24 ऑगस्ट 1942 कराड तहसीलदार कार्यालयावरील मोर्चाचा 80 वा स्मृतिदिन उत्साहात संपन्न.

 24 ऑगस्ट 1942 कराड तहसीलदार कार्यालयावरील मोर्चाचा 80 वा स्मृतिदिन उत्साहात संपन्न.

कराड प्रतिनिधी :-

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी 1942 साली इंग्रजांना 'चले जाव 'चा नारा दिला त्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्ट 1942 रोजी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांनी कराड तहसील कार्यालयावर 3000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. तो मोर्चा अहिंसा मार्गाने शांतेतत पार पाडून तहसील कार्यालयावर तिरंगा फडकवला होता. त्यावेळी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांना अटक झाली होती. त्या मोर्चाचा आज 80 व्या स्मृतिदिनी दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने व शासकीय अधिकारी यांच्या वतीने तहसील कार्यालया समोरील विजय स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण व अभिवादन करून साजरा करण्यात आला.

यावेळी शासनाच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस निरीक्षक ग्रामीण भरणे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर,माने  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण साहेब,स्वा. दादासाहेब उंडाळकर, स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील आण्णा या स्वातंत्र्य लढ्यातील महान व्यक्तींना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच स्मृती विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अँड.उदयसिंह पाटील दादा विश्वस्त दादासाहेब उंडाळकर स्मारक समिती ,प्राध्यापक गणपतराव कणसे व्यवस्थापकीय विश्वस्त  स्वा.दादासाहेब उंडाळकर  स्मारक समिती उंडाळे ,स्वातंत्र्यसैनिक आनंदराव जाधव, हिंदुराव जाधव,प्रा. धनाजी काटकर ,रंगराव थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .