मंद्रुळकोळे गावातून पाटणमधील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा.

 मंद्रुळकोळे गावातून पाटणमधील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा.


सातारा: प्रतिनिधि, (  सागर पाटील)

 10 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या आंदोलनास ढेबेवाडी गणातील मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा व मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यात आला.

 पाटण तहसील कार्यालयाच्या बाहेर बेमुदत आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे व इतर समाजाप्रमाणे समांतर योजना लागू कराव्यात याकरिता गावचे सुपुत्र कै.आ.अण्णासाहेब पाटील व 42 मराठा बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.  महाराष्ट्रभर 52 क्रांती मोर्चे मराठा बांधवांनी काढल्यामुळे राज्यसरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या पण ह्या योजना नंतर रद्द करण्यात आल्यात यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. सारथी संस्था,आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळ, 16 टक्के आरक्षण, छत्रपती शाहू महाराज  संशोधन व प्रशिक्षण संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह  निर्वाह भत्ता योजना, अशा अनेक योजना सरकारने बंद पडल्या आहेत. या सर्व योजना मराठा समाजाच्या हितासाठी करण्यात आल्या होत्या. पण सरकार याकडे लक्ष देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज आता आक्रमक होत आहे. महाराष्ट्रभर ठिय्या आंदोलन आता चालू होत आहेत. पाटणमधील ठिय्या आंदोलनाला पाटण तालुक्यातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांची लिस्ट पेंडिंग मध्ये आहे.

 चौकट- सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, लवकरात लवकर पूर्वी जे दिलेले आरक्षण होते ते सरकारने परत द्यावे, व मराठा समाजाची चेष्टा थांबवावी. मी आता आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही माझी महाराष्ट्रभर दौरे चालू आहेत सरकारने याची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आम्ही दुसऱ्या कोणत्या समाजाचे आरक्षण घेत नाही, आम्हाला जे  दिले होते आरक्षण तेच आरक्षण सरकारने द्यावे अशी  मराठा समाजाची सुद्धा इच्छा आहे. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये.-मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील

 जोपर्यंत आरक्षण मिळत नाही व मराठा समाजाच्या हिताचे निर्णय होत नाहीत तोपर्यंत पाटण तहसील कार्यालय समोरील मराठा ठिय्या आंदोलन सुरू राहील.  व आम्ही सर्व मंद्रुळकोळे ग्रामस्थ मंडळी या आंदोलनकर्त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहोत कसे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने मंद्रुळकोळे गावातील ग्रामस्थ व मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .