उंडाळे परिसरात कृत्रिम युरिया टंचाई. युरिया खरेदीसाठी अन्य खते खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडुन शेतकऱ्यांची अडवणुक..

 

उंडाळे परिसरात कृत्रिम युरिया टंचाई.

"युरिया खरेदीसाठी अन्य खते खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडुन शेतकऱ्यांची अडवणुक.."

 उंडाळे   -   प्रतिनिधि, (प्रदिप पाटिल. )

   सध्या उंडाळे आणि परिसरातील बहुतांश ऊस पिकाची तोड झाली असुन आडसाली लागण व खोडव्याची सरी उजरणीची कामे चालु झाली आहेत.शेतातील कामाने वेग आला असताना  पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून शेतकरी युरियाची मागणी करीत आहेत, पण उंडाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या  कृषी केंद्रामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे. युरिया खताच्या गोणीची काही दुकानदार परिसरात जादा दराने विक्री करीत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. तसेच युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह देखील केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पण या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या जात नसल्यामुळे असा गोरखधंदा करणाऱ्याचे चांगलेच फावत आहे.  काही दुकानदार हितसंबंध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र ही  आहे. मात्र युरिया मिळत नसल्याने सध्या चिंतेने शेतकरी हतबल झाले आहेत.

  कराड तालुक्यातील उंडाळे येथील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे. युरिया खताचा तुटवडा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत असून युरिया बरोबर अन्न खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासह आपले व्यवसाय तेजीत आणु पाहण्या-या व्यवसायिकाना कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतक-यांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.

उंडाळे परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. त्याच बरोबर महत्वाची बाजारपेठ म्हणुन उदयास येणाऱ्या उंडाळे बसस्थानकावर सध्या कृषी केंद्राची भरपुर रेलचेल दिसुन येते , उंडाळे सह परिसरातील बहुतांश गावातील शेतकरी आपल्या शेती व्यवसासाठी लागणा-या खताची खरेदी या ठिकाणीहुन मोठ्या प्रमाणात करत असतात  मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी युरियासाठी वणवण फिरत आहेत. , साधे खत देखील उपलब्ध होत नाही. यातच युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे.

गरज नसताना खते उपलब्ध असतात. मात्र, गरजेच्या वेळीच नेमका खतांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. येथे गेल्या आठवड्यापासून युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ आदी खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. यामुळे येथील शेतकरी खत घेण्यासाठी अन्यत्र  जात आहेत. मात्र त्यांना तेथेही खत मिळत नाही. तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खते लिंक पध्दतीने विक्री करीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तसेच याबाबत कृषी विभागाशी संपर्क करुनही समाधान होत नसल्याचे उंडाळे परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे.

उंडाळे परिसरामध्ये नेहमीच खतांची टंचाई जाणवत असते. शेतकरी मागतील ते बियाणे व हवे तेवढे खत शेतकºयाना मिळाले पाहिजे, यासाठी पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खताची विक्री करणे, हा दरवर्षीचा प्रकार आहे. मात्र त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना सर्रास अडवणूक केली  जात आहे.येथील बागायती व कोरडवाहू शेतीला खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी ओंड,काले, कराड आदी ठिकाणी वणवण फिरत आहेत. मात्र, सद्यस्थितीत कुठेही खत सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बांधावर खत योजनेचा पुरता फज्जा उडाला असून दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल, असे म्हणण्याची वेळ येथील शेतक-यांवर आली आहे. शेतक-यांना त्वरित युरिया व खताची उपलब्धता करुन द्यावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातुन होत आहे,  त्याच बरोबर युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध असुनही जाणीवपूर्वक शेतीसाठी अन्य खते घेण्यास भाग पाडण्या-या संबंधीत दुकानदारानवर योग्य कारवाईची मागणी परिसरातुन जोर धरु लागली आहे.

कृषी विभाग व  प्रशासनाची  कार्यवाही करण्याची मागणी.

खतांचा काळाबाजार होऊ नये म्हणून कराड तालुक्यांत भरारी पथके नियुक्त करण्यात यावीत.  शेतकऱ्यांच्या गरजेचा लाभ उचलत काही दुकानदार आपला फायदा साधत आहे. शेतकरी असे खासगीत सांगत असला तरी तक्रार करीत नाही किंवा त्याच्याजवळ पुरावा नसल्यामुळे तो काहीच करीत नाही. म्हणून कृषी विभाग आणि प्रशासनाकडून योग्य ती  कार्यवाही करण्यात  यावी. इतर रासायनिक खतांपेक्षा युरिया खत हे स्वस्त असून त्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे. एक क्विंटल खतामध्ये ४६ टक्के नायट्रोजन असून शेतकरी कापसाच्या पिकासाठी दुसऱ्या व तिसऱ्या डोज देण्यासाठी युरीयाला पसंती देतात. पण आता हे खत मिळत नसल्यामुळे शेतकरी खतासाठी पायपीट करीत असल्याचे उंडाळे परिसरातील चित्र आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .