Posts

Showing posts from 2024

तानाजी देशमुख यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद.

Image
  तानाजी देशमुख यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद. ___आमदार डॉ. अतुलबाबा भोसले  मलकापूर - प्रतिनिधी.    कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या  जयंती दिनानिमित्त  शास्त्रीनगर  विभागातील प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना तसेच आयुष्यमानभारत योजना शिबिराचे मोफत आयोजन केले होते. या उपक्रमाला आमदार डॉ. अतुल भोसले,  कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.        यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले कि तानाजी देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,पत्रकारिता, राजकीय,क्षेत्रांत सक्रिय आहेत त्यांनी भाजप पक्षात विविध पदांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे शहरातील अनेक  सामाजिक समस्या मग पाणीप्रश्न, महामार्गावर होणारे अपघात,  विकास आराखडा, कचरा डेपो, सांडपाणी, रखडलेल्या     विकासकामांच्या प्रश्नां साठी  वेळ  प्रसंगी   आंदोलनाच्या  माध्यमा...

कल्याण येथील अत्याचारी नराधमाचा जाहीररीत्या एन्काऊंटर करा: दयानंद शिवजातक.

Image
       कल्याण येथील अत्याचारी नराधमाचा जाहीररीत्या एन्काऊंटर करा: दयानंद शिवजातक. भारतीय दलित महासंघ यांचे वतीने तहसीलदार शिराळा यांना निवेदन.     शिराळा - प्रतिनिधी. कल्याण या ठिकाणी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपी  विशाल गवळी याचा जाहिररीत्या एन्काऊंटर करा अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे . सदरची घटना अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी असून वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मुलींच्या व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . सदरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून जनमानसात संतापची लाट उसळलेली आहे. शासनाने सदरच्या निंदनीय घटनेची संवेदनशीलरित्या दखल घेऊन बदलापूर या ठिकाणी ज्याप्रमाणे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर अक्षय शिंदे या नराधमाचा एन्काऊंटर करून संबंधित पिढीतेला न्याय देण्यात आला होता , त्याचप्रमाणे विकृत मानसिकतेच्या विशाल गवळी या नराधमाचा जाहीररित्या एन्काऊंटर करण्यात या...

भारती विद्यापीठाचे इंग्लिश मीडिअम स्कूल लोहगाव येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

Image
  भारती विद्यापीठाचे इंग्लिश मीडिअम स्कूल लोहगाव येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.  पुणे - प्रतिनिधी. (कविता सवाखंडे.) भारती विद्यापीठ इंग्लिश मीडिअम स्कूल लोहगाव पुणे येथे "रिश्ते"   (A Celebration of Human Relations) स्नेहसंमेलन दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी अतिशय शिस्तबद्ध व जल्लोशात संपन्न झाले. जीवनात नाती तशी बरीच असतात त्यांची जपणूक ही तेवढीच करावी लागते. भारती विद्यापीठाचे इंग्लिश मिडीयम स्कूल लोहगाव येथे शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातील नात्यांची जपणूक नेहमीच केलेली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ,"आपली नाती" ही संकल्पना अत्यंत सुंदर रित्या सादर करण्यात आली. याप्रसंगी प्रायमरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमातून नात्यांचा हा जल्लोष सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल पराग मोडक, सुप्रसिद्ध लेखिका कल्याणी सरदेसाई व असिस्टंट डायरेक्टर शीतल टाक मॅडम हे उपस्थित होते. स्नेहसंमेलनाची सुरुवात भारतीय विद्यापीठाचे संस्थापक माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमापूजन आणि व दीप प्रज्वल...

साळशिरंबे आमदार केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन.

Image
  साळशिरंबे येथे "आमदार केसरी " भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन.  उंडाळे - प्रतिनिधी. कराड तालुक्यातील मौजे साळशिरंबे येथे बुधवार दि. १ जानेवारी २०२५ रोजी भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन पंकज पाटील मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सोशल मिडीया सातारा जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली.कृष्णा उद्योग समुहाचे शिल्पकार सहकार महर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 100 व्या जयंतीदिना निमित्त मा.आ.डॉ.अतुलबाबा भोसले हे प्रचंड मताधिक्याने निवडून आमदार झाल्याबध्दल  नवीन वर्षावर कराड तालुक्यातील पाहिले ओपन बैलगाडी शर्यत मैदान होत असून, अतुलपर्व १ ले पर्व म्हणून "आमदार केसरी" भव्य ओपन बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथम पारितोषिक १ लाख रु. व ढाल, बक्षीस ठेवण्यात आले आहे, व्दितीय पारितोषक ७१ हजार १११ रु. व ढाल, तृतीय पारितोषिक ५१ हजार १११ रु. व ढाल, चतुर्थ पारितोषक ३१ हजार १११ रु. व ढाल, पंचम पारितोषक २१ हजार १११ रु. व ढाल, सहावा पारितोषक १५ हजार १११ रु. व ढाल, सातवा पारितोषक ११ हजार १११ रु. व ढाल. सर्व फायनलच्या गाडी चालकास मानाचे फेटे देण्यात येण...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शिवाजी नेर्ली यांचे एज्युकेशन मॉरल्स अँड इनव्हारमेंटल सायन्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरती व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व असावे तसेच पर्यावरण शास्त्र संदर्भात स्वतःचा व्यक्तिमत्व विकास का आवश्यक आहे व तो कसा करावा याविषयी शिवाजी नेर्ली यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री जगदाळे व आभार प्रा. मोनिका शिंदे  यांनी मानले.

सकल आंबेडकरी समाज शिराळा तालुका यांच्यावतीने निवेदन.

Image
  सकल आंबेडकरी समाज शिराळा तालुका यांच्यावतीने निवेदन. शिराळा प्रतिनिधी -  नानासाहेब कांबळे.  सकल आंबेडकरी समाज शिराळा तालुका यांच्यावतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस स्टेशन तसेच कोकरूड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेध म्हणून  निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा. तसेच परभणी  येथे घडलेल्या  घटनेमध्ये भीम सैनिकांवरती गुन्हा  दाखल केले आहेत ते  परत घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशी यांना  न्याय मिळावा त्यांच्या घरातल्यांना 50 लाखाची मदत मिळावी असे या निवेदनामध्ये नमूद केले आहे. हे निवेदन देण्यासाठी शिराळा तालुक्यातील धम्म बंधू आणि भगिनी या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये महिला महाविद्यालयाचे उज्ज्वल यश.

Image
शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये  महिला महाविद्यालयाचे उज्ज्वल यश. कराड - प्रतिनिधी. कराड येथील शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड या महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाने शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराडच्या मैदानावर केले होते. या स्पर्धेचे यजमानपद असणाऱ्या महिला महाविद्यालयाने बलाढ्य असणाऱ्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचा अंतिम फेरीत आठ विकेट राखून स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.          या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये एकूण 12 सामने खेळविण्यात आले.या सामन्यामध्ये औंध,उंब्रज महाविद्यालयाच्या संघांना पराभूत करत यजमान संघाने अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचा पराभव करत हा संघ शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.          या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण मंडळ, कराडचे कौन्सिल सदस्य ॲड. अरविंद घाटे यांनी केले. याप्रसंगी श्री...

पोपट बनसोडे यांची सामाजिक बांधिलकी.

Image
  पोपट बनसोडे यांची सामाजिक बांधिलकी. शिराळा - प्रतिनिधी. छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र  राज्य व दारूबंदी जन आंदोलन चे शिराळा तालुका अध्यक्ष मा. पोपट बनसोडे यांनी खराळे, खोतवाडी ता. शिराळा येथे किल्ला बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलं होतं.या स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक  खोतवाडी येथील कु.सार्थक प्रकाश खोत,सुरज खोत, कार्तिक खोत, तन्वी खोत, यांनी पटकावला,तर  दुसरा क्रमांक  तन्मय पाटील, याने तर तिसरा व चौथा क्रमांक साईराज पाटील व  गणेश काशीद यांनी पटकावला. या  स्पर्धेमधील  विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व "छत्रपती शिवाजी महाराज कोण होते "हे पुस्तक भेट देण्यात आलं.पोपट बनसोडे यांच्या पुढाकार्याने किल्ला स्पर्धा घेण्यात आली.           स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना मा.पोपटराव बनसोडे.

डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते साळशिरंबे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन.

Image
  डॉ.अतुल भोसले  यांच्या हस्ते साळशिरंबे  येथे विविध विकास कामांचे उद्घाटन. ब्युरो रिपोर्ट - गौरव चोपडे. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.डॉ.अतुल भोसले (बाबा) यांच्या हस्ते साळशिरंबे, ता.कराड येथे 6 कोटी 8 लाख रु. विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडले. त्याच बरोबर गावातील 350 पात्र बांधकाम व इतर कामगार यांना भांडी संच व सेप्टि साहित्य संच पेटी वाटप करण्यात आले. आणि 400 पंतप्रधान आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले व साळशिरंबे भाजपा युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.         यावेळी, य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा.दयानंद पाटील (भाऊ), भाजपा युवा मोर्चा कराड द. अध्यक्ष मा.सूरज शेवाळे, टाळगावचे माजी सरपंच मा.आण्णासाहेब जाधव, सवादेचे माजी सरपंच मा.संजय शेवाळे, मलखेडचे उपसरपंच मा.युवराज पवार, मनवचे उपसरपंच मा.दादासो शेवाळे, स्व.जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था संचालक मा.हणमंतराव थोरात, ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचालक मा.मारुती शेवाळे, जिंती पोलीस पाटील मा.संतोष पाटील, महारुगडेवाडी उपसरपंच मा.अजित महारुगडे, येणपे सोसायटी सदस्य पै.सचिन ब...

खुडेवाडी येथे, मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकराणासाठी निधी.

Image
  खुडेवाडी  येथे, मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या  प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकराणासाठी  निधी.  उंडाळे -प्रतिनिधी. खुडेवाडी येथे, मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटी करण साठी 10 लाख रु. निधी टाकण्यात आला. त्याचे भुमिपूजन भाजपा सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, माजी उपसरपंच मा.वसंत मोहिते, माजी उपसरपंच मा.जयवंतराव यादव (आबा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, राजेंद्र खुडे, यशवंत खुडे, मोहन खुडे, बाजीराव घागरे, गणेश पाटील गडकर, संदीप आत्माराम खुडे, वैभव पाटील, सचिन थोरात, संतोष खुडे, राजेंद्र खुडे, गणेश खुडे उपस्थित होते.

सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची सहविचार सभा संपन्न.

Image
सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची सहविचार सभा संपन्न.   उंडाळे -प्रतिनिधी. सातारा जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची  सहविचार सभा मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत  नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संगमनगर सातारा येथे संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीलाच राज्याध्यक्ष  प्रमोद मोरे व प्रमुख अतिथींचे हस्ते  वडाच्या झाडाचे व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून  सभेला प्रारंभ करण्यात आला पाहुण्यांचा परिचय  राज्याच्या उपाध्यक्ष  सावंत मॅडम यांनी करून दिला. यावेळी बोलताना श्री मोरे म्हणाले पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण या क्षेत्रामध्ये सातारा विभागाचे काम संपूर्ण राज्यामध्ये उत्तम आहे या क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा नेहमी अग्रेसर असतो कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी अशाच पद्धतीने काम चालू ठेवून सातारा जिल्ह्याचे नाव पर्यावरण रक्षणामध्ये उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्षांच्या सहमतीने कार्यकारणी मध्ये सतीश राजे घाडगे, जगन्नाथ माळी व संजय कुलकर्णी यांची सदस्य ...

कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने झाडे लावण्याचे प्रात्यक्षिक.

Image
  कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने झाडे लावण्याचे प्रात्यक्षिक. कार्वे- प्रतिनिधी  जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने झाडे लावण्याचे प्रात्यक्षिक याचे मार्गदर्शन केले. ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत कृषिकन्या गावामध्ये कार्यरत करत असताना शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन विविध माहिती बद्दल मार्गदर्शन केले.  या प्रात्यक्षिकामध्ये कृषी कन्यांनी सांगितले की झाडे योग्य अंतरावर लावावे व झाडांची खोली योग्य असावी तसेच झाडांना जैविक व रासायनिक घटक योग्य प्रमाणात दिल्यास झाडांची वाढ पोषक होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, समन्वयक प्रा. डी. एस. भिलवडे, कार्यक्रमाधिकारी पी. पी.पाटील, प्रा.डॉ. डी.एस.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या वैष्णवी घोडके, सेजल हसबे ,श्रावणी गायकवाड, प्रेरणा हिले ,श्वेता बोंबे ,स्नेहल घाडगे, अस्मिता कोळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

Image
  कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन.  कार्वे - प्रतिनिधी. वडगाव हवेली येथे  जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना कृषी रसायने वापरताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. ग्रामीण जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत कृषिकन्या गावामध्ये कार्यरत करत असताना शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन विविध माहिती बद्दल मार्गदर्शन केले. कृषी रसायनामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आजार तसेच शरीरासाठी घातक असल्यामुळे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारे काळजी घेऊन कृषी रसायने व्यवस्थितपणे वापरावे यासाठी जागृत केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, समन्वयक प्रा. डी. एस. भिलवडे, कार्यक्रमाधिकारी पी. पी.पाटील, प्रा. पी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या वैष्णवी घोडके, सेजल हसबे ,श्रावणी गायकवाड प्रेरणा हिले ,श्वेता बोंबे ,स्नेहल घाडगे, अस्मिता कोळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि पंचशील करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने " समता फोर्स कॅम्प" संपन्न.

Image
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि पंचशील करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने " समता फोर्स कॅम्प" संपन्न. ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि पंचशील करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने " समता फोर्स कॅम्प " चे दि. 1/9/2024 ते दि. 7/9/2024आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा सांगता समारोप पंचशील करिअर अकॅडमी पलूस येथे संपन्न झाला.  कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर  बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मा. एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिसर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी समता फोर्स कॅम्पच्या जवानांनी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आणि आदरणीय एस के भंडारे साहेब यांना मानवंदना दिली.  यावेळी समता फोर्स कॅम्पच्या जवानांनी परेड, जुडो कराटे, लाठीकाठी चे प्रात्यक्षिक दाखविले. आदरणीय भीमराव आंबेडकर  यांचा सत्कार आयु. रवींद्रजी लोंढे आणि आ. रुपेश तामगावकर साहेब सांगली जिल्हा पूर्व आणि पश्चिमचे अध्यक्ष य...

वारणा विद्यालय सागांव येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

Image
  वारणा विद्यालय सागांव येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न. ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मधील विद्यार्थी शिक्षक दिन कार्यक्रम नियोजन व कार्यवाही व्ही.डी . पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली  केले गेले समारंभाच्या प्रारंभी श्री. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( भाऊ) संचालक डॉ. प्रकाश कांबळे , संचालक श्री. गजानन पाटील,संचालक रघुनाथ पवार यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन महात्मा ज्योतिबा फुले , व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संस्था अध्यक्ष व संचालक यांनी विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवकांना गुलाबपुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी शिक्षक नेहा नाकील ,आर्या नरळे,मनस्वी मोरे,मोनिका देसाई,स्वप्नाली लुगड,ऐश्वर्या माने ,पायल ,सानिका नाईक, कष्णाली लुगड, रिया माने , सलोनी कांबळे,आर्या वाघ ,अस्मिता माने आदि इ. 5 वी ते  9 वी विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले . विद...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे प्रसाद भागवत यांचे संवाद कौशल्य या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर गोष्टीचे ज्ञान हवे. तसेच संवाद कौशल्य ही असायला हवे कारण संवादामुळे आपण कोणत्याही क्षेत्रांमध्ये स्वतःची चांगली प्रगती करू शकतो. त्यामुळे कुठलीही नोकरी, व्यवसाय याठिकाणी संवाद कौशल्य हे आपल्याला एका उत्तम ठिकाणी पोहचवू शकते. म्हणूनच या व्याख्यानाचे विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रसाद भागवत यांनी संवाद कौशल्याचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच त्याचे महत्त्व व संवाद कौशल्यामध्ये आपल्या चेहऱ्याचे हावभाव, शरिराची  मुद्रा कशी असावी. व संवादामध्ये व्याकरण खूप महत्त्वाचे आहे हे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक विद्यार्थी...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे मनोज सोनी यांचे फार्मास्युटिकल प्रोडक्ट डेव्हलोपमेंट या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फार्मसीच्या विविध विषयातून फार्मसीचे ज्ञान तर मिळतच असते. पण इंडस्ट्रीमध्ये नेमके कसे फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार केले जातात, त्याच्यासाठी काय प्रोसेस असते, प्रोडक्ट  लॉन्च करण्यासाठी काय प्रक्रिया आहे. व विविध प्रकारचे प्रोडक्ट त्यासाठी लागणारे विविध परवाने, अधिकार तसेच त्या प्रोडक्टसचे महत्त्व व जनरिक व ब्रॅण्डेड प्रोडक्ट व पेटेंट याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मनोज सोनी हे सध्या ग्लेनमार्क फार्मास्युटिल लिमिटेड येथे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. यावेळी त्यांचे स्वागत  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा भोसले यांनी केले .

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात संपन्न.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात संपन्न. शिराळा -प्रतिनिधी.  वारणा विद्यालय  व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये  भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य  दिवस उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ए. आर.पाटील मॅडम यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. एम . डी. पाटील सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या समारंभास श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील (भाऊ ) व  संस्थेचे सर्व संचालक  श्री. भैरवनाथ दूध संस्था चेअरमन व सदस्य , श्री. भैरवनाथ पतसंस्था चेअरमन व सदस्य तसेच सागाव चे माजी उपसरपंच सत्यजित पाटील, सागाव मधील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या ध्वजारोहण समारंभ प्रसंगी राष्ट्रगीत  झेंडा गीत सारे जहाँ से अच्छा महाराष्ट्र गीत आदी समूहगीते सुरेल आवाजात सादर करण्यात आली तसेच सागाव ग्रामपंचायत ध...

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

Image
  स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. शिराळा -प्रतिनिधी (नानासाहेब कांबळे.) भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात देशभर साजरा केला. याच पार्श्वभूमीवर  गोंडवाना न्यूज परिवाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. गोंडवाना न्यूज परिवाराचे आधार प्रतीक्षा कांबळे व मीराताई कांबळे ,यांच्या सौजन्याने  प्राथ. शाळा, सिद्धार्थ नगर, आरळा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन गोंडवाना न्यूज परिवाराचे शिराळा प्रतिनिधी नानासाहेब कांबळे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी  आरळा गावचे ग्रामपंचायत सदस्य  माया कांबळे,निता कांबळे, माधुरी कांबळे, डॉ. विनोद झाडे, नंदा झाडे,रवि झाडे, करंगुली गावचे सरपंच आम्रपाली नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब शित्तूरकर, संत रोहिदास युवा महासं...

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न. शिराळा -प्रतिनिधी. वारणा विद्यालय  व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये शिक्षण सप्ताहांतर्गत सातवा दिवस समुदाय सहभाग दिवस उत्हासात पार पडला .वारणा विद्यालय  व ज्युनिअर कॉलेज सांगावच्या वतीने  प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत - भैरवनाथ  मंदिर परिसरात प्रथम  फेरी काढण्यात आली. तसेच विद्यालयाची विद्याजली  पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती अपलोड करण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे विद्यालयातील स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. त्यांची नावे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. याशिवाय पोस्टर मेकिंग, घोषवाक्य विषयी माहिती देण्यात आली. तसेच विद्यांजली कार्यक्रम माहिती देण्यात आली. वारणा विद्यालयातील विद्यार्थी -शिक्षकांच्या शिक्षण सप्ताहातील उत्स्फूर्त सहभागामुळे चैतन्य ,उत्साह निर्माण झाला. शिक्षण सप्ताहाच्या समारोहा प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ए.सी. सदावर्ते सरांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातू...

कोडोली प्रशाला येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.

Image
कोडोली प्रशाला येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन  उत्साहात संपन्न. कार्वे - प्रतिनिधी. भारती विद्यापीठाचे,हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली ता. कराड जि. सातारा येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचा ध्वजारोहण स्वातंत्र्यसैनिक कै. गोविंद विठू पाटील यांचे सुपुत्र व माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत पाटील व माजी सैनिक श्री. मोहन पाटील नेर्लेक  अण्णा  यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी पाटील (नाना) होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.मोरे आय.जे. यांनी आपल्या  मनोगतामध्ये  देशाचे संरक्षण  करणाऱ्या वीर सैनिकांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कोडोली येथे ध्वजारोहण करण्यात आले.   इ.8वी. ते इ.10 वी. मधील  वार्षिक परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्...

कोडोली हायस्कूल मध्ये PSI रोहित गुजर यांचा सत्कार.

Image
  कोडोली हायस्कूल मध्ये PSI रोहित गुजर यांचा सत्कार. कार्वे - प्रतिनिधी. भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली या प्रशालेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोडोली गावचे सुपुत्र रोहित शांताराम गुजर यांची पोलीस निरीक्षक (PSI) म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक मोरे आय.जे. सर यांच्या हस्ते  शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोहित गुजर यांनी  प्रशालीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते म्हणाले, माणसाने नेहमी प्रयत्नवादी राहावे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही. पहिल्या प्रयत्नात यश आले नाही म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे. यश नक्कीच मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदे मॅडम यांनी केले तर आभार आंबे सर यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशालेतील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,कोडोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच त्यांना पुढील वाटचालीस...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हाध्यक्षपदी मा.देवराज पाटील यांची निवड.

Image
  राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हाध्यक्षपदी मा.देवराज  पाटील यांची निवड.    शिराळा प्रतिनिधी -नानासाहेब कांबळे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हाध्यक्षपदी  मा. देवराज जनार्दन पाटील (दादा) यांची निवड  झाली. या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली  जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो.या निवडीबद्दल समाजातून शुभेच्छा दिल्या गेल्या यामध्ये ठाणे महानगर पालिकेचे सेवानिवृत्त लोकसेवक शरद माने (भाऊ) किरण आडके (भैय्या) पवन कांबळे, उमेश कांबळे, समस्त बौध्द समाज कासेगांव,तिरंगा ऑटोमोबाईल कासेगाव. यांचे कडून मा. देवराज पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांच हार्दिक अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इंगरूळ येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

Image
  इंगरूळ येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. शिराळा -प्रतिनिधी. इंगरूळ ग्रामविकास मंङळ मुंबई यांच्या विद्यमाने साहित्यरत्न अणाभाऊ साठे जयंती साजरी झाली . प्रतिमेचे पुजन आदर्श शिक्षक मा. लालासो भिंगारदिवे सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती शाहीर मा. सुकुमार पाटील, शाहीर मा. लक्ष्मण भिंगारदिवे पोतराज मामा . ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे . युवा सामाजिक कार्यकर्ते मा. जगनाथ दादा कांबळे ,मा.आनंदा कांबळे, मा. भानुदास कांबळे , मा. राज कांबळे, मा. तानाजी कांबळे, मा. रोहन कांबळे दिपक कांबळे यानी आभार मानले  व सर्व मुलांना वही पेन वाटत केले. त्याचबरोबर समस्त गावातील लोक उपस्थित होते.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,सागांव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,सागांव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न. शिराळा -प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी भारतीय स्वातंत्र लढ्यातील युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक रघुनाथ पवार यांच्या हस्ते संपन्न झाले,तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक डॉ .प्रकाश  कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत दादा पाटील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका ए.आर. पाटील मॅडम यांनी केले.या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील एस. एच. इंगवले सर यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल माहिती दिली. साहित्यरत्न लोकशा...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

Image
  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.   B.R.S.P च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं अभिवादन.    मुंबई - प्रतिनिधी. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुमन नगर चेंबूर या ठिकाणी स्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी B.R.S.P चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब अडांगळे,  शशिकांत सोनवणे, सतेश मस्के, धनंजय तूपलोंढे, प्रश्नांत आढाव, अमर भंडारे, आदित्य माने, प्रकाश कांबळे तसेच B.R.S.P पदाधिकारी उपस्थित होते.

साळशिरंबे ग्रामपंचायतीचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.

Image
  साळशिरंबे ग्रामपंचायतीचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान. उंडाळे -प्रतिनिधी. साळशिरंबे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने पंतप्रधान आवास घरकुल योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल जिल्हा परिषदेने घेत साळशिरंबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मा.शरद चव्हाण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी मा. शरद चव्हाण यांनी पंतप्रधान आवास घरकुल योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या या कामगिरीची दखल जिल्हा परिषदेने घेत साळशिरंबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महादेव घुले, प्रकल्प संचालक श्री.संतोष हराळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. जि.प.सातारा श्रीमती अर्चना वाघमळे,कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.  ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन...

कराड येथील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश.

Image
  कराड येथील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश. कराड - प्रतिनिधी : – कराड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल 96 कोटी 50 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे.  डॉ. अतुलबाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह कराड शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यानुसार कराड शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले सतत प्रयत्नशील होते. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याचबरोबर त्यांनी शासनाकडे स्टेडियमचा विकास आराखडाही सादर केला होता. अखेर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत...

भीम आर्मी संविधान रक्षक दल संघटनेच्या तडसर शाखेचे उद्घाटन.

Image
  भीम आर्मी संविधान रक्षक दल संघटनेच्या तडसर शाखेचे उद्घाटन. कडेगांव - प्रतिनिधी. भीम आर्मी संविधान रक्षक दल संघटनेच्या  तडसर शाखेचे उद्घाटन भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. उत्तरेश्वरजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीद घेऊन भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. प्रफुल्ल भाई शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण  महाराष्ट्रभर समाज जागृतीचे काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातही संघटनेचे काम दिवसेंदिवस वाढत आहे.  या ध्येयाने प्रेरित होऊन भीम आर्मी संविधान रक्षक दल तडसर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. उत्तरेश्वरजी कांबळे यांची होती. त्याचबरोबर मा. जगन्नाथ वाघमारे. सांगली जिल्हाध्यक्ष, मा. आबासो सोन ताटे.सांगली जिल्हा उपाध्यक्ष,मा. सूर्यकांत सरतापे. सांगली जिल्हा संघटक, मा. सुशील सोनताटे. कडेगाव तालुकाध्यक्ष, मा. दिलीप थोरात. कडेगाव तालुका उपाध्यक्ष, मा. नामदेव मोहिते.कडेगाव तालुका संघटक, मा. सुरज लादे. शाखाप्रमुख तडसर, ...

तुफान सेनेच्या पच्छिम महाराष्र्ट अध्यक्ष पदी सौ. पदमा चव्हाण यांची निवड.

Image
  तुफान सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सौ. पदमा चव्हाण यांची निवड. सातारा - प्रतिनिधी.  सातारा जिल्हातील मर्ढे येथील सौ.पदमा चव्हाण यांची तुफान सेनेच्या पच्छिम महाष्र्ट अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा. नितीनभाऊ बडेकर  यांच्या आदेशाने करण्यात आली.या निवडीसाठी अनुमोदन तुफान सेनेच्या राष्र्टीय उपाध्यक्ष सौ.सीमा यादव यांनी दिले.या प्रसंगी महाराष्र्ट राज्य अध्यक्ष मा.गोमटेश कोळके यांनी या निवडीचे स्वागत केले. या प्रसंगी तुफान सेनेच्या पच्छिम महाराष्र्ट अध्यक्षा सौ पदमा चव्हाण म्हणाल्या पच्छिम महाराष्र्टात तुफान सेनेचे काम झपाट्याने वाढवुन, पच्छिम महाराष्र्टात नवी क्रांती करणार आहे,सावित्री जिजाऊच्या लेखीना एकत्र करुन तुफान सेनेचे काम जोरदार करुन समाज्याला न्याय देणार आहे. तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते मा.समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी मला ही संदी दिली याचे सोने करुन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करेन,यावेळी तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर म्हणाले तुफान सेनेच्या नुतन पच्छिम महाराष्र्ट अध्यक्ष स...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व इंगरूळ ग्राम विकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने शाहू महाराज जयंती साजरी.

Image
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व इंगरूळ ग्राम विकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने शाहू महाराज जयंती साजरी. शिराळा - प्रतिनिधी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व इंगरूळ ग्राम विकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने शाहू महाराज जयंती साजरी.राजर्षी शाहू महाराज, गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना शालेय वस्तु व मिठाई वाटून जयंती साजरी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे, दीपक कांबळे, जगन्नाथ कांबळे, संदीप कांबळे सर, राजू जाधव सर,सतिश कांबळे, दादासो कांबळे, आनंदा कांबळे ,ब्रम्हा कांबळे, महिला भगिनी, विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. राजू जाधव, जगन्नाथ कांबळे व दीपक कांबळे यांनी शाहू महाराज  यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याविषयी आपले विचार व्यक्त केले. श्रेया  कांबळे हिने त्यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले.प्रास्ताविक दीपक कांबळे यांनी केले व आभार संदीप कांबळे यांनी मानले.

वारणा विद्यालय ज्युनिअर कॉलेज सांगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात.

Image
  वारणा विद्यालय ज्युनिअर कॉलेज  सांगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात. शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.) वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्येआंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.  प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी. सदावर्ते सर यांनी पतंजली योग समिती अध्यक्षा,सर्व सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्रास्ताविक क्रीडा शिक्षिका ए. आर. पाटील मॅडम यांनी केले.  आंतरराष्ट्रीय योगदिनी पतंजली योग समिती शिराळा अध्यक्ष विद्या पाटील मॅडम व माजी मुख्याध्यापक श्री . अरुण पाटील सर यांचेसह हंबीरराव कोरे अशोक साळुंखे किरण मिंचेकर के. वाय. पाटील मॅडम उत्तम काळगावकर सदाशिव वाघ आदींनी योग प्रात्यक्षिके आसने सूर्यनमस्कार आदी घेऊन योग दिन उत्साहात साजरा केला .योग दिन प्रार्थना मानेचे व्यायाम विविध आसने सूर्यनमस्कार प्राणायाम सूक्ष्म व्यायाम प्रकार शांतीपाठ या क्रमाने योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रकारे करून घेतली. या दिनास विद्यालयातील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते . सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना केळी , ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणते गुण व कौशल्य आत्मसात करायला हवीत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकता विकास सेल (EDC) अंतर्गत "सामाजिक कारणासह स्वयं-रोजगार" या विषयावर एक दिवसीय  व्याख्यान घेण्यात आले.  यावेळी देवदत्त पेशकर (प्रमुख ट्रेनिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट), सपना भोपाटे (जिल्हाप्रमुख जनरिक मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड), विश्वास पाटील, (जिल्हाप्रमुख, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह), जयकुमार तिदार यांची उपस्थिती होती. तसेच देवदत्त पेशकर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कारणे व स्वयंरोजगार या विषयाला उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रियांका माळी यांनी मानले.

मा.सत्यजीत‌ देशमुख यांच्या हस्ते अजिंक्य मोहिते याचा सत्कार संपन्न.

Image
  मा.सत्यजीत‌ देशमुख यांच्या हस्ते अजिंक्य मोहिते याचा सत्कार संपन्न. शिराळा - प्रतिनिधी.  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.श्री. सत्यजीत देशमुख यांच्या हस्ते अजिंक्य मोहिते याचा सत्कार करण्यात आला. श्री निनाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोकरूड मध्ये शिकणाऱ्या अजिंक्य मोहिते याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 87.40 गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. त्याला पालक ,वर्गशिक्षक श्री लोहार सर,किनरे मॅडम,संध्या पाटील मॅडम, मिनाक्षी पाटील मॅडम, जयश्री खोत मॅडम,बारगीर मॅडम,शंकर पाटील सर व मुख्याध्यापक श्री माने सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.कोकरूड येथील प्रख्यात कवी गुलाब मोहिते यांचा तो चिरंजीव आहे.

ग्रामपंचायत चिंचोली व भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा.

Image
  ग्रामपंचायत चिंचोली व भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा. शिराळा - प्रतिनिधी. ग्रामपंचायत चिंचोली व भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने  शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सरपंच  सौ. कविता पाटील, उपसरपंच सौ.रूपाली जाधव, ग्रामविकास अधिकारी मा. योगेश नाईक, यांनी शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन केले. पोलिस पाटील मा.भरत चव्हाण, माजी सरपंच नारायण जाधव, मा.बाबाजी घोलप, यंबू महाराज,  रोहीणी चव्हाण, अर्चना जाधव उपस्थित होते.

शिराळा तालुक्यात बारावी कला शाखेच्या निकालात वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागाव सर्वप्रथम.

Image
  शिराळा  तालुक्यात बारावी कला शाखेच्या निकालात वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागाव सर्वप्रथम. शिराळा - प्रतिनिधी.                                  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांवने एच. एस.सी. परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये उज्वल यश संपादन केले.वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव 12 वी  बोर्ड परीक्षेत 100%  निकाल नोंदविला तसेच विशेष म्हणजे शिराळा तालुक्यात कला शाखेत सर्वप्रथम सन्मान मिळवला.         वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांवची विद्यार्थ्यांनी कु. पाटील प्रणाली बाजीराव हिने 78 % गुण संपादित करून शिराळा तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळवला . तर विद्यालयातील कु. देसाई पल्लवी संपत तिने 76. 67 % गुण मिळवून शिराळा तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला .              वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज  सागांव ची शिराळा  तालुक्यातील गुणवंत कॉलेज म्हणून खास ओळख आहे. वारणा ज्युनिअर कॉलेज ने सन 2004 मध्ये...