उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी यांच्यातर्फे वीजबील माफीसाठी निवेदन.

 उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना,  शेतकरी यांच्यातर्फे  वीजबील माफीसाठी निवेदन.






उंडाळे-  प्रतिनिधी.

उंडाळे येथील महावितरण विभागाच्या कार्यालयास बळीराजा शेतकरी संघटना,  शेतकरी यांच्या माध्यमातून घरगुती, शेती पंपाच्या विज बिले माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 उंडाळे परिसरातील गेल्या तीन वर्षामध्ये अतिवृष्टी व गेल्या वर्षभरापासुन कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुर्णपणे उध्दवस्त झाला असुन, आज शेतक-याला शेतीसाठी सरकारकडुन अर्थिक मदतीची गरज असताना.सरकार व महावितरण विभागाचे कर्मचाऱ्यांकडुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडत असुन शेतकऱ्यांची घरगुती व शेती पंपाची विज बिले भरण्यासाठी सक्ती केली जात असत कोणतेही कनेक्शन न तोडता विज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावीत. तसेच उंडाळे सबडिव्हीजन मधील शेती पंपाची विज बिले रिडींग प्रमाणे देण्यात यावी , येळगाव शेती फिडर MERC फिडर जाहिर करण्यात आला असुन तो पुर्वरत करण्यात यावा.अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना , स्थानिक शेतक-यांकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.

 यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष पंजाबराव पाटिल, उदय पाटिल उंडाळकर, धनाजी पाटिल, मिलिंद पाटिल, सागर जाधव , धनाजी देशमुख,आबासो शेंडगे, व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .