गुटखा विक्री दारात, गुटखा व्यवसाय जोरात.
गुटखा विक्री दारात, गुटखा व्यवसाय जोरात.
उंडाळे - प्रतिनिधि,(प्रदिप पाटील,)
कराड तालुक्यातील पाचवड फाटा ते येळगाव परिसरात गुटखा विक्रत्याची गुटखा विक्रीसाठी चढाओढ चालली असताना मात्र प्रशासनाचे त्याबाबत कारवाई शुन्य दिसुन येत असुन व्यवसायिक मात्र बिनधक्कपणे गुटखा विक्रीतुन मालामाल होत आहेत.
वाढती कोरोना रुग्णाची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी दररोज नवनवीन उपाय योजना करत आहेत, मात्र काही समाजकंटक व पैशासाठी कोणत्याही थराला जाण्यात धन्यता मानण्या-यानी कराड दक्षिणच्या ग्रामीण विभागात खुल्लेआम पणे गुटखा विक्री केली जात असल्याने लोक वाटेल तिकडे गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकत आहेत.
पाचवड फाटा ते येळगाव या ग्रामीण परिसरात गुटखा विक्रीचे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडत असुनही याबाबत संबधित प्रशासन व स्थानिक पोलिस ठाण्यामार्फत कोणतीही कारवाई करण्यात "रस" दाखवण्यात असमर्था असल्याचे दिसुन येते आहे. खुलेआम शाळा,काँलेज परिसरातुन राजरोसपणे गुटखा विक्री होत असुनही का? म्हणुन संबधित प्रशासन याच्यावर कारवाई करण्यात "कचरत" आहे का? याच्यातही काही तडजोडी करण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात जागृत नागरिकानमधुन होताना दिसत आहे.
गत काही दिवसापुर्वी पोलिसांनी साठा जप्त करून त्याची ने आण करणाऱ्या वाहनांवर व वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांचे कर्तव्य पार पाडत असले तरी अपवादत्मक एखादि कारवाई करुन हे काही गुटखा वाहतुक व विक्रीला "चाप" बसणार नसुन ग्रामीण भागातील गुटखा वाहतूक व विक्रीला समुळ उच्चाटन करण्यासाठी ठोस उपाय योजना राबविण्यात आला पाहिजेत. या ग्रामीण भागातुन गोळ्या बिस्किट फिरुन विकण्या-या वाहनामध्ये गोळ्या बिस्किट फक्त आणि फक्त नावासाठीचं असतात ,तर त्याच्या नावाखाली गुटख्याची वाहतुक केली जाते, हे जग जाहिर असुन ही संबधित प्रशासनास कसे काय दिसत नाहि. हे उलघडलेले कोडंच म्हणावे लागेल?
सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना 'बुरे दिन'चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे 'अच्छे दिन' बघायला मिळाले आहेत. लॉकडाउन व त्यानंतरच्या काळातही चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री धडाक्यात सुरू आहे, मात्र जेथे कुंपणच शेत खात आहे, तेथे कारवाई करायची कोणावर व करणार कोण हे प्रश्न उपस्थित होत असून, कारवाई करणा-यांच्या खिशातच गुटख्याच्या पुड्या असल्याची परिस्थिती आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखाविक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत असून, पैशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, तसेच अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलत सर्रासपणे गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
शाळा, काँलेज परिसर गुटखा विक्रीचा हॉटस्पॉट
नांदगाव व उंडाळे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुटखा माफियांचे अड्डे लॉकडाउनच्या काळातही व सध्याही राजरोस सुरूच असुन दिवसाढवळ्या गुटख्याची वारेमाफ विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असल्याने वाहतूक व विक्री ही चोरट्या मार्गानेच होते. त्याच बरोबर पाचवड फाटा ते येळगाव परिसरातील बहुतांश गुटखा विक्री ही शाळा काँलेज परिसर हा गुटखा विक्रीचा हॉटस्पॉट बनला आहे.

Comments
Post a Comment