माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीची पाटण येथे बैठक संपन्न.

 माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीची पाटण येथे बैठक संपन्न.


पाटण :- आज  दुपारी १ वाजता माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशनचे  राष्ट्रीय अध्यक्ष  मा.दिपक कांबळे सर यांची पाटण  येथे माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितिचे मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख  सागर पाटील  यांनी भेट घेऊन संघटने विषयी चर्चा केली. त्यानंतर  पाटण तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच.सागर पाटील यांनी  आपल्या संघटने बद्दल नवीन पदाधिकारी यांना माहिती दिली. 

      सुरवातीला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मा .दिपक कांबळे सर यांचा मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख सागर पाटील व सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.आदेश गंगावणे ,सातारा जिल्हा उपाध्यक्ष.राजेंद्र जाधव, सातारा जिल्हा उपाध्यक्ष. राजेंद्र डांगे, नवनियुक्त पाटण तालुका कार्यध्यक्ष .दिपक मांडावकर आणि पाटण तालुका उपप्रमुख जयवंत पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिपक कांबळे यांनी सर्व मान्यवरांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय आणि धोरणे सांगितली तसेच यावेळी  १० पोर्टल न्युज चॅनेल व एक ब्रॉडकास्टिंग न्युज चॅनेल सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.  तसेच यावेळी ३ पोर्टल न्युज चॅनेलचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी  मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख श्री.सागर पाटील तसेच सातारा जिल्हाध्यक्ष श्री. आदेश गंगावणे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजेंद्र जाधव आणि जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच विशेष प्रमाणपत्र देऊन श्री.दिपक मांडावकर यांचा सन्मान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .