Posts

Showing posts from August, 2022

मा. लक्ष्मण मंडले यांना राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार प्रदान.

Image
मा. लक्ष्मण मंडले यांना राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार प्रदान. कराड - प्रतिनिधी. पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती संस्था मंडळे आदींचा गौरव करण्यात आला.यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील 40 व्यक्तींना आणि संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यामध्ये मनव गावचे सुपुत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांचा ही या पुरस्कारा मध्ये समावेश होता.त्यांनी केलेल्या प्रशासकीय सेवे मध्ये अतुलनीय काम करून ग्रामीण भागातील कराड आणि पाटण तालुक्यातील वाड्यावसत्यावर योजना लोकांच्या पर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले व तसेच कोरोना काळात त्यांनी अविरत पणे काम करून या सर्व योजना पुर्ण केल्या.या त्यांच्या कामगिरीबद्दल खासदार श्रीनिवास पाटील या हस्ते राज्यस्तरीय प्राईड ऑप स्पंदन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शिवव्याख्याते प्रा.अरूण घोडके शिवचरित्र अभ्यासक प्रा.डॉ.प्रदीप यादव,स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे, प्रा.ए.बी.कणसे,अभिनेते रवी साळुंके,अभिनेत्री सुनंद...

कोडोलीतील हायस्कूलास आमदार फंडातून प्रिंटर भेट.

Image
  कोडोलीतील हायस्कूलास आमदार फंडातून  प्रिंटर भेट. कार्वे प्रतिनिधी:- प्रविण पाटील कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली ता. कराड येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य थ्री इन वन प्रिंटरचे वाटप करण्यात आले.  हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. जी. हे होते. तर कराड पाटण तालुक्यातील शाळा मधील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी हौसाबाई विठ्ठलराव प्रशाला कोडोली या शाळेस आमदार जयंत आजगावकर यांच्या शुभहस्ते थ्री इन वन प्रिंटर शिक्षक मोरे आय.जे.यांनी स्वीकारला. प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांनी तसेच  पालक, ग्रामस्थ यांनी शाळेस बहु उपयोगी थ्री इन वन प्रिंटर दिल्याबद्दल आमदार जयंत आसगावकर यांचे आभार मानले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा.

Image
  राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा. सातारा दि. 30 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2022-23 मधील मंजूर तरतुदीनुसार दायित्व वजा जाता किती रकमेची कामे घेण्यास वाव आहे याबाबतची माहिती तयार करणे तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रम आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामधील आमदार महोदय यांनी  सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांचा आढावा. राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसा...

एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील विद्यार्थ्यांचे यश .

Image
  एन. एम. एम. एस परीक्षे मध्ये श्री कोटेश्वर विद्यालय गोवे  येथील विद्यार्थ्यांचे यश. कराड प्रतिनिधी:- सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम .एस परीक्षे श्री कोटेश्वर विद्यालय गोवे ता.जि. सातारा  या महाविद्यालया मधील  गुणवत्ता यादीत  साहील संतोष जाधव , सिद्धी शंकर जाधव , समिक्षा अशोक जाधव या तीन  विद्यार्थ्यांची  निवड झाली . या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी प्रतिवर्षी १२००० रु शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे . तर सहा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवर्ती मिळणार आहे .या परीक्षेचे विभाग प्रमुख श्री लक्ष्मण उबाळे , प्राचार्या श्रीमती विभा साबळे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाभाऊ जाधव, सचिव तुकाराम आण्णा जाधव संचालक भुजंगराव जाधव शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील.

Image
    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील : ना. सोम प्रकाश. भाजपाच्या कराड दक्षिणेतील महिला संवाद मेळाव्याला महिलांचा उदंड प्रतिसाद. कराड, ता. ३० : देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित महिला संवाद मेळावा उदंड प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णादेवी पाटील, जिल्हाध्यक्...

भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथे बाईक रॅली.

Image
भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथे बाईक रॅली.   केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत . कराड, ता. ३० : सन २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीने आत्तापासूनच सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विशेष दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीच्या निमित्ताने भाजपाने कराडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  ढेबेवाडी फाट्यापासून बाईक रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीच्या अग्रस्थानी असलेल्या वाहनात केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश, भाजपा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर उभे होते.  भारत माता की जय अशा घोषणात देत निघालेली ही बाईक रॅली कोल्हापूर नाका, दत्त चौक, चावडी चौक मार्गे प्रीतिसंगम घाटावर पोहचली. त्याठिकाणी ना. सोम प्रकाश यांनी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र...

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूरचा विद्यार्थी रविराज सुतार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

Image
  श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूरचा विद्यार्थी रविराज सुतार याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. कराड - प्रतिनिधी.   श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित आ.च. विद्यालय व आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या खेळाडूचा गौरव म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच नुकत्याच नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियमवर संपन्न झालेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत रविराज सुतार याने हेक्झॅॅथलॉन या  क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार नुकता संपन्न झाला.           रविराज सुतार याचे  संस्थेचे सचिव शेतीमित्र  अशोकराव थोरात यांचे हस्ते व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक दिलीप चिंचकर, सौ अरुणा कुंभार यांचे प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पुढील  गुवाहाटी येथे  होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.       सत्कार प्रसंगी बोलताना शेती मित्र अशोकराव थोरात म्हणाले की खेळामुळे शारीरिक हाल...

‘स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं काम केलं - श्रीनिवास पाटील.

Image
 ‘ स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं काम केलं - श्रीनिवास पाटील तळमावले/वार्ताहर ‘स्पंदन’ ने सामाजिक जाणिवा जपण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले ते पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या ‘‘राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’’ सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, प्रेरणा सवंर्धन तज्ञ तथा परिवर्तन संस्था सातारचे किशोर काळोखे, शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह.भ.प. प्रा.डाॅ.प्रदीप पांडूरंग यादव, प्रा.ए.बी.कणसे, महात्मा गांधी विद्यालय, पाचवडचे कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, कलाशिक्षक जयंत कदम, अभिनेते रवि साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे व इतर मान्यवर उपस्थित होते. खा.श्रीनिवास पाटील यांनी आपल्या रांगड्या मराठमोळ्या भाषेत उपस्थितांशी दिलखुलास संवाद...

केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज.

Image
  केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज. महिला व नवमतदार संवाद मेळाव्यासह बाईक रॅलीचे आयोजन. कराड, ता. २७ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने देशातील १४४ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे रविवार (ता. २८) पासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिण मतदारसंघात सोमवारी (ता. २९) व मंगळवारी (ता. ३०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली आहे.  भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर व जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भ...

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक गावंडे.

Image
  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक गावंडे. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अभिषेक गावंडे तर दर्यापूर तालुक्का अध्यक्ष पदी अमोल राऊत यांनी नियुक्ती. माहिती अधिकार महासंघ भगतसिंह ही पदवी मिळालेले अभिषेक कळाशी गावाचे ग्रामपंचायत सदस्य भ्रष्टाचार मुक्त भारत घडवण्याचा उद्देश असणारे सर्वसामान्य लोकांना माहिती अधिकारातून न्याय मिळवून देणारे याच्या कामाची चर्चा पूर्ण जिल्हा भर गाजलेली असताना महासंघ त्यांच्या कामाची व्याप्ती बघता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष बसवेकर व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. शेखर कोलते सर यांच्या आदेशा नुसार त्यांना अमरावती जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले तसेच आमला येथील युवा ग्रामपंचायत सदस्य गोर गरीब सामान्य जनतेचे निस्वार्थी मनाने काम करून भ्रष्टाचार मुक्त भारत देशाचे स्वप्न बघणारे अमोल नंदकिशोर राऊत यांची दर्यापूर तालुक्का अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या तरुण सभासद कडून माहिती अधिकार प्रचार व प्रसार मोठा होईल तसेच त्यांच्याकडू...

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर; खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार वितरण.

Image
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर;  खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार वितरण. कराड -  प्रतिनिधी . पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येते. सन 2019 व 2020 मधील पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून या संदर्भात प्रस्ताव मागवण्यात आले होते. सुमारे 600 प्रस्तावामधून 2019 मधील 30 व 2020 मधील 40 अशा व्यक्ती व संस्था यांची निवड करण्यात आली आहे. सन 2019 आणि सन 2020 मधील पुरस्कार सोहळा कोरोना संसर्गामुळे झाला नव्हता. तो यंदा एकत्रित घेण्यात येत आहे. सदरील पुरस्काराचे हे 4 वर्ष आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल व खा.श्रीनिवास पाटील, सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, प्रेरणा सवंर...

बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व लाभाबाबतचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फतच करावे.

Image
  बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व लाभाबाबतचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फतच करावे.   -  सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय गुरव   सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांचे राहणीमान उंचावण्याकरीता कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची नोंदणी करून कामगारांना मंडळाच्या वतीने नोंदणी पश्चात पात्र बांधकाम कामगारांना विविध लाभ देण्यात येतात. या योजनेचा लाभ मिळण्याकरीता जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही अमिषाला बळी न पडता थेट जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी, नुतनीकरण व इतर लाभ इत्यादी कामकाज करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय गुरव यांनी केले आहे.  बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येणाऱ्या  योजनेमध्ये शैक्षिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य इत्यादी योजनांचा समावेश केला आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील बांधकाम कमगारांकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मंडळाचे...

कृष्णा कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न.

Image
  कृष्णा कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न. शिवनगर, ता.20: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संपन्न झाले. चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते पूजन करून यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलर पूजा करण्यात आली. यावेळी संचालक जितेंद्र पाटील धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे,  सयाजी यादव, जे.डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील,वैभव जाखले, सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को ऑर्डीनेटर एस. डी. कुलकर्णी, चीफ इंजिनीअर सुहास घोरपडे, प्रोसेस मॅनेजर डी.जी.देसाई, एम.के. कापूरकर, बाळासाहेब पाटील आदींसह सभासद शेतकरी, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.  

कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग येत्या अडीच वर्षात भरुन काढणार.

Image
  कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग येत्या अडीच वर्षात भरुन काढणार. डॉ. अतुल भोसले : वाठार येथे ५.५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन कराड, ता. २१ : गेल्या अडीच वर्षांपूर्वी जनमताच्या विरुद्ध जात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे कराड दक्षिणमध्ये विकासाची गंगा रखडली होती. पण राज्यात नुकतेच पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे, आता येणाऱ्या अडीच वर्षात कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. वाठार (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत वाठार गावासाठी मंजूर झालेल्या ५.५० कोटी रुपयांच्या २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेठरे-वाठार शिव पाणंद रस्ता (१३ लाख ५८ हजार), मालखेड-वाठार शिव पाणंद रस्ता (१३ लाख २४ हजार), इनाम पाणंद रस्ता (७ लाख ३० हजार) अशा एकूण ३४ लाख रुपयांच्या कामाचे ...

स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी उद्योजक व्हावे.

Image
  स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी उद्योजक व्हावे.    -मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत  सातारा तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांना रु.1.42 कोटीचे बँक कर्ज वितरण . सातारा - जि.मा.का.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता गटांना विविध बँकामार्फत कर्ज वितरण करण्यात येत असून  बँक कर्ज प्राप्त स्वयंसहाय्यता गटांनी बँक कर्जाचा विनियोग उद्योगवृद्धीसाठी करून महिलांनी उद्योजक व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा यांनी केले.  जिल्हा परिषद सातारा येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये आयोजित भव्य बँक कर्ज वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई,  गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे,  उमेदचे जिल्हा व्यवस्थापक-स्वाती मोरे, मनोज राजे,  सुरज पवार, व उमेदच्या तालुका अभियान व...

अक्षदा माने हिचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक.

Image
  अक्षदा माने हिचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक. कार्वे प्रतिनिधी :-   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती कराड यांच्या वतीने तालुकास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या  निबंध स्पर्धेत इ.६ वी ते ८ वी मोठा गटात भारती विद्यापीठाचे हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली मधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु.अक्षदा दत्तात्रय माने हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे आयोजन स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती सदन,कराड (टाऊन हॉल) येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम पंचायत समिती कराड (शिक्षण विभाग) यांच्या वतीने बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रणजीत पाटील डी.वाय.एस.पी.कराड.यांच्याशुभहस्ते व मा.तहसिलदार , गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या प्रमुख उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अक्षदा माने या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल तिचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.तरवारे के.पी.यांनी प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले.तिला मार्गदर्शन करणारे प्रशालेतील शिक्षक,...

आदर्शमाता प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद- तहसीलदार विजय पवार.

Image
  आदर्शमाता प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद- तहसीलदार विजय पवार. कराड (वार्ताहर)-दीन-दलित, पददलित वंचित घटकांना आवश्यक त्या मदती बरोबरच गुणवंतांचा सत्कार करून आदर्शमाता प्रतिष्ठान एक महान कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी काढले.  पाडळी (केसे), तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू कुमारी तपस्या दादासाहेब काशीद हिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सैदापूर चे सरपंच फत्तेसिंह जाधव, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास मोहिते, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन,सर्व संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी  यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी बोलताना तहसीलदार विजय पवार म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक संस्थांनी  अष्टपैलू विचार धारेने काम करणे गरजेचे आहे. असा अष्टपैलू विचार करून आदर्शमाता प्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास माहिते त्यांचे सर्व सहक...

कृष्णा कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

Image
  कृष्णा कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगरकडून सन्मान शिवनगर, ता. १७ : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्यावतीने हा पुरस्कार सप्टेंबरमध्ये पुणे येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच नवनवीन प्रयोग करत, शेतकरी सभासदांचे हीत साधले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याने राबविलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेसह विविध ऊसविकास योजनांचे यांचे सखोल व गुणात्मक परीक्षण करून, या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड, भारतातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे एकमेव संयुक्त व्यासपीठ असलेल्या भारतीय शुगर या संस्थेने केली आहे. कृष्णा कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत गेल्या ६ वर्षा...

कृष्णा अभिमत विद्यापीठात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन उत्साहात.

Image
  कृष्णा अभिमत विद्यापीठात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन उत्साहात. कराड, ता. १७ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात आज राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात संस्थेचे अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत राज्यभरात आज सकाळी ठीक ११ वाजता सर्व ठिकाणी राष्ट्रगीताचे सामूहिक गायनाचे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले होते. यानुसार कृष्णा अभिमत विद्यापीठात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, व...

स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकाच्या त्यागची माहिती तरुणाना समजणे गरजेचे...माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.

Image
  स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकाच्या त्यागची माहिती तरुणांना समजणे गरजेचे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. उंडाळे - प्रतिनिधी.  कराड दक्षिणमध्ये उंडाळे ता.कराड येथे आखिल भारतीय काँग्रेस कमिटिच्या वतीने काढण्यात आलेल्या आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आलेल्या पदयात्रेत ते म्हणाले, महात्मा गांधीनी ब्रिटीशांना चले जाव ची हाक दिल्याने क्रांतीदिनाला विशेष महत्त्व आहे. तरुणाना इंग्रजाच्या गुलागीरीतुन देश स्वातंत्र्य करण्यासाठी क्रांतिकारनी काही वेदना सहन कराव्या लागल्या त्या आजच्या पिढिने समजुन घेणे गरजेचे आहे.   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त कराड दक्षिण काँग्रेस कमिटिच्या माध्यमातून या पदयात्रेचे नियोजन करण्यात आले. या पदयात्रेची सुरुवात उंडाळे बाजार पेठ येथुन स्वा दादासाहेब उंडाळकर स्मारकापर्यंत करण्यात आले होते. यावेळी येळगाव जिल्हा परिषद गटातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वज घेवुन कार्यकर्तानी घोषणा देवुन स्वा.दादासाहेब उंडाळकर पुतळ्याला आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रे...

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान,उंडाळे याच्यावतीने वृक्षारोपण.

Image
  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान,उंडाळे याच्यावतीने वृक्षारोपण. उंडाळे, प्रतिनिधी.   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त ७५ व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून उंडाळे ता.कराड येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान,उंडाळे याच्यावतीने शेवाळवाडी(सवादे) वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.   स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत उंडाळे येथील  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, तरुणानी शेवाळवाडी(सवादे) येथील शिंदोबाची खडी येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये प्रतिष्ठानच्या तरुणामार्फत तयार करण्यात आलेल्या वड,पिंपळ आदी झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणासाठी उंडाळे सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटिल, निवृत्त सैनिक राजेंद्र माळी, आस्लम खोत, विजय माळी,निवास पाटिल, महेंद्र पाटिल,तर प्रतिष्ठान चे संग्रामसिंह पाटिल, कपिल पाटिल, जय पाटिल, वरद पाटिल याच्यासह बहुसंख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.        

येणके या गावात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

Image
    येणके या गावात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा. स्वातंत्र्य दिन गावातीलच 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते 75 ध्वज फडकवून विविध उपक्रमांनी साजरा. कराड - प्रतिनिधी.        कराड तालुक्यातील येणके या गावात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात 75 वा स्वातंत्र्य दिन गावातीलच 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते 75 ध्वज फडकवून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावित्रीच्या लेकींना मानसन्मान देण्यात आला. या यापुढे गावातील विधवा महिलांना विधवा असे न संबोधता त्यांचे  " संघर्ष भगिनी महिला" असे नामकरण ही करण्यात आले.      पती निधनानंतर प्राप्त झालेल्या वैधव्यामुळे जीवनातील आनंद हिरावून गेलेल्या  विधवा महिलांनी आज स्वतःच्या हस्ते 75 ध्वज फडकवल्याने त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद दिसून येत होता. आजपर्यंत विधवा भगिनींच्या हस्ते कधीही ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नसल्याने या अमृत महोत्सवानिमित्त आमच्या हातून ध्वजारोहण करून आम्हाला जो सन्मान दिलात त्याबद्दल जीवन कृतार्थ झाल्याच्या भावना ...

सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गतीमानतेवर भर - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

Image
  सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गतीमानतेवर भर  - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण            सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : इतिहासातून प्रेरणा घेऊन राज्य आणि देशाला विकासाकडे आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास नेण्यासाठी शासकीय यंत्रणांनी कामाच्या गतीमानतेवर भर द्यावा. शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास शासनाविषयक सकारात्मक लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने चालल्यास वेगाने काम होते. येत्या काळात ही चाके गतीने फिरताना नक्कीच पहायला मिळतील, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या व स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले कार्य, विविध लढे याचा उहापोह करून उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या 76 व्य...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण.

Image
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. जिल्ह्याच्या विकासाची परपंरा अधिक वृद्धींगत करणार    - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई   सातारा दि. 15 :  सातारा जिल्हा स्वातंत्र सैनिकांचा तसेच लष्करातील आजी-माजी सैनिकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्ह्याच्या विकासाची परंपरा अधिक वृद्धींगत करणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई बोलत होते.  ध्वजवंदनानंतर श्री. देसाई यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.

Image
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.   मुंबई, दि. 14:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.  त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.  इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत: सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास *सुधीर मुनगंटीवार-* वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय *चंद्रकांत पाटील-  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार...

जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका स्मृति दिवस चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन.

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका स्मृति दिवस चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन. स्वातंत्र सैनिक बाळकृष्ण गोविंद शेवाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे झाले उदघाटन. सातारा , दि. 14 (जिमाका): भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात अनेकांना आपले जीवनही गमवावे लागले. अनेकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच्या झळा पुढे अनेक वर्ष बसत राहिल्या. त्याच्या स्मृती आणि त्यांच्या प्रती असलेली सहवेदना आपल्या स्मरणात राहव्यात म्हणून देशभर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या "विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे " उदघाटन  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण गोविंद शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.      यावेळी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे ,तहसीलदार सुषमा पैकेकरी,तहसीलदार अमर रसाळ,   आणि इतर मान्यवर उपस्थित होते . हे प्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुले असणार आहे.  यावेळी जिल्हाधिकारी  म्हणाले या प्रदर्श...

सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उजळली तिरंगा रोषणाईने.

Image
  सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उजळली तिरंगा रोषणाईने.   सांगली - जि.मा.का. : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत शासकीय इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वर ही नेत्रदिपक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय इमारती तिरंगा रोषणाईत सजल्या आहेत.