पाटणमधील ठिय्या आंदोलनाला संग्रामसिंह जाधव यांचा पाठिंबा.
पाटणमधील ठिय्या आंदोलनाला संग्रामसिंह जाधव यांचा पाठिंबा.
पाटण - प्रतिनिधि,
10 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या आंदोलनास ढेबेवाडी गणातील मंद्रुळकोळे व परिसरातील ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा व मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यात आला.
पाटण तहसील कार्यालयाच्या बाहेर बेमुदत आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी दिवसेंदिवस आंदोलनास पाठिंबा मिळत असुन
तारळे गावाचे युवा शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मा. संग्रामसिंह जाधव यांची दिनांक मंगळवार 2रोजी पाटण येथे मराठा आरक्षणासाठी चाललेल्या साखळी ठिय्या आंदोलन याला भेट देऊन पाहणी केली तसेच चाललेल्या मराठा आरक्षन आंदोलनासाठी तारळे विभाग व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आ. शंभुराज देसाई यांच्यावतीने पाठिंबा दिला .

Comments
Post a Comment