कोरोनाच्या संकटामुळे कोडोली गावातील गोदडगिरी महाराजांचा भंडारा रद्द.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता. कराड येथे गोदडगिरी महाराजांची संजीवन समाधी असल्यामुळे हे गाव पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. गेले जवळजवळ शंभर वर्षापासून ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या गुरुवारी येथे भंडारा आयोजित करण्यात येतो. या भंडाऱ्या मध्ये मठाच्या आवारात भात ,आमटी बनवली जाते. सदर भंडाऱ्याचे सर्व साहित्य प्रत्येक घरांमधून गोळा केले जाते. व प्रत्येक घरातून सात भाकरी प्रमाणे भंडार्याच्या दिवशी मटामध्ये दिल्या जातात. विशेषता या महाप्रसादा मध्ये भात,आमटी व भाकरीचा समावेश केला जातो . या दिवशी गावांमध्ये चूल पेटत नाही .सर्व ग्रामस्थ मठाच्या आवारात एकत्र बसून हा महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात .



good job ...
ReplyDelete