स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन.
स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन.
कराड - प्रतिनिधि,
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील आणि मा.खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बोलताना मा.नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, देशाचे थोर नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांची आज 108 व्या जयंती कराड परिसरामध्ये साजरी होत आहे. या कराड आणि परिसरातून त्यांनी नेतृत्व करण्यास सुरूवात केली. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यासाठी आणि झाल्यानंतरही खर्या अर्थाने पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आणि त्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व केले, देशाच्या संरक्षणमंत्री पदीही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या पुरोगामी विचारांनी महाराष्ट्र आज पुढे जात आहे.
अशा या थोर नेत्यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो, असे नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते सौरभ पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आय टी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, नंदकुमार बटाणे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे तसेच कराड नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

Comments
Post a Comment