स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटाचा फटाकेमुक्त दीपावलीसाठी अहवान.

 

स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी  फटाकेमुक्त दीपावलीसाठी  प्रबोधनात्मक उपक्रम .

उंडाळे, प्रतिनीधी,

                     covid-19 मुळे सध्या शाळा महाविद्यालय बंद आहेत अशा कालावधीत शिक्षण मात्र सुरू आहे. हे औचित्य साधत फटाक्यांमुळे दिपावलीत होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उंडाळे ता.कराड  येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटाचा फटाकेमुक्त दीपावली साजरी करा असा प्रबोधनात्मक व्हिडिओ बनवून विद्यार्थीच्या हाँटसाँपवर  ग्रुप वर देऊन ऑनलाइन व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.                                      सध्या covid-19 मुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. शिक्षण सुरू आहे सध्या दिपावली हा सण साजरा होत आहे. यासाठी राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून विद्यालयात फटाकेमुक्त दीपावली साजरी करा अशा पद्धतीचा आवाहन विद्यार्थ्यांना केलं जात होतं तशा आशयाची 1000 वर पत्रके काढून विद्यार्थीना वाटप केली जात होती. यावर्षी मात्र शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य बी. पी 

. मिरजकर, पर्यवेक्षक बी आर पाटील, हरित सेनेचे समन्वयक जगन्नाथ माळी, शंकर आंबवडे, धनंजय पवार, गणेश शेवाळे. यांनी पाच मिनिटाचा प्रबोधनात्मक व्हिडिओ तयार केला असून तो प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप आहेत या ग्रुप वर हा व्हिडिओ पाठवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे काम विद्यालयाचा राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक जगन्नाथ माळी यांनी फटाकामुक्त दिपावली साजरी करा, प्रदूषण टाळा असे आवाहन  केले असून पर्यवेक्षक बी. आर पाटील यांनी फटाके तयार करण्यासाठी तांबे, शिसे, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज, जस्त, गंधक या मूलद्रव्याचा विषारी संयुगाचा वापर केला जातो. त्याचा आपल्या आरोग्यावर आणि श्वसनाचा त्रास होतो हा त्रास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी या वर्षी फटाकेमुक्त दीपावली साजरी करावी असे आवाहन  केले तर प्राचार्य बी. पी मिरजकर यांनी या वर्षी विद्यार्थ्यांनी फटाका मुक्त दीपावली साजरी करून त्यातून वाचणार्‍या पैशातून शालेय वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे या व्हिडिओला विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आहे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .