उंडाळे येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातुन हायमास स्ट्रिट लाईट मंजुर.

 उंडाळे येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातुन हायमास स्ट्रिट लाईट मंजुर.


उंडाळे, प्रतिनिधी,

 खा.श्रीनिवास पाटील  यांच्या प्रयत्नातून  उंडाळे ता.कराड गावातील प्रमुख चौकाच्या ठिकाणी चांगल्या दिवाबत्तीची सोय व्हावी म्हणून गावातील मुख्य चार ठिकाणी बाजार चौक, सवादे तुळसण रोड, एस टी स्टँड प्रशासकीय इमारती समोर व बौद्ध वस्ती  येथे हायमास मंजूर झाले असून त्याचे प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून त्याबद्दल  खासदार श्रीनिवास पाटील  यांचे ग्रा. पं.उंडाळे व ग्रामस्थ यांच्या वतीने मनःपूर्वक जाहीर आभार मानण्यात आले .

  सदरील कामाकरिता युवा नेते  सारंग  पाटील, दादासाहेब नांगरे, सचिन काकडे, उदय पाटील (आबा), संघटक राष्ट्रीय काँग्रेस कराड दक्षिण. यांनी पाठपुरावा व मोलाचे सहकार्य केले. तर उंडाळे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच माननीय दादासो पाटील व विद्यमान उपसरपंच सरपंच बापूराव पाटील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य संजय सुतार ग्रामसेवक शरद चव्हाण यांनी ग्रामपंचायत मागणी ठराव व सदर कामासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचे पूर्तता केली .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .