झाले गेले विसरुन जावे, पुढे. पुढे चालावे! कंत्राटदार व ठेकेदारानां नवीन गावाअंतर्गत रस्त्याची प्रतिक्षा.

 झाले गेले विसरुन जावे, पुढे. पुढे चालावे!
 कंत्राटदार व ठेकेदारानां नवीन           गावाअंतर्गत रस्त्याची प्रतिक्षा.




उंडाळे - प्रतिनिधि,(प्रदिप पाटिल, )

    उंडाळे येथील गत तीन वर्षापुर्वी २२२५ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या कल्याण अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यापासुन ते स्मशानभूमीत पर्यंतच्या सिमेंट रस्त्याची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

  येथील दलित वस्ती अंतर्गत रस्त्याचे पायापट कॉक्रींटीकरणासह गटर बांधण्याचे काम जखिणवाडी ता.कराड येथील एका ठेकेदारास कार्यकारी अभियंता सा.बा(पश्चिम) विभागा मार्फत देण्यात आले होते, मात्र संबंधित ठेकेदाराने कामचुकारपणा करत सदरील वस्ती ते स्मशानभुमीत जाणाऱ्या सिमेंट कॉक्रींटीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुस गटर बांधकाम न करता  शासनासह ग्रामस्थांची दिशाभुल करून फसवणूक केली होती त्यासह अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवघ्या तिन वर्षामध्ये सिमेंट रस्त्याची चाळण झाली आहे. त्याच बरोबर रस्त्यामध्येच पाईप लाईनसाठी चर काढुन  रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.

दलित वस्ती रस्त्यापासुन ते स्मशानभुमी पर्यंत साधारणता १५० ते २०० फुट लांबीचा सिमेंट कॉक्रींटीकरण रस्ता करण्यात आला आहे . त्यामुळे पावसाळ्यात पुर्ण चिखलातुन जाव्या लागणा-या दलित वस्तीतील ग्रामस्थांना हा रस्ता सोयीचा होता. मात्र रस्त्यावर दगड, माती, पाइप लाईनसाठी पाडण्यात आलेल्या चरी फार दुरवस्था झाली असुन त्याचबरोबर रस्ता लगत गटर बांधकाम नसल्यामुळे संबंधित रस्त्याचे दोन्ही बाजुने रस्ता खचलेला असुन भविष्यात या रस्त्याचे अस्तित्व किती व कशाप्रकारे अबाधित राहील हाच प्रश्न नागरीकांच्यामधुन होत आहे . सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजुस खोलगट क्षेत्र असल्याकारणाने पावसाळ्यात येथे पाणी साठून रस्ता खचला जात आहे. 

तर रस्त्याच्या उत्तर बाजुकडुन येणारे पावसाळ्यातील पाणी गटर नसल्यामुळे याच रस्त्यावरून सरळ नदीपात्रात दाखल होते त्यामुळे  रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. 

  १५ ते२० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बांधण्यात आलेल्या या रस्त्यास बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदाराने आपल्या आर्थिक फायदाच्या दृष्टिकोनातुन गटार बांधण्याची तसदी घेतली नसल्यामुळे पावसाळ्यातील पाण्याने दिवसेदिवस या रस्त्याची भकाल अवस्था निर्माण झाली आहे. 

  सदरिल कामे  पुर्ण झाले नंतर कार्यकारी अभियंत्यांच्याकडुन तपासणी अहवाल सादर केला जातो व अंतिम बिलांची मंजूरी देण्यात येत असते तर हे काम पुर्ण झाल्यानंतर उपस्थित अधिका-यानी कोणत्या आधारे रस्त्यास गटर नसतानाही मान्यता दिली, हे संशोधनाचा विषय होवु शकतो. संबधितानी  तपासणी अहवाल कसा सादर केला गेला त्यावेळी यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत का ? म्हणुन  झाले नाही. का? याच्यामध्ये  भष्टाचार झाला आहे काय!  मग तो कोणी , कसा व कुणाच्या वरदहस्तामुळे केला. या गोष्टिचे गु-हाळ सध्या नागरिकांनमधुन होताना दिसत आहे. त्याचं बरोबर रस्ता तर खराब झाला आहे आता त्याच रस्तासाठी कधी मागणी होते, आणि परत एकदा तेच काम कसं आपल्या मिळेल..याची प्रतिक्षा कंत्राटदार व ठेकेदारानां लागली असल्याचे दिसुन येते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .