अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


 अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.



    शिराळा - प्रतिनिधि,

 शिराळा येथील नवजीवन वसाहत मध्ये सर्जेराव कल्लाप्पा कांबळे अनेक वर्षापासून राहत असून त्यांच्या घरा समोरील बाजूस शब्बीर हामजु मुंडे राहत आहेत. अनेक वर्षापासून  आपल्या समोरील महाराष्ट्र शासनाच्या जागेत अतिक्रमण करत आहेत त्यामुळे सर्जेराव कांबळे यांना मानवी अधिकारापासुन वंचित राहावे लागत आहे.वाळू, दगड, घरगुती साहित्य इ. वारंवार रस्त्यामध्ये ठेवत आहेत. तिथून ये-जा करणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत असून याबद्दल अनेक छोट्यामोठ्या तक्रारी झालेल्या आहेत. तरीही मुंडे ऐकत नाहीत.जाणुन बुजून रोज भांडण तंन्टा करत आहेत  मुंडेंच्या अशा वागण्यामुळे सर्जेराव कांबळे यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु शिराळा नगरपंचायत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून मुंडे यांची पाठराखण करीत असल्याचा संशय येत आहे. तरी सर्जेराव कांबळे यांनी आज दिनांक २२ मार्च २०२१ रोजी नगरपंचायत शिराळा मुख्याधिकारी यांना भेटून अतिक्रमण हटवण्यासाठी दाद मागितली आहे. दाद न मिळाल्यास सामाजिक संघटना उभ्या करून त्यांच्यामार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा स्वरूपाचे पत्र सर्जेराव कांबळे यांनी नगरपंचायत शिराळा मुख्य अधिकारी यांना दिले आहे.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .