कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर करणाऱ्या बँका,पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा --सागर पाटील.

 कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर करणाऱ्या बँका,पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा 

--सागर पाटील.

सातारा :कर्जवसुलीसाठी गुंडांचा वापर सर्रासपणे चालू आहे तो त्वरित थांबवावा अशी मागणी माहिती 

अधिकार व पत्रकार संरक्षण  आणि पोलीस मित्र समितीचे मंत्रालय व विधिमंडळ संपर्कप्रमुख श्री.सागर पाटील यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांना केली आहे.

  आता मार्च महिना चालु आहे आणि आता या बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे सतत तगादा लावत आहेत.ही वसुली अशी चालू आहे की जणू काही मार्च महिन्यात जर कर्ज वसूल झाले नाही तर हे सगळेजण जणू दिवाळखोरीत जाणार आहेत.१०० पैकी ९० लोक कर्जाची वेळेवर परतफेड करतात,१० % लोक वेळेवर कर्ज भरत नसतीलही पण याचा अर्थ असा नाही की कर्जवसुलीसाठी कोणत्याही थराला जायचे. या बँकांनी आणि फायनान्स कंपन्यानी गुंड लोकांना वसुलीचा ठेका दिलेला आहे.हे गुंड प्रवृत्तीचे लोक लोकांना इतका मानसिक, शारीरिक त्रास देतात की या गुंडाच्या त्रासाला कंटाळून  आत्महत्या करतात याला जबाबदार कोण ? हे गुंड लोक की त्याना कामावर ठेवणारे बँक आणि फायनान्स कंपनीवाले! 

  जरी एखादे कर्ज वेळेवर भरले नाही तर बँका, पतसंस्था, फायनान्स हे काही शांत बसतात असे नाही ते कर्जदाराला विविध प्रकारचे चार्जेस लावतात आणि वर उलट दादागिरी करून वसुली पण करतात.सहकार खाते नुसते नावालाच आहे.हे सहकार खाते सहकार (मदत) करते पण कुणाला या बँका, पतसंस्था यांच्या वसुलीचा ठेका घेतलेल्या गुंडांना कारण यांचा खिसा अगोदरच गरम झालेला असतो त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सहकार खात्याकडून न्याय मिळणे कठीण आहे.आज पर्यंत कितीतरी बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या लोकांचा कष्टाचा पैसा घेऊन बुडाल्या यावर एकातरी जिल्हा सहकार निबंधकाने बँकेच्या संचालकांची ,कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करून लोकांचे पैसे देण्याचे आदेश दिलेत का,? पण या उलट कर्जदारांचे कर्ज थकले तर त्याची मालमत्ता, जामीनदाराची मालमत्ता जप्त करून लगेच त्याचा लिलाव करून कर्ज वसूल करण्याचा आदेश जिल्हा निबंधक लगेच देतात.तेंव्हा यांची तत्परता आणि प्रामाणिकपणा लगेच जागा होतो पण तोच कर्जदार आणि ठेवीदारांच्या बाबतीत कुठे जातो काय माहीत? 

तरी यावर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी त्वरित तोडगा काढून सर्व सामान्य जनतेला न्याय दयावा अन्यथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीतर्फे जनआंदोलन करण्याचा इशारा श्री. सागर पाटील यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .