शिराळा तालुक्यामध्ये धर्मजागृती अभियानाला सुरुवात.
शिराळा तालुक्यामध्ये धर्मजागृती अभियानाला सुरुवात.
शिराळा - प्रतिनिधि,
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत धम्म जागृती अभियान सुरू झाले असून शिराळा तालुक्यातील चिंचोली या गावी अभियानाची सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष अशोक घोलप , संतोष घोलप , विश्वास घोलप , सुरेश घोलप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घोलप यांनी केले. चिंचोली गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी विद्रोही कला मंच यांच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला. संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे यांनी धम्माची माहिती देऊन लवकरच चिंचोली बरोबरच शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दीक्षा समारंभ आयोजित करणार असल्याची घोषणा केली. यावेळी पोपट बनसोडे, शंकर कांबळे , सुशांत कांबळे , अजित सुतार उपस्थित होते.

Comments
Post a Comment