Posts

Showing posts from 2023

स्वर्गीय जनार्दन पाटील (काका)यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सवलतीच्या दरात वस्तू वाटपास सुरुवात.

Image
  स्वर्गीय जनार्दन पाटील (काका)यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सवलतीच्या दरात वस्तू वाटपास सुरुवात. कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.) स्वर्गीय जनार्दन पाटील (काका)यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ व कै. शरद लाहीगडे (अण्णा) मित्र परिवार यांच्या विशेष प्रयत्नातून 50 % सवलतीच्या दरात आटा चक्की, सायकल, वॉटर पुरिफायर, एलईडी टीव्ही वाटप प्रारंभ मा. श्री.जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य. मा. श्री खंडेराव जाधव , मा.श्री.देवराज पाटील व मा.श्री.अतुल लाहीगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी स्वर्गीय जनार्दन पाटील काका यांच्यावरील जीवनपट " जनतेचा जननायक " याचे देखील प्रसारण  करणेत आले. मा.जयंत पाटील  यांनी जीवनपटाची मांडणी चांगल्या व योग्य पद्धतीने केली आहे, तसेच 50% सवलतीच्या दरात वस्तू वाटप चा लाभ सर्व स्तरातील लोकांना होईल असे गौरवोद्गार काढले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही नागरिकांना सायकल, आटा चक्की वाटप करणेत आले. यावेळी कासेगाव च्या लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पना गावडे, उपसरपंच सुजित पाटील, माजी सरपंच  किरण पाटील, आयुब हवालदार, श...

सहकारमहर्षी किताबाची मानकरी सुपनेची बैलगाडी.

Image
  सहकारमहर्षी किताबाची मानकरी सुपनेची बैलगाडी. 'साळशिरंबेत बैलगाडी शर्यतीचा थरार १८० गाड्यांचा सहभाग हजारो शौकिनांची उपस्थिती.' साळशिरंबे :- बक्षिस वितरण प्रसंगी युवा नेते पंकज पाटील व इतर मांन्यवर. उंडाळे- प्रतिनिधी. सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सुपने येथील साईराज पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपये बक्षिस पटकावून सहकारमहर्षी किताबाचा मान व शिल्ड मिळवले  कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त युवा नेते पंकज पाटील मिञ परिवाराच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेमध्ये साईराज पाटील सुपने यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पाचुंब्री वाटेगाव दुसरा पैलवान ग्रुप काले तिसरा जोतिर्लिंग प्रसन्न कालवडे शिंदेवाडी चौथा, अजयशेठ शिराळा पाचवा,बिरोबा प्रसन्न कुसुर सहावा, तानाजी देशमुख शास्ञीनगर मलकापूर या गाडीने सातवा क्रमांक पटकावला एकुन ३३ गटांतील स्पर्धेसाठी १८०...

शहीद जवान अनिल कळसे यांच्या पार्थिवावर रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

Image
  शहीद जवान अनिल कळसे यांच्या पार्थिवावर रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सातारा, दि. २३: शहीद वीर जवान अनिल कळसे यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर, गटविकास अधिकारी विजय विभुते, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, डॉ.अतुल भोसले, धैर्यशील कदम यांनी शहीद जवान अनिल कळसे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.   पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी सुनिता, आई लिलावती, वडील दिनकर, भाऊ बाळासाहेब, सुनील, मुलगा आर्यन व मुलगी श्रद्धा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.  यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शहीद अनिल कळसे...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्हिडिओ मेकिंग व इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्हिडिओ मेकिंग व इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव या महाविद्यालयामध्ये नुकतीच राज्यस्तरीय व्हिडिओ मेकिंग व इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली. महाविद्यालयातील विद्यार्थी हे शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या  पारंगत असावेत याकरता राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यभरातील जवळपास सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्पर्धेच्या संयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, मुख्य समन्वयक प्रा. सोनल सातपुते व समन्वयक प्रा. दीप्ती पाटील ह्या होत्या. इ पोस्टर प्रेझेंटेशनसाठी 70 महाविद्यालयानी व व्हिडिओ मेकिंग स्पर्धेसाठी 40 महाविद्यालयानी सहभाग घेतला होता. त्यामधे इ पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक सेजल पाटील (भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नवी मुंबई), द्वितीय क्रमांक निकिता लांबोरे (न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक...

मा.अजितदादा पवार सोशल मीडिया फाउंडेशन जपतेय सामाजिक बांधिलकी.

Image
  मा.अजितदादा पवार सोशल मीडिया फाउंडेशन जपतेय सामाजिक बांधिलकी. मुंबई - प्रतिनिधी. मा.पंकज तंतरपाळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा. राजदादा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली. मा. अजितदादा पवार सोशल मीडिया फाउंडेशन समाजातील शोषित,वंचित, पीडित,नागरिकांना मदत करण्याचं कार्य करते. याच पार्श्वभूमीवर नेरूळ येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला संघटनेच्या वतीने विनंती करून ती फी कमी केली. अशाप्रकारे सामाजिक कार्यात अग्रेसर ही संघटना असते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. मीराताई शिरसाट,उपाध्यक्ष प्रीती ताई जगताप, सपनाताई कदम, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. अमोल दादा ऊके, मा. राजदादा गोळे त्याचबरोबर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. नेरूळ :- येथील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना फी कमी करण्याबाबत निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.

वडगाव हवेलीच्या श्री सिद्धनाथाची बुधवारी रथयात्रा.

Image
  वडगाव हवेलीच्या श्री सिद्धनाथाची बुधवारी रथयात्रा. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाची जय्यत तयारी. कार्वे - प्रतिनिधी.  वडगाव हवेली (ता. कराड) येथील कुलदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची रथयात्रा बुधवारी (दि. 13 ) रोजी होत आहे.  काळाच्या ओघात यात्रेचे स्वरूप बदलत असताना वडगांव हवेली गावच्या सिद्धनाथ रथ यात्रेला मात्र वेगळाच इतिहास आणि परंपरा आहे.  या यात्रेचा संपूर्ण मान गावातील बारा बलुतेदार मंडळींना विभागून दिला आहे.   प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही यात्रेसाठी मंदिराची रंगरंगोटी, सजावट केली आहे. पाझर तलावाच्या निसर्गरम्य परिसरात असलेले सिध्दनाथ मंदिर सर्वाचे आकर्षन ठरत आहे.  दोन दिवस चालणाऱ्या यात्रेची ओढ भाविकांना दिपवाळी पासूनच लागते. बलिप्रतिपदा, दिपवाळी पाडव्याला संपूर्ण गावासह श्री सिध्दनाथ मंदिरामध्ये परंपरेनुसार घट बसवले जातात. याच दिवशी सिध्दनाथ जोगेश्वरी नवरत्न (उपवास) प्रारंभ होतो. नवरात्र  काळात मंदिरात दररोज सकाळी  आरती, पुजा - अर्चा काकड आरती, मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू असते.  दरम्यान या काळात दररोज श्री सिध्दना...

कासेगावात "माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद .

Image
  कासेगावात "माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत  पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद .  कासेगाव - प्रतिनिधी.  कासेगाव ग्रामपंचायत कासेगाव ने मा. आ. श्री जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष मा श्री प्रतीक पाटील व माजी जि. प. अध्यक्ष मा श्री देवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "माझी वसुंधरा अभियान" यामध्ये सहभाग घेतला आहे व त्या अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृती करण्याकरिता आयोजित केलेल्या सायकली रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कासेगाव येथील 400 हून अधिक पर्यावरण प्रेमीनीं या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. सुरुवात लोकनेते राजारामबापू पाटील स्मारक पदयात्री येथून रॅलीला सुरवात करण्यात आली  पदयात्री -बाजारपेठ -राजारामबापू व्यायाम मंडळ- चावडी चौक - डॉ आंबेडकरनगर -जुना स्टॅन्ड -ग्रामसचिवालय येथे समारोप करण्यात आला. या वेळी बोलताना ग्रा. पं. सदस्य अतुल लाहिगडे म्हणाले कि,जमीन, हवा, पाणी, अग्नि आणि आकाश या निसर्गाचे पंचतत्व जतन करण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत व सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने कासेगाव एक पर्यावरणपूरक गाव होईल. राज समन्व्यक श्री श्रीधर कुल...

श्री. कोटेश्वर विद्यालयाच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर(National level) निवड.

Image
 श्री. कोटेश्वर विद्यालयाच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर(National level) निवड. कराड - प्रतिनिधी. भारत सरकार च्या विज्ञान तंत्रज्ञान विभागा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2023 मध्ये विद्यालयाने सादर केलेले शेतीसाठी पाणी व्यवस्थापनात IOT (Internet of things) या तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पाची राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. इ .10 वी मधील चि.आदित्य उत्तम जाधव व चि.यश तुकाराम संकपाळ यांचे शेतीसाठी पाणी व्यवस्थापनात IOT (Internet of things) या तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक सौ.विभा साबळे मॅडम (मुख्याध्यापिका), श्री.लक्ष्मण उबाळे सर ,  संस्थेचे अध्यक्ष मा . नंदा भाऊ जाधव, सचिव मा.श्री तुकाराम जाधव, मा.श्री.भुजंगराव जाधव, तसेच सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक ,कर्मचारी ,पालक  व सर्व ग्रामस्थांनी यांनी अभिनंदन केले.तसेच त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कासेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.

Image
  कासेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा. कासेगाव - प्रतिनिधी. कासेगाव ता - शिराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा. विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त  त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  मा.देवराज पाटील कासेगांव, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.किरण पाटील, मा.सचिन पाटील,कासेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पवार , कासेगांव ग्रामपंचायत सदस्या.सौ.राणी माने, तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कांबळे,किशोर माने, सुभाष माने, तसेच महिला व तरुण उपस्थित होते.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व त्यातील विद्यार्थ्यांची प्रगती व अधोगती  याविषयी पालकांना संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आपला पाल्य कशा प्रकारचे शिक्षण घेत आहे, त्याची प्रगती कशी आहे, पालकांच्या काही शंका आहेत का  हे जाणून घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सतत पालक विद्यार्थी व शिक्षक सभा आयोजित केली जाते. त्याच अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी विद्यार्थी व पालक यांना सर्व विषयांमध्ये मिळालेल्या गुणांविषयी माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना सर्व परीक्षाविषयी माहिती दिली. तसेच पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरंसन करण्यात आले. यावेळी काही पालकांनी आपली  मते व्यक्त केली. या सभेसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात कौशल्य विकास शिबिर संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कौशल्य विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी कौशल्य विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण कौशल्य जर आत्मसात केली तर एक यशस्वी करिअर घडविण्यात कोणतीच अडचण येणार नाही म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी यांना संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज घोगावच्या अधिव्याख्याता सौ. शीतल मोहिते यांनी संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याविषयी मूलभूत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी केले. आयटक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर महासंघर्ष यात्रेचे आयोजन.

ग्रामपंचायत चिंचोली यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा.

Image
  ग्रामपंचायत चिंचोली यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा. शिराळा - प्रतिनिधी. ग्रामपंचायत चिंचोली ता- शिराळा यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा.उपसरपंच सौ. रूपाली जाधव,पै.धनाजी जाधव ,सुनिल जाधव, प्रियांका जाधव,संगिता चव्हाण,यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.चिंचोली गावचे ग्रामविकास अधिकारी योगेश नाईक,सुरेश जाधव  रोहिणी चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं. यावेळी चिंचोली गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.                                     **†*** मणदुर ते चिंचोली ता- शिराळा  दरम्यान संविधान सन्मान रॅली संपन्न.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वृषक मेहता यांचे वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वृषक मेहता यांचे वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये बेसिक ऑपरेशन ऑफ फार्मास्युटिकल्स कंपनीज फोकसिंग ऑन प्रॉडक्ट प्रमोशन अँड डिस्ट्रीब्यूशन नेटवर्किंग या विषयावरती वृषक मेहता (जनरल मॅनेजर मार्केटिंग इनटास फार्मास्युटिकल लिमिटेड )यांचे वेबिनार संपन्न झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त औषध कंपनीमध्ये कशाप्रकारे प्रोडक्शन, पॅकेजिंग, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरिंग तसेच मार्केटिंग कशा प्रकारे केले जाते त्यासाठी विविध प्रोसेस कशा कराव्या लागतात. मार्केटिंग औषधांचा सेल कसा केला जातो व त्यासाठी कसे नेटवर्किंग वाढवले जाते. तसेच प्रॉडक्ट क्वालिटी कशाप्रकारे मेंटेन ठेवली जाते हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन  व आभार प्रा. दीप्ती पाटील यांनी मानले

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल या विषयावर वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल या विषयावर वेबिनार संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये   फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल या विषयावरती विजय दाबडे.           ( सीनियर जनरल मॅनेजर मॅनकाईड फार्मा कंपनी) यांचे वेबिनार संपन्न झाले. औषध निर्माण शास्त्र म्हणजेच फार्मसी महाविद्यालयामध्ये औषधे कशी तयार करायची व त्याचे फायदे, तोटे तसेच त्याचा शरीरावर चांगला व वाईट परिणाम कसा होतो हे शिकवले जातेच पण प्रात्यक्षिकरित्या औषधाची गुणवत्ता कशी सांभाळली जाते. त्यासाठी विविध गोष्टींची प्रक्रिया कशी केली जाते. कोणते विभाग त्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. फार्मासिस्ट म्हणून काही विशिष्ट जबाबदाऱ्या घेणे बंधनकारक असते. तसेच सर्वांची सुरक्षा औषधांची व औषधांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची शुद्धता ही तितकीच महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना फक्त सैद्धांतिक ज्ञान असते प्रत्यक्ष औषध निर्माण कंपनीमध्ये गुणवत्ता सांभाळण्यासाठी विविध प्रकारे सामोरे ज...

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन.

Image
  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन. बचत गटांच्या उत्पादीत मालाबरोबर शेतकर्‍यांच्या मालालाही मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास  जागा उपलब्ध करुन देणार. सातारा दिनांक 25 - नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. कराड येथील शेती उत्पन्न्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात आलेल्या आठराव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

Image
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन. सातारा दि. २५ :-  राज्याचे पहिले  मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील  आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात.  त्यांचे विचार , त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे दिमाखात औपचारिक उद्घाटन.

Image
  कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे दिमाखात औपचारिक उद्घाटन. कराड  | प्रतिनिधी.  स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी १८ व्या प्रदर्शनाचे  प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते फीत कापून औचारिक उद्घाटन आज पार पडले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील (दादा), कराड बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपसभापती संभाजी चव्हाण, बाजार समिती संचालक नितीन ढापरे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई , व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील ,  रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड , शामराव पाटील पतसंस्थेचे चेअमरन  बळवंत पाटील, संचालक सतीश इंगवले, राजेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील, संभाजी काकडे, सर्जेराव गुरव, जगन्नाथ लवंड, गणपत पाटील, श्रीमती इंदिरा पाटील, रेखाताई पवार आद...

माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून दिला पर्यावरणाचा संदेश.

Image
  माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून दिला पर्यावरणाचा संदेश. वडगांव हवेली  - वार्ताहर आजकाल सर्वत्र  अनेक शाळांमधून माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलने होत असताना दिसतात. एकत्रित येऊन स्नेहसंमेलनाचा आनंद लुटण्याबरोबर   यामधून समाजपयोगी उपक्रम राबवणेत चा माणस काहीजणच ठेवतात येथील महात्मा गांधी विद्यालयाचे   मार्च 2007 बॅच च्या विद्यार्थ्यांचा  स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शाळेचे माजी शिक्षक व्यवहारे सर, पतंगे सर, सावंत सर, सूर्यवंशी सर, परीट सर उपस्थित  होते. कार्यक्रमाची  सुरुवात दीप प्रज्वलाने झाली.  त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत व प्रार्थना झाली. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शाळा परिसरात शुशोभीकरणासाठी  या या बॅचच्या मार्फत माजी शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून  एक नवा संदेश देणेत आला. तसेच आपण ज्या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवले  या शाळेतील भावी विद्यार्थ्यांसाठी शाळेला फळे ( ब्लॅक बोर्ड ) देण्यात आले यावेळी सर्व  शिक्षकांचा   सन्मानचिन्ह आणि एक रोपटे देऊन  सन्मान क...

प्रकाश वायदंडे यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर.

Image
  प्रकाश वायदंडे यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर. कराड - प्रतिनिधी. पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रामचंद्र वायदंडे ( रा .कार्वे ता. कराड जि. सातारा) यांना राज्य शासनाच्या  आदिवासी विकास विभाग  शासन निर्णय क्र.आसेपु-२०२०/प्र.क्र.२७/का-१४ दि.२३नोव्हेंबर ,२०२३ ने आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक संस्थांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येतो.मानपत्र , सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सदरचे पुरस्काराचे वितरण दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी हॉटेल रॉयल हेरिटेज, नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रकाश वायदंडे यांनी दलित महासंघाचे चळवळीत काम करीत असताना आदिवासी पारधी जमातीचे पुनर्वसन व अंधश्रद्धा  निर्मूलना साठी काम केले.तसेच मुलांना शिक्षणासाठी सहकार्य करीत अनेक मुलांना शाळेत पाठवले.पारधी जमातीमधील व्यसनाधीनता कमी करीत त्यांच्यामधील पाप पुछवानी प्रथेस सा...

प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची ऊद्देशिका लागली पाहीजे.

Image
  प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची ऊद्देशिका लागली पाहीजे. सामाजिक कार्यकर्ता बाबासो कांबळे  यांचे अहवान. शिराळा -प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.) प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची ऊद्देशिका लागली पाहीजे.सामाजिक कार्यकर्ता बाबासो कांबळे  यांनी सर्व भारतीयांना अहवान केल आहे.  26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान  स्विकारले व 26 जानेवारी 1950 रोजी  अधिकृतपणे वाटचाल सुरू केली.आपली बांधिलकी पुन्हा ठामपणे व्यक्त करण्याचा हा दिवस.येत्या 26 नोव्हेंबर रोजी गावोगावी, प्रत्येक गावातील ग्रमपंचायतीमध्ये संविधान ऊद्देशिका लागली पाहीजे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये संविधान ऊद्देशिका लावून केला पाहिजे.

गावगाडयातील पत्रकारांना संघटीत करुन पत्रकारांच्या न्याय हक्काची लढाई चालु करणार.

Image
गावगाडयातील पत्रकारांना संघटीत करुन पत्रकारांच्या न्याय हक्काची लढाई चालु करणार. _______समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर.               कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.) हादरा बातमीपत्राचे संपादक व डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा.नितीनभाऊ बडेकर म्हणाले देशाचा चौथा खांब समजला जानार्‍या पत्रकारांची फरपट होवू नये व गावगाडयातील पत्रकारकारांना कोणी त्रास देवू नये या साठी गावगाडयातील पत्रकारांना संघटीत करुन डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुंडट असोसिएश्नच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्काची लढाई चालू करुन पत्रकारांची चळवळ मजबूत करणार यासाठी सर्व पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेवून पत्रकारांच्या हक्काची लढाई सुरु ठेवून पत्रकारांचे अस्तिव निर्माण करणार. यासाठी लवकरच बैठकिचे आयोजन करण्यात येणार असून सर्व पत्रकारांनी एक संघ होवून आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे.ज्या वेळी कोणावरही संकट व अडचण येते तेथे पत्रकारांची आर्वजून आठवण येते ,पण पत्रकार अडचणीत असला तर त्याच्याकडे पाठ फिरवली जाते हे विधारक...

श्री. कोटेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

Image
  श्री. कोटेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.   तब्बल 20 वर्षांनी भरली माजी विद्यार्थी शाळा- जुन्या आठवणींना उजाळा. कराड -प्रतिनिधी. गोवे.ता.सातारा येथील  श्री कोटेश्वर विद्यालय,गोवे.या विद्यालयात तब्बल 20 वर्षांनी 2003-04 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती.सर्वांनी मिळून आपल्या शाळेत रमण्याचा वर्गातील बाकावर बसण्याचा आनंद घेतला.सर्व जुने मित्र तसेच एकाच डब्यात जेवणारे सवंगडी त्याच शाळेत भेटल्याने माजी विद्यार्थी आनंदाने भारावून गेले.दैनंदिन जिवनातील आपले कामकाज,आपले विचार सोडून एक दिवस आपल्या शाळेसाठी देत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली  या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे उपस्थित होत्या.मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी  तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली .माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अनोखी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.गीतगायन,संगितखुर्ची तसेच डान्स इत्यादी कार्यक्रमाने मेळावा रंगला. प्रत्यक्ष आपल्या शि...

कै. शरद लाहीगडे मित्रपरिवाराने जपली सामाजिक बांधिलकी.

Image
  कै. शरद लाहीगडे मित्रपरिवाराने जपली सामाजिक बांधिलकी. कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.) कै. शरद लाहीगडे (अण्णा) मित्रपरिवार याच्यातर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत तरी सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपल्या भागात ऊस तोडी निम्मित येणाऱ्या ऊसतोड मजूर यांची देखील दिवाळी गोड व्हावी या हेतूने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करणेत आले.  तसेच आपल्या भागातील रुग्णासेवेत काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांना साडी व मिठाई वाटप, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार बांधव यांना शर्ट व मिठाई वाटप व पोलीस बांधवाना मिठाई वाटप करणेत आले.तरी गरजू व समाजासाठी काम करणाऱ्या नागरिकांकरिता दिवाळीनिम्म्मीत एक सामाजिक बांधिलकीच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक मा श्री. अतुल लाहीगडे (भाऊ) यांनी दिली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य  माननीय .श्री. अतुल लाहीगडे (भाऊ), बंडासो देशमुख (दादा), विकास लाहीगडे, संजय लाहिगडे, फिरोज अत्तारं, सोमनाथ लाहिगडे, मकरंद माने, अनिकेत लाहीगडे, सागर कांबळे, सुशांत माने, अभिषेक दंडवते, सुरज देशमुख, अक्षय लाहिगडे, गणराज...

येवती येथे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन.

Image
  येवती येथे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन.           उंडाळे - प्रतिनिधी.   येवती ता. कराड येथे चंद्रभागा रूलर डेव्हलपर ,जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ, बौद्धजन हितवर्धक संघ येवती/ मुंबई यांच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धेचे   आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दीपक लोखंडे यांनी दिली ,छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे व त्यांनी बांधलेल्या गड किल्ल्याचे संवर्धन व्हावे याच दृष्टिकोनातून या भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .या किल्ल्या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 7000 व ट्रॉफी द्वितीय बक्षीस 5000 व ट्रॉफी तृतीय बक्षीस तीन हजार व ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. तसेच हा किल्ला शिवकालीन किंवा बुद्धकालीन असावा याची उंची दोन फुट व  लांबी तीन फूट असावी अशी नियमावली ठरण्यात आली आहे.या  स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन  करण्यात आले आहे .

ॲड.भारती पांडे यांची नियुक्ती.

Image
  ॲड.भारती पांडे यांची नियुक्ती. मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या मुंबई  महिला अध्यक्षपदी. मुंबई - प्रतिनिधी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. अजित दादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. पंकज ततंरपाळे व मा. राजदादा गोळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या. यावेळी ॲड. भारती पांडे यांची मुंबई महिला अध्यक्ष या पदावर निवड झाली,निवडीचे पत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. राज दादा गोळे यांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

ऐश्वर्या माने हिची फायर ब्रिगेड मॅन पदावर निवड.

Image
  ऐश्वर्या माने हिची फायर ब्रिगेड मॅन पदावर निवड. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या लक्ष्मण माने हिची मुंबई महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड मॅन या पदावर नुकतीच निवड झाली. तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी ऐश्वर्या माने हिने आपल्या निवडीच्या वेळचे स्वतःचे अनुभव सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऐश्वर्या माने हिच्या या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी सर्व संचालक मंडळ व प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सौ. जया पांडे यांची नियुक्ती.

Image
  सौ. जया पांडे यांची नियुक्ती. मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या मालाड उत्तर पश्चिम जिल्हा महिला अध्यक्षपदी. मुंबई - प्रतिनिधी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. अजित दादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. पंकज ततंरपाळे व मा. राजदादा गोळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या. यावेळी सौ जया पांडे यांची मालाड उत्तर पश्चिम जिल्हा महिला अध्यक्ष या पदावर निवड झाली,निवडीचे पत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. राज दादा गोळे यांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा आरक्षणास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्रचा जाहीर पाठिंबा.

Image
  मराठा आरक्षणास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्रचा जाहीर पाठिंबा.      शिराळा- प्रतिनिधी . नाटोली ता.शिराळा या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबत साखळी उपोषण सुरू आहे.दरम्यान या निमित्ताने संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप कांबळे यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन करून मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा दिला.यावेळी शंकर नाकील, संग्राम पाटील,रोहन नाकील, विश्वास नाकील, उत्तम कांबळे, अनिकेत नाकील,भैय्या मगदूम, प्रतीक नाकील ,यश निंबाळकर ,तानाजी पाटील ,संदीप पाटील, साहिल चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव यांचे वतीने बहे ता.वाळवा येथे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न.

Image
  राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव यांचे वतीने बहे ता.वाळवा येथे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न. कासेगाव - प्रतिनिधी. राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे यांच्या संयुक्त विद्यमाने बहे येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. एस के मोहिते प्राचार्य, राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव व श्रीमती विजया पाटील मुख्याध्यापिका,लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण 260 शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासून त्यांच्या ओळखपत्राचा तपशील बनवताना त्यात रक्तगट रक्तगटाच्या महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. प्राध्यापक डॉ. अतुल चोपडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तगट किती आहेत, ते कसे तपासले जातात व त्यांचे महत्त्व काय आहे याबद्दल मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सहाय्यक प्राध्यापक एच. एस. कंदले, सह.प्राध्यापिका शैलजा कांबळे, अभिमन्यू जाधव, श्र...

कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न.

Image
कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न. कासेगाव - प्रतिनिधी. कासेगाव ता.वाळवा. येथील स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर  येथे   कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे  स्वच्छता मोहीम संपन्न झाली. यामध्ये ह .भ .प. बंडासो औंधकर, रामदास शंकर पाटील ,दादासो बोकारे ,आकाराम जयसिंग पाटील ,रमेश दत्तात्रय पाटील व राजकुमार आनंदराव पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला.

येवती गावात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते यांना गावबंदी.

Image
  येवती ता.कराड, गावात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते यांना  गावबंदी.   उंडाळे - प्रतिनिधी.                   येवती ता.कराड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने  राजकीय पक्षाच्या  पदाधिकारी व नेते यांना गावबंदी  करण्याचा निर्णय घेण्यात आला .दिनांक 29 रविवार रोजी सकाळी दहा वाजता याबाबतचा लेखी ठराव करण्यात आला .यावेळी गावातील सर्व  ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते .या ठरावांमध्ये एक मुखाने निर्णय घेण्यात आला कि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना गावामध्ये येण्यास बंदी असेल .त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर  पाठिंबा देण्यात आला .यावेळी बहुसंख्येने मराठा समाज बांधव व गावातील इतर समाजातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सकल मराठा समाज, कोडोली, ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.

Image
  सकल मराठा समाज, कोडोली , ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते  मंडळींना गावबंदी. कोडोली - प्रतिनिधी.   सकल मराठा समाज, कोडोली ता. कराड यांच्या वतीने, मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास  जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

Image
राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी निवेदनाद्वारे केली विनंती. कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.) कोयना धरणातून वारंवार पाणी सोडण्याची मागणी करुन देखील शासनाच्या नियोजना अभावी कृष्णा नदी पात्रात पाणी न सोडल्याने मागील काही दिवसांपासून कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध नाही. शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. याच धर्तीवर आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देत कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती केली.शासनाने आज १ टीएमसी पाणी सोडणार असे जाहीर केले आहे. मात्र या कठीण परिस्थितीत कमीत कमी ५ टीएमसी पाणी सोडले तरच पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा आहे. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.याप्रसंगी आ. मानसिंग नाईक, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जि.प.माजी अध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते.

धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा संपन्न.

Image
  धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा संपन्न. शिराळा -प्रतिनिधी.   शेडगेवाडी तालुका शिराळा येथे   स्वामी समर्थ हॉल शेडगेवाडी या ठिकाणी  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य  संघटनेच्या वतीने व धमचक्र परिवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा घेण्यात  आला. त्यामध्ये कामगारांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आली. यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.अविनाश कांबळे ( भाऊ ) तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव काळे ( भाऊ ) शिराळा तालुका अध्यक्ष मा.कृष्णा कांबळे ( भाऊ ) व संघनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.