन शिकुन आपण मोठे झालो त्या शाळेसाठी काही तरी केले पाहिजे. या सर्व विषयांवरती चर्चा करण्यात आली.

बी.आर .एस .पी तर्फे चेंबूर पश्चिम येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.

Image
बी.आर .एस .पी तर्फे चेंबूर पश्चिम येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा. मुंबई -प्रतिनिधी. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चेंबूर यांच्या वतीने चेंबूर पश्चिम या ठिकाणी ७७ वा स्वातंत्र्य दिन पक्षाचे राष्ट्रिय महासचिव ॲड दिनेश राजभर यांच्या हस्ते तसेच मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझिम खेळून ध्वजारोहण करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना वही, स्थानिकांना मिठाई वाटून उत्साहात साजरा केला यावेळी विधानसभा अध्यक्ष सतेश मस्के, विधानसभा युवा अध्यक्ष मयूर आठवले,राजाराम आढाव,अभिजित कांबळे,चेतन रौराळे,जीवन बनसोडे, सुशांत आढाव, बापू चंदनशिवे, अमर भंडारे, मुमताज सय्यद इतर सहकारी उपस्थितीत होते.