Posts

Showing posts from March, 2021

मंद्रुळकोळे ग्रामपंचायतने 30 नळ कनेक्शन तोडली;1,66,455 घरपट्टी, पाणीपट्टी वसूल.

Image
  मंद्रुळकोळे ग्रामपंचायतने 30 नळ कनेक्शन तोडली;1,66,455 घरपट्टी, पाणीपट्टी वसूल. सातारा:पाटण तालुल्यातील मंद्रुळकोळे ग्रामपंचायतने आज पासून थकबाकीदार नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करत, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत च्या हद्दीतील 30 नळ कनेक्शन तोडण्याचा  कार्यक्रम पाटण पंचायत समिती विस्तारा आधिकरी संदीप कुंभार,टी टी थोरात, सरपंच अमोल पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे,व कर्मचारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.तसेच1,66,455 रुपये एवढा महसूल ग्रामपंचायतने वसूल केला असे ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे यांनी सांगितले.

कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर करणाऱ्या बँका,पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा --सागर पाटील.

Image
  कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर करणाऱ्या बँका,पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा  --सागर पाटील. सातारा : कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर सर्रासपणे चालू आहे तो त्वरित थांबवावा अशी मागणी माहिती  अधिकार व पत्रकार संरक्षण  आणि पोलीस मित्र समितीचे मंत्रालय व विधिमंडळ संपर्कप्रमुख श्री.सागर पाटील यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांना केली आहे.   आता मार्च महिना चालु आहे आणि आता या बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे सतत तगादा लावत आहेत.ही वसुली अशी चालू आहे की जणू काही मार्च महिन्यात जर कर्ज वसूल झाले नाही तर हे सगळेजण जणू दिवाळखोरीत जाणार आहेत.१०० पैकी ९० लोक कर्जाची वेळेवर परतफेड करतात,१० % लोक वेळेवर कर्ज भरत नसतीलही पण याचा अर्थ असा नाही की कर्जवसुलीसाठी कोणत्याही थराला जायचे. या बँकांनी आणि फायनान्स कंपन्यानी गुंड लोकांना वसुलीचा ठेका दिलेला आहे.हे गुंड प्रवृत्तीचे लोक लोकांना इतका मानसिक, शारीरिक त्रास देतात की या गुंडाच्या त्रासाला कंटाळून  आत्महत्या करतात याला जबाबदार कोण ? हे गुंड लोक की त्याना कामाव...

मिनी राईस मिल, मिनी राइस मिल

Image
  मिनी राईस मिल. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल, राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- भात या कर्यक्रमामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे- नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली. या 8 जिल्ह्या मध्ये मिनी राइस मिल ही योजना राबविण्यात येत आहे. दुर्गम भागामध्ये भात भरडाई केंद्राची(राइस मिल) पूरेशी उपलब्धता नसल्याने शेतकरी यांना भात भर डाई साठी अडचणी निर्माण होतात. सदर समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण  भागात विजेवर तसेच विजेशिवाय चालणारे मिनी राइस मिल चा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. अनुदान- मिनी राइस मिल साठी येणारा प्रत्यक्ष खर्चाच्या कृषि यांत्रिकीकरण उपअभियानच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 60 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख इतके अनुदान या योजनेत देय आहे. तसेच कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत सर्व जिल्हांसाठी मिनी राईस मिल साठी अनुदान आहे. अनुदान- अल्प/अत्यल्प/महिला/अजा/अज भूधारक - ६० टक्के किंवा कमाल रुपये २. ४० लाख बहू भूधारक - ५० टक्के किंवा कमाल रुपये २. ०० लाख  अर्ज कोण करू  शकतात- शेतकरी/महिला गट अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्याल...

कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत- वित्त पुरवठा सुविधा

Image
  कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत- वित्त पुरवठा सुविधा. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल. योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात- 1. शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप्स 2. संस्था-  विविध कार्यकारी सहकारी संस्था (प्राथमिक कृषी पत संस्था  सहकारी पणन संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO),  बहूउद्देशीय सहकारी संस्था,  3. गट- स्वयंसहायता गट, संयुक्त दायीत्व गट 4. केंद्रीय/राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेले सार्वजनिक-खाजगी भागिदारी प्रकल्प योजनेचा लाभ काय आहे- अ. काढणी पश्चात पायाभूत सुविधा उदा.गोदाम,पैक हाऊस,कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया केंद्र, वाहतुक सुविधा इ . साठी बँके कडून कर्ज मिळेल आणि या कर्जावर 3 टक्के व्याजात सवलत मिळेल. ब. रु. 2 कोटी पर्यंतच्या कर्जावर पत हमी. क. ज्यांना प्रथम कर्ज वितरण 8 जुलै 2020 किंवा त्यानंतर झाले असेल असे प्रकल्प व्याजदर सवलतीस पात्र आहेत. ड. या प्रकल्पांना इतर योजनेतून ही अनुदान मिळू शकेल. हे अनुदान प्रवर्तकाचा प्रकल्पातील आर्थिक हिस्सा म्हणून गणला जाइल. मात्र, प्रवर्तकाला प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के हिस्सा स्वनिधीतून देण...

श्री कम्युनिकेशन चा उद्घाटन सोहळा संपन्न.

Image
  श्री कम्युनिकेशन चा उद्घाटन सोहळा संपन्न. सातारा: प्रतिनिधि, श्री कम्युनिकेशन या नवीन संस्थेचा उद्घाटन सोहळा जि. प. कॉलनी म्हसवे रोड करंजे पेठ सातारा येथे सोमवारी पार पडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  हेरंब प्रतिष्ठान चे संस्थापक नाना इंदलकर, व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवराज कोळी, विकी गरुड,सुजित लोखंडे,सागर लोखंडे उपस्थित होते. तसेच अरुणा लोखंडे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन केले. या कार्यक्रमास सोसायटीचे सर्व संचालक प्रहार अंपग संघटनेचे अध्यक्ष व महिलावर्ग उपस्थित होते.

अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Image
  अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.      शिराळा - प्रतिनिधि,  शिराळा येथील नवजीवन वसाहत मध्ये सर्जेराव कल्लाप्पा कांबळे अनेक वर्षापासून राहत असून त्यांच्या घरा समोरील बाजूस शब्बीर हामजु मुंडे राहत आहेत. अनेक वर्षापासून  आपल्या समोरील महाराष्ट्र शासनाच्या जागेत अतिक्रमण करत आहेत त्यामुळे सर्जेराव कांबळे यांना मानवी अधिकारापासुन वंचित राहावे लागत आहे.वाळू, दगड, घरगुती साहित्य इ. वारंवार रस्त्यामध्ये ठेवत आहेत. तिथून ये-जा करणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत असून याबद्दल अनेक छोट्यामोठ्या तक्रारी झालेल्या आहेत. तरीही मुंडे ऐकत नाहीत.जाणुन बुजून रोज भांडण तंन्टा करत आहेत  मुंडेंच्या अशा वागण्यामुळे सर्जेराव कांबळे यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु शिराळा नगरपंचायत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून मुंडे यांची पाठराखण करीत असल्याचा संशय येत आहे. तरी सर्जेराव कांबळे यांनी आज दिनांक २२ मार्च २०२१ रोजी नगरपंचायत शिराळा मुख्याधिकारी यांना भेटून अतिक्रमण हटवण्यासाठी दाद मागितली आहे. दाद न मिळाल्यास सामाजिक संघटना उभ्या करून त्यांच्यामार्फत...

159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  159 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित. सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 159  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातीलसातारा 9, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  सदरबझार 2, सैदापूर 2, रामाचा गोट 1, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपुरा पेठ 1, गोडोली 4, कुपर कॉलनी 1, दौलतनगर 1, करंजे 2,  पिरवाडी 1, शाहुपुरी 1,  निनाम पाडळी 1, वनवासवाडी 1,  कोनेगाव 1, मल्याचीवाडी 1,  खोजेवाडी 1, तांबवे 1, यतेश्वर 1, सरजापूर 1, खोजेगाव 1,  निसरे 1. कराड तालुक्यातील शनिवार पेठ 1, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  उंब्रज 1, ओंड 2, शेरे 1,  रेठरे खुर्द 2, वानखन रोड 1,  वाखन 1, वडगाव हवेली 1, भिकवाडी 1, मलकापूर 5, विद्यानगर 1, शामगाव 1, आगाशिवनगर 1, गोळेश्वर 1, सुपने 1.   फलटण तालुक्यातील पवार गल्ली 1, संजीवराजे नगर 1, लक्ष्मीनगर 1,  निंबळक 1, मल...

संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान.

Image
  संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान.   महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या "विकेल ते पिकेल" या संकल्पनेवर आधारीत. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान. अभियानाचा ऊद्देश- 1.शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मुल्यसाखळी संवर्धित करणे. 2. बाजारामध्ये शेतकर्याच्या मालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करुन देणे. या अभियानाचे समन्वय व सनियंत्रण कोणत्या विभागामार्फत होते- राज्यस्तर- संचालक आत्मा व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ  जिल्हास्तर-प्रकल्प संचालक आत्मा व विभागीय उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ तालुका स्तर- तालुका कृषी अधिकारी अभियान राबविण्याचे नियोजन- 1. शेतकऱ्यांमध्ये जागृती- पुरवठा साखळी अविरतपणे कार्यरत ठेवण्यासाठी व ग्राहकांच्या मागणी प्रमाणे पुरवठा होण्यासाठी, थेट विक्रिकरीता इच्छुक असणार्या शेतकरी यांचेमध्ये लागवड क्षेत्राचे नियोजनाबाबत, वाण निवडीबाबत, निविष्ठा वापराबाबत व बाजारात असलेल्या मागणीबाबत जाणिव व जागृती निर्माण करण्यात येईल. 2. श...

एकरकमी फि भरायला लावणाऱया शाळेवर कारवाई करा. _______डॉ.गिरीष देशपांडे यांची मागणी.

Image
  एकरकमी फि भरायला लावणाऱया शाळेवर कारवाई करा. _______डॉ.गिरीष देशपांडे यांची मागणी. कराड / वार्ताहर  लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासुन शाळा बंद असतानाही शिक्षण मंडळ कराड संचलित इंग्लिश मिडीयम स्कुलने 2 हराज रूपयांची सुट देतो पण एकरकमी फि भरा असे आदेश दिल्याने सर्वसामान्य पालक अडचणीत आले आहेत. या विरोधत प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी पालक डॉ.गिरीष देशपांडे यांनी केली आहे.  याबाबत नायब तहसिलदार आनंद देवकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर पंढरीनाथ माने व राजीव शहा यांच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रत गटशिक्षण अधिकाऱयांना देण्यात आली आहे. निवेदनात म्ह्टल्याप्रमाणे शहरातील थोर विभुतींनी शिक्षण मंडळ कराडची स्थापना केली.कै.डॉ.रा.गो.प्रभुने सरांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आयुष्यभर काम केले. अशा संस्थेच्या संचालकांनी किमान सध्य स्थितीतील पालकांच्या अर्थीक परीस्थीतीचा विचार करून फि बाबत निर्णय घेणे आवश्यक होते.   गेली वर्षभरापासुन शाळा बंद आहेत.. अशावेळी ऑनर्लान शिक्षणाज्च्या नावाखाली खाजगी शाळा फि वसुल करीत आहेत. फि वसुलिबाबत शिक्षण विभागाने कोणताही आदेश दिलेला नाही. ...

28 मार्च रोजी भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन. " महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी मा. रणधीरजी अल्हाट यांची प्रमुख उपस्थिती".

Image
  28 मार्च 2021 रोजी भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन.   " भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी  मा. रणधीरजी अल्हाट  उपस्थितीत राहणार ". कराड  -  प्रतिनिधि, (विनोद कांबळे)        सातारा जिल्हा भीम आर्मी यांच्यावतीने    28मार्च 2021 रोजी भीम आर्मी जिल्हा सातारा आढावा बैठक  शासकीय विश्राम गृह कराड येथे सकाळी   ११.०० वाजता   आयोजित करण्यात आलेली आहे.  या बैठकीस प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी भीम आर्मी मा.  रणधीरजी अल्हाट तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. जावेदजी नायकवडी व सातारा जिल्हा अध्यक्ष मा.संतोषजी थोरावडे,सातारा  जिल्हा प्रचार प्रसिद्धीप्रमुख  मा. प्रा.( डॉ )विनोद कांबळे यांची असणार आहे . घरोघरी भीम आर्मी या अभियाना संदर्भात अभियानाची आज  पर्यंतच्या उदिष्टपुर्तीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे तसेच भीम आर्मी या अभियानासंदर्भात होणार्या २१ कलमी  कार्यक्रमास  संदर्भात मार्गदर्शन केले जाणार...

शिराळा तालुक्यामध्ये धर्मजागृती अभियानाला सुरुवात.

Image
  शिराळा तालुक्यामध्ये धर्मजागृती अभियानाला सुरुवात.    शिराळा - प्रतिनिधि,           संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने    द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत धम्म जागृती अभियान सुरू झाले असून शिराळा तालुक्यातील चिंचोली या गावी अभियानाची सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष अशोक घोलप , संतोष घोलप , विश्वास घोलप , सुरेश घोलप  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घोलप यांनी केले. चिंचोली गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी विद्रोही कला मंच यांच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला. संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे यांनी धम्माची माहिती देऊन लवकरच चिंचोली बरोबरच शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दीक्षा समारंभ आयोजित करणार असल्याची घोषणा केली. यावेळी पोपट बनसोडे, शंकर कांबळे , सुशांत कांबळे , अजित सुतार उपस्थित होते.

327 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु.

Image
  327 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु. सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 327 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 15, सैनिक स्कूल 8,  मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, कोंढवे 1, रामाचा गोट 1,  गडकर आळी 1, केसरकर कॉलनी 5, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, गोळीबार मैदान 1,   देवी कॉलनी 1, सदर बझार 2, संगमनगर 1, यादोगोपाळ पेठ 1, धनगरवाडी 1, मल्हार पेठ 2, शाहुपुरी 1, राधिका रोड 1, कोडोली 1, करंजे 1, संभाजीनगर 1, जकातवाडी 2, देगाव 1, वाढे 1, नेले 1, माहुली 1, आरळे 1, कोटेश्वर 2, कुसुंबी 1, शिवथर 3, नुणे 3, कामठे 3, किडगाव 1, वेण्णानगर 1, अडुळ 1, दरे 3, अतित 1. कराड तालुक्यातील कराड 5, शिवाजी चौक 1, शुक्रवार पेठ 1, किन्हई 1, कार्वे नका 1, सैदापूर 1, हजारमाची 1, मलकापूर 2, मसूर 3, कार्वे 5, वडगाव हवेली 1, आगाशिवनगर 1, कालगाव 1. फलटण तालुक्यातील  फ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना  राष्ट्रीय कृषी विकास  योजने अंतर्गत  ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना  योजनेचा उद्देश- भाजीपाला उत्पादनाला  प्रोत्साहन देऊन शेतकऱयांचे उत्पन्न वाढविणे.  भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती करणे  अनुदान कशासाठी मिळणार - नवीन रोपवाटिका तयार करण्यासाठी.  प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची कांदा इ.व इतर भाजीपाला पिकांची रोपे तयार करता येतील. रोपवाटिकेमध्ये काय असणे आवश्यक - १. शेडनेटहाऊस (१००० चौ.मी.)  २. पॉली टनेल  (१००० चौ.मी.) ३. पॉवर नॅपसॅक स्प्रेअर-१ ४. प्लास्टिक क्रेट्स-६२  कोण लाभार्थी पात्र आहेत - १. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान एक एकर जमीन असणे आवश्यक. २. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी. ३. महिला कृषी पदवीधारक यांना प्रथम प्राधान्य.  ४. महिला गट/महिला शेतकरी यांना  व्दितीय प्राधान्य.  ५.  भाजीपाला उत्पादक अल्प व अ...

229 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  229 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित . सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले   असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 5, विकासनगर 3, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, शाहुनगरी 1, गोडोली 1, करंजे 1, शाहुपुरी 3, गोळीबार मैदान 3, अजिंक्य कॉलनी 1, कोंढवे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1, कृष्णानगर 1, सैनिक स्कूल 1, मोळाचा ओढा 2, सदरबझार 5, पोगरवाडी 1, भिसे 1, क्षेत्रमाहुली 1, ठोसेघर 1, वाढे 1, दरे 6, खेड 1, शिवथर 1, देगाव 1, सैदापूर 2, इंदोली 1, वासोळे 1. कराड तालुक्यातील कराड 1, रविवार पेठ 8, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 2, गायकवाडी 2, मलकापूर 4, कार्वे नाका 1, वाखण 1, म्‌होपरे 1, काले 1, साळशिरंभे 1, सुरली 1, चाचेगाव 1, फलटण तालुक्यातील जाधववाडी 4, कोळकी 1, कसबा पेठ 3, रविवार पेठ 1, मलठण 4, बारव बाग लक्ष्मीनगर 1, विद्यानगर 1, मारवाड पेठ 2, तरडगाव 8, शिंदेवाडी 1, खराडेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, हिंगणगाव 1, सोनगवडी 1, कोरे...

महाडचा सत्याग्रह, समतेच्या संगराचे प्रथम पाऊल. (भिमराव परघरमोल)

Image
  महाडचा सत्याग्रह, समतेच्या संगराचे प्रथम पाऊल.                   _______भिमराव परघरमोल.     अकोला -  भिमराव परघरमोल.                डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी दोन दिवस महाडला अस्पृश्य समाजाची परिषद घेऊन, दुसऱ्या दिवशी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः एक ओंजळभर आणि नंतर इतरांनी त्या पाण्याला स्पर्श करून थोडे थोडे पाणी प्राशन केले. त्यानंतर ते तळे सर्वांसाठी खुले झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. ती परिषद आणि सत्याग्रह त्यांच्या चळवळीच्या इतिहासातील समतेच्या संगराचे ते प्रथम पाऊल ठरले.            आजच्या समतेच्या संगर दिनानिमित्त आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची त्या परिषद तथा सत्याग्रहामागील भूमिका व त्यावेळेच्या उच्च जातीतिल स्पृश्य सवर्णांची मानसिकता समजून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाणी मिळत नव्हते असा काही प्रश्न नव्...

132संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  132संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित. सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 132 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले   असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 14, मंगळवार पेठ 2, करंजे पेठ 1,सैदापूर 1, तामाजाईनगर 1,मोळाचा ओढा 1,अतित 4, जांब कीकली 1,गलमेवाडी 1, खेड 1, मळ्याचीवाडी 1, चिंचणेर वंदन 1, वाळुत 1, कराड तालुक्यातील कराड 1,गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 3,जलगेवाडी 1, गोळेश्वर 2, कोयना वसाहत 2,पेरले 1, वाखन रोड 1, तारुख 1, कर्वे नाका 1, अटके 1,येनपे 1, फलटण तालुक्यातील फलटण 1, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, मलटण 1,लक्ष्मीनगर 4, सातेफाटा 3, निंबळक 1, निंभोरे 9, पुजारी कॉलनी 1,सांगवी 1, खुंटे 1, वाठार निंबाळकर 1, सोनवडी खुर्द 1,काळज 1, तरडगाव 4, खटाव तालुक्यातील खादगुण 1, कळंबी 1,  चापरडे 1, राजापुर 1, ललगुण 1, मायणी 2, औंध 2,  वडगाव 1,येळीव 1, राहटणी 1, उचिटणे 1,निमसोड 1, माण तालुक्यातील वावरहिरे 1, पळशी 1, दहिवडी 1,मार्डी 1,राजवडी 2,...

ताडपत्री न झाकता रेती वाहतुक नाहक दुचाकी स्वारांना त्रास, प्रशासन शांत.

Image
  ताडपत्री कींवा प्लास्टिक अच्छादन  न करता रेती वाहतुक. "नाहक दुचाकी स्वारांना त्रास, प्रशासन शांत ."       उंडाळे- प्रतिनिधि, (प्रदिप पाटील)      कराड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात  विट्भट्टीसाठी नदि पात्राच्या लगतच्या परिसरातुन रेतीची वाहतूक केली जात आहे. यामध्ये रेती वाहतुकदारांकडून शासन नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. ताडपत्री न झाकता रेती वाहतूक करण्यात येत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.    याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.ट्रॅक्टर किंवा ट्रकच्या मागील टपात रेतीची वाहतूक होते. त्यावर ताडपत्री झाकून रेतीची वाहतूक करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कराड दक्षिणच्या बहुतांश ग्रामीण भागातील विट्भट्टी चालक  हे नियम पायदळी तुडविले जात आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.  राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जून २००२ मध्ये परिपत्रक निर्गमित करुन गौण खनिजाची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरच्या पल्ल्याची उंची  न वाढवून ताडपत्री झाकण्याचे निर्देश आहेत. ताडपत्री लावणे तर दूरच परंतु पल्ल्याची उंची व...

अपनी मंडी / ग्रामीण बाजार (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)

Image
  अपनी मंडी / ग्रामीण बाजार (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत ) ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील.       फलोत्पादीत उत्पादने ही नाश वंत स्वरुपाची असुन त्यांची तात्काळ विक्री होणे आवश्यक असते. मध्यस्थांचे वर्चस्व कमी करुन शेतकरी यांना जादा पैसे मिळवून देण्यासाठी तसेच ग्राहकासही वाजवी किमतीत शेतिमाल उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकरी यांना शेतिमाल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. या उद्देशाने ही पणन सुविधा उभारणीसाठी अर्थ्साह्याची योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत ग्राम स्तरापासून जिल्हा स्तरा पर्यंत ग्रामीण बाजार/थेट बाजार/अपनी मंडी यासाठी विक्रीसाठी ओटे,शेड व गाळे बांधणे, शीत गृहा द्वारे किंवा इतर योग्य पद्धतीची साठवण क्षमता निर्माण करणे, मालाची प्रतवारी, पैकिंग, मोजमाप, लिलाव केंद्र, सांडपाणी व्यवस्था, टाकाऊ मालाचा निचरा/चक्रीकरण सुविधा, पिण्याचे पाणी इ .सूविधा स्थापन करण्या साठी अर्थ सहाय्य देय राहिल.  माप दंड-  अधिकतम  ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.25 लाख. अर्थसहाय्याचे स्वरुप-  ग्रामीण बाजार/अपनी मंडी/ थेट बाजार यासाठी येणारे खर्चा...

कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लाभ द्या - पालकमंत्री बाळासाहेब पाटील.

Image
  कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लाभ द्या        - पालकमंत्री बाळासाहेब पाटील. सातारा दि.18 (जिमाका): कृषी विभाग हे शेतकऱ्यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या ज्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजु शेतकऱ्यांना द्यावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, पाणी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, कृषी विभागातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना औजरांचे वाटप केले जाते त्या औजरांचा वापर होतो का नाही याची पाहणी कृषी विभागाने करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. काळया गव्हाची लागवडीला प्रोत्स...

उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी यांच्यातर्फे वीजबील माफीसाठी निवेदन.

Image
  उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना,  शेतकरी यांच्यातर्फे  वीजबील माफीसाठी निवेदन. उंडाळे-  प्रतिनिधी. उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना,  शेतकरी यांच्या माध्यमातून घरगुती, शेती पंपाच्या विज बिले माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले.  उंडाळे परिसरातील गेल्या तीन वर्षामध्ये अतिवृष्टी व गेल्या वर्षभरापासुन कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुर्णपणे उध्दवस्त झाला असुन, आज शेतक-याला शेतीसाठी सरकारकडुन अर्थिक मदतीची गरज असताना.सरकार व महावितरण विभागाचे कर्मचाऱ्यांकडुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडत असुन शेतकऱ्यांची घरगुती व शेती पंपाची विज बिले भरण्यासाठी सक्ती केली जात असत कोणतेही कनेक्शन न तोडता विज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावीत. तसेच उंडाळे सबडिव्हीजन मधील शेती पंपाची विज बिले रिडींग प्रमाणे देण्यात यावी , येळगाव शेती फिडर MERC फिडर जाहिर करण्यात आला असुन तो पुर्वरत करण्यात यावा.अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना , स्थानिक शेतक-यांकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दे...

303 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू.

Image
  303 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू. सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 303 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 7, शनिवार पेठ 1, दौलतनगर करंजे 1, देवी कॉलनी 2, सदर बझार 1, गोडोली 2, कोडोली 3, यादोगोपाळ पेठ 1, एमआयडीसी 2, विसावा नाका 1, शिवाजी सोसायटी 1, गुरुवार पेठ 1, शाहुपुरी 3, अंगापूर वंदन 1, मल्हारपेठ 3, देगाव 2, सैदापूर 1, जाखणगाव 1, लिंब 2, कराड तालुक्यातील कराड 2, गुरुवार पेठ 1, सदाशिवनगर 1, कार्वे नाका 1, कोयना वसाहत 1, विद्यानगर 3, मलकापूर 5, घोगाव 1, ओंड 1, बिचुद 1, वडगाव हवेली 1, कार्वे 1, खुबी 1 , फलटण तालुक्यातील फलटण 2, कसबा पेठ 2, डी.एङ चौक 1, कोळकी 3, हडको कॉलनी 1, गोळीबार मैदान 2, पुजारी कॉलनी 1, लक्ष्मीनगर 2, दत्तनगर 1, जाधववाडी 2, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, स्वामी विवेकानंद नगर 1, अरडगाव 1, तांबवे 1, वाठार निंबाळकर 1, शिंदेवाडी 2,...

308 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू.

Image
  308 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू. सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 15, रविवार पेठ 3, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, देशुख कॉलनी 3,यादोगोपाळ पेठ 1, पंताचा गोट 2, कृष्णानगर 2, संभाजीनगर 1, गोडोली 2, सदरबझार 7, नागठाणे 2, जुनी एमआयडीसी सातारा 1, पळशी 1, पिंपोडा , देगाव फाटा 1, मोळाचा ओढा 1,  शाहुनगर 2, लिंब 1, जैतापूर 2,     कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, आटके 2, गोवारे 1, मलकापूर 2, तांबवे 2, कोयना वसाहत 1, काले 1, आगाशिवनगर 1, मसूर 1, पाली 1, गोळेश्वर 1, कर्वे नाका 1, कोंढवे 1,    पाटण तालुक्यातील नेरले 1, पाटण 1, खोजावडे 1,  फलटण तालुक्यातील फलटण 11, नारळी बाग 1,आदर्की बु 1, लक्ष्मीनगर 5, सगुणा माता नगर 1, साखरवाडी 1, सातेफाटा 1, विढणी 3, निंभोरे ...

सातारा जिल्ह्यात बहुजन समाजात घराघरात भीम आर्मीचा कार्यकर्ता तयार करणार. सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे.

Image
सातारा जिल्ह्यात बहुजन समाजात घराघरात  भीम आर्मीचा कार्यकर्ता तयार करणार.       _  सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे. "   भीम आर्मीचे १५ मार्च पासून घर घर चलो सदस्यता अभियान."   कराड -प्रतिनिधी (विनोद कांबळे) मा. कांशीराम साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने १५ मार्च ते ३० मार्च या पंधरवड्यात घर घर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाणारे कांशिराम साहेब  यांच्याविषयी माहीती देतानाचे विविध कार्यक्रम  यावेळी राबविण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते  रमाकांत तायडे यांनी दिली होती.  याच अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये बहुजन समाजात घरोघरी भीम आर्मीचा कार्यकर्ता निर्माण करणार असं प्रतिपादन  भीम आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांनी केलं. कांशीराम साहेब यांच्या जन्मदिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते या वेळेला कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते.

कुक्कुट ,कोंबडी पालन (पोकरा अंतर्गत)

Image
  कुक्कुट ,कोंबडी पालन (पोकरा अंतर्गत) "नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- परसातील कुक्कुटपालन." ब्यूरो  रीपोर्ट - प्रदिप पाटिल. अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -  ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फ़ोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधिल महिला शेतकरी.                                                  ब) अर्थसहाय्य किती मिळते-  खुल्या प्रवर्गातील ;लाभार्थ्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के (कमाल रु. ८५००) व अनुसूचित जाती/जमातीतील लाभार्थी साठी प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के (कमाल रु. १२७५०)अनुदान देय आहे.  एका लाभार्थ्याने १०० पक्षी खरेदी करून निवारा सोया केल्यास पक्षी खरेदी साठी रु. १०००० व निवारा यासाठी रु. ७००० असा एकूण १७००० मापदंड आहे. .  सर्वसाधारणपणे देशी वाणाच्या कोंबडीची चार आठवडे वयाची पिल्ले देणे अभिप्रेत आहे. चार आठवडे वयाच्या एका पिल्लाची किंमत रु.100...

141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू.

Image
  141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू.   सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 2, गोडोली 2, पंताचा गोट 2, रामाचा गोट 1, शाहुपुरी 1, संगमनगर 1, बेंडवाडी 1, दरे खु 1, सदरबझार 3,  नागठाणे 1, वनवासवाडी 1, खेड 1, कराड तालुक्यातील कराड 1, कोल्हापूर नाका 1, कोयना वसाहत 2, सैदापूर 1, अटके 1, शिवदे 1, आगाशिवनगर 1. पाटण तालुक्यातील विहे 1, किली मोरगिरी 1, फलटण तालुक्यातील फलटण 6, मलठण 3, लक्ष्मीनगर 2, उमाजी नाईक चौक 1, गोळीबार मेदान 2, पोलीस कॉलनी 1, कोळकी 1, जाधववाडी 2, घाडगेवाडी 3, काळज 2, तरडगाव 32, निंभोरे 1, गोखळी 1, आळजापूर 1, होळ 1, खडकी 1, सांगवी 2, पाडेगाव 1, खटाव तालुक्यातील खटाव 1, मायणी 1, विसापूर 1, बुध 1, वडूज 3, शिंदेवाडी 1, येळीव 1, माण तालुक्यातील पळशी 1, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरे...