शेळयांचे गट वाटप करणे.

 

शेळयांचे गट वाटप करणे.


ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील.

योजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)

राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.

योजनेचा तपशील (एक शेळीगट खर्चाचा तपशील)

अ . क़्रतपशीलखर्च

1.शेळीगट खरेदी 40 शेळया व 2 बोकडरू.1,74,000/-

2.शेड बांधकाम व कुंपण रू.77,000/-

3.खादय व पाण्याची भांडीरू.6500/-

4.जंतनाशक व गोचिड प्रतिबंधक व खनितविटा रू.2200/-

5.विमारू.8700/-

6.मुरघास बॅग/टाकी रू.10,000/-

7.कडबा कुटी यंत्र रू.17,500/-

8.वैरणीचे बियाणे पुरवठा रू.2100/-

9.प्रशिक्षणरू.2000/-


एकूणरू.3,00,000/-

अनुदान 50%रू.1,50,000/-

लाभार्थीहिस्सा 50%रू.1,50,000/-

एकूण वाटप करावयाचे गट660 गट

प्रति गट खर्च (अनुदान)रू.1,50,000/-

एकूण खर्च (रू.1,50,000/-X 660 गट)रू.990.00 लाख

1% प्रशासकीय खर्च रू.9.90 लाख

एकूण खर्च

रू.999.90 लाख 

म्हणजेच रू.10.00 कोटी





स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .