ग्रामपंचायतीच्या मार्फत ई निविदा(टेंडर) काढणे अत्यावशक..
ग्रामपंचायतीच्या मार्फत ई निविदा(टेंडर) काढणे अत्यावशक..
ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल
गावामध्ये करण्यात येणारी विविध विकासकामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत असून, त्यासाठीची आवश्यक निविदा प्रक्रियाही ग्रामपंचायतीमार्फतच केली जात होती. राज्य सरकारने मार्च २०१५ मध्ये काढलेल्या सुधारित आदेशांनुसार जिल्हा परिषद स्तरावरील कामांसाठी ‘ई-टेंडर’ काढण्यात येणार असल्याने गावाची विकासकामे अधिक पारदर्शकतेने होऊ शकणार आहेत.
फेब्रुवारी २००९ रोजी या पूर्वीच्या शासनाने अध्यादेश काढून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी उत्पन्न गटानुसार विकासकामांच्या निविदा काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला देण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायत गावातील विकासकामांसाठी निविदा मागवून विकासकामे केली जात होती. त्यामुळे गावात किती विकासनिधी आला, किती काम झाले, ते काम व्यवस्थित होते की नाही आदी कामेही ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी पाहत होते.
यामुळे या विकासकामांवर ग्रामपंचायतीसह गावातील नागरिकांचेही नियंत्रण होते. मात्र, असे असतानाही गावांच्या विकास कामात भ्रष्टाचार होऊन गावातील विविध विकासकामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ झाली होती. राज्य सरकारने नवीन अध्यादेशामुळे सर्व कामांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर ‘ई-टेंडर’ पद्धतीने निघणार असल्याने विकासकामे भ्रष्टाचार विरहित होणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार-खासदार निधी यातून होणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता येणार आहे.
निविदा ई-टेंडर पद्धतीने निघणार असल्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन गावातील विकास कामे दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.

Comments
Post a Comment