समाजभूषण ग्रंथालयात ग्रामपंचायत सदस्यांचा उस्फुर्त सत्कार!
समाजभूषण ग्रंथालयात ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार .
हा सोहळा ग्रंथालयाच्या वतीने दिनांक 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच श्री अनिल जाधव, व ग्रामपंचायतीचे इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादाराम साळुंखे व प्रा. उमेश नाथ यांनी ग्रंथालयाची आरंभापासून ची वाटचाल यथार्थ शब्दात व्यक्त केली. कार्यवाह प्रा. सूर्यमाला जाधव यांनी प्रबोधनात्मक मनोगतात ग्रंथालयाची आवश्यकता व मूल्य विशद करून अजूनही असणाऱ्या ग्रंथालयातील अनेक त्रुटींचा उहापोह केला. व उपस्थित मान्यवरांनी काही ठोस कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना सरपंच श्री फत्तेसिंह जाधव यांनी ग्रंथालयातील अडचणीबाबत आम्ही निश्चित चांगली कार्यवाही करू असा विश्वास दिला. मा. सरपंच, मा. उपसरपंच व अन्य मान्यवर सदस्यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी ग्रंथालय कार्यकारणीचे डॉ.युगांतरा कदम ,प्रा. वंदना किशोर ,प्रा. एवळे ,अभिजीत इंगळे , विवेकानंद मुळे , ग्रंथपाल रुकसाना नदाफ, सीमा कांबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमास परिसरातील वाचन प्रेमी ग्रंथालयाचे वाचक सभासद उपस्थित होते. ग्रंथालयाच्या अध्यक्ष सौ. कांचन धर्मे यांच्या आभारानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments
Post a Comment