28 मार्च रोजी भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन. " महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी मा. रणधीरजी अल्हाट यांची प्रमुख उपस्थिती".

 28 मार्च 2021 रोजी भीम आर्मी सातारा जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन.

  "भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी  मा. रणधीरजी अल्हाट  उपस्थितीत राहणार ".



कराड  -  प्रतिनिधि, (विनोद कांबळे)

       सातारा जिल्हा भीम आर्मी यांच्यावतीने   28मार्च 2021 रोजी भीम आर्मी जिल्हा सातारा आढावा बैठक  शासकीय विश्राम गृह कराड येथे सकाळी   ११.०० वाजता  आयोजित करण्यात आलेली आहे.
 या बैठकीस प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी भीम आर्मी मा. रणधीरजी अल्हाट तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. जावेदजी नायकवडी व सातारा जिल्हा अध्यक्ष मा.संतोषजी थोरावडे,सातारा  जिल्हा प्रचार प्रसिद्धीप्रमुख मा. प्रा.( डॉ )विनोद कांबळे यांची असणार आहे .
घरोघरी भीम आर्मी या अभियाना संदर्भात अभियानाची आज  पर्यंतच्या उदिष्टपुर्तीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे तसेच भीम आर्मी या अभियानासंदर्भात होणार्या २१ कलमी 
कार्यक्रमास  संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.  

जिल्ह्यातील सर्व भीम आर्मीच्या पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांनी यांची नोंद घेऊन बैठकीच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख  संतोषजी थोरावडे यांनी केलेले आहे.
 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .