ताडपत्री न झाकता रेती वाहतुक नाहक दुचाकी स्वारांना त्रास, प्रशासन शांत.
ताडपत्री कींवा प्लास्टिक अच्छादन न करता रेती वाहतुक.
"नाहक दुचाकी स्वारांना त्रास, प्रशासन शांत."
उंडाळे- प्रतिनिधि, (प्रदिप पाटील)
कराड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात विट्भट्टीसाठी नदि पात्राच्या लगतच्या परिसरातुन रेतीची वाहतूक केली जात आहे. यामध्ये रेती वाहतुकदारांकडून शासन नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. ताडपत्री न झाकता रेती वाहतूक करण्यात येत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.ट्रॅक्टर किंवा ट्रकच्या मागील टपात रेतीची वाहतूक होते. त्यावर ताडपत्री झाकून रेतीची वाहतूक करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र कराड दक्षिणच्या बहुतांश ग्रामीण भागातील विट्भट्टी चालक हे नियम पायदळी तुडविले जात आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जून २००२ मध्ये परिपत्रक निर्गमित करुन गौण खनिजाची वाहतूक करताना ट्रक व ट्रॅक्टरच्या पल्ल्याची उंची न वाढवून ताडपत्री झाकण्याचे निर्देश आहेत. ताडपत्री लावणे तर दूरच परंतु पल्ल्याची उंची वाढवून क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेण्याचा प्रकार सुरू आहे. परिणामी ट्रॅक्टर, ट्रक यांच्यामागून येणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेती घाटाचा लिलाव झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना सिमांकन करुन रेतीचे उत्खनन करण्यासाठी सांगितले जाते. मात्र येथील कंत्राटदार सीमांकनापलीकडे रेतीचे उत्खनन करीत असुन त्यास प्रशासनातील काही बड्या हस्तीची साथ असल्याचे सर्वसामान्यात बोलंले जात आहे.यासंदर्भात नदी काठच्या नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेळोवळी वेधले मात्र कोणतीही कारवाई करण्यात प्रशासन कोठे कमी पडते आहे हे न सुटलेले कोडे उपस्थित होते.
अनेकवेळा वाहन चालक वाहतूक परवाना न बाळगता गौण खनिजाची वाहतूक करीत आहेत. अशारीतीने अवैध रेती, मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचे परवाने रद्द करुन त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मात्र कराड दक्षिणच्या ग्रामीण विभागात संबंधित प्रशासनाचे "हात" कशामुळे बांधले गेले आहेत, याचा शोध घेण्याची जबाबदारी कोण उचलणार ..? का.. "तु कर, मारल्यासारखं, मी, करतो, रडल्यासारखं" हेच पुन्हा चित्र पहावयास मिळणार अशी चर्चा सध्या सर्वसामान्यातुन होत आहे.
सर्वसामान्यांच्या मुलभुत अधिकारावर घाव घालुन शासनाची दिशाभुल करुन लाखो रुपयांना "गंड्डा" घालण्या-या संबधित विट्भट्टी , मुरुम व्यवसायिकावर दंडात्मक कारवाईची तरतूद शासन निर्णयात आहे. प्रशासनाकडे वेळीच याकडे लक्ष दयावे असे नागरिकांकडून बोलल जात आहे.

Comments
Post a Comment