सातारा जिल्ह्यात बहुजन समाजात घराघरात भीम आर्मीचा कार्यकर्ता तयार करणार. सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे.


सातारा जिल्ह्यात बहुजन समाजात घराघरात  भीम आर्मीचा कार्यकर्ता तयार करणार.
      _ सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे.


" भीम आर्मीचे १५ मार्च पासून घर घर चलो सदस्यता अभियान."


  कराड -प्रतिनिधी (विनोद कांबळे)

मा. कांशीराम साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने १५ मार्च ते ३० मार्च या पंधरवड्यात घर घर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाणारे कांशिराम साहेब  यांच्याविषयी माहीती देतानाचे विविध कार्यक्रम  यावेळी राबविण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते  रमाकांत तायडे यांनी दिली होती. 

याच अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये बहुजन समाजात घरोघरी भीम आर्मीचा कार्यकर्ता निर्माण करणार असं प्रतिपादन  भीम आर्मीचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांनी केलं.कांशीराम साहेब यांच्या जन्मदिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते या वेळेला कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .