विलासकाकांचा वारसा जोपसण्यासाठी उदयसिंहना साथ द्यावी.

 विलासकाकांचा वारसा जोपसण्यासाठी उदयसिंहना साथ द्यावी.

"विलासकाकांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी दादासाहेब गोडसे यांचे आवाहन."

 

उंडाळे - प्रतिनिधि. ( प्रदीप पाटिल.)

सातारा जिल्ह्याच्या सहकार व समाजकारणात विलासकाकांचे फार मोठे योगदान असून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी सर्वांनी उदयसिंहाना साथ करावी असे आवाहन जेष्ठ नेते,सातारा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी केले.

शेवाळेवाडी (म्हासोली) ता कराड येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर लोकनेते स्व. विलासरावजी पाटील (काका )यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन काकांच्या बरोबर काम करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचे हस्ते करणेत आले त्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड.उदयसिंह पाटील,व्हा चेअरमन आप्पासाहेब गरुड,अथणी रयत चे युनिट हेड रवींद्र देशमुख,कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे,अ‍ॅड.विजय पाटील,कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात,कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील,रफिक शेठ बागवान,पै.शिवाजीराव जाधव,पै.जगन्नाथराव मोहिते

यांची प्रमुख उपस्थिती होती.दादासाहेब गोडसे म्हणाले,काका हे काकांच होते,त्याच्या सारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही मात्र त्याचा विचार जोपासणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरणार आहे.  काकांनी 50 वर्षा पेक्षा जास्त काळ राजकीय,सामाजिक क्षेत्रात भरीव असे काम केले आहे.सलग 35 वर्षे कराड दक्षिण मतदार संघाचे नेतृत्व करताना राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार खात्यासह विविध खात्याचे काम पाहिले होते.सातारा जिल्हा बँक त्याच्याच मार्गदर्शनाखाली देशात आदर्श बँक म्हणून नावारूपास आली.रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना करताना कराड तालुक्यातील काकांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणाऱ्या संस्था आज ही सहकारात आदर्शवत असे कामकाज करत आहेत. विलासकाकांच्या सारख्या नेतृत्वाच्या स्मृती कायमस्वरूपी चिरंतन रहाव्यात या हेतुतून  कारखाना कार्यस्थळावर पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय हे त्याचे स्मारक सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील.

        अ‍ॅड.उदयसिंह पाटील बोलताना म्हणाले,रयत कारखाना एकवेळ लिलाव होऊन विक्री होतेय की काय अशा अवस्थेत होता. काकांच्या निर्णयामुळे अथणी कारखान्याची करार करून कारखानदारी वाचवण्यात यश आले.आज रयत कर्जमुक्त होऊन सभासद व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे येणाऱ्या काळात आपण गाळप क्षमता विस्तारवाढी बरोबर सह- वीज प्रकल्प उभारत आहोत. आज  आपल्यात काका नसलेतरी त्यांचे विचार घेऊन कार्यकर्त्यांचा साथी ने वाटचाल करीत आहोत. काकांचे विचार मोडण्याचे षड्यंत्र विरोधकांचे सुरू आहे.त्यास आपलेच काही हिंतचितक खतपाणी घालत आहेत अशा प्रवृत्तीना काकांच्या कार्यकर्त्यांनी वेळो वेळी धडा शिकवला आहे आणि यापुढेही कार्यकर्त्याच्या साथी ने निश्चित धडा शिकवू.

     वसंतराव जगदाळे,रवींद्र देशमुख,सर्जेराव थोरात,प्रा राजेंद्र भिसे यांनी मनोगते व्यक्त केली.पुतळा चबूताऱ्याच्या जागेचे पूजन रवींद्र देशमुख यांचे हस्ते करणेत आले.प्रास्ताविक संचालक तुकाराम काकडे यांनी तर आभार अ‍ॅड.उदयसिह पाटील यांनी मानले.कार्यक्रमास संचालक पंजाबराव देसाई,जयवंतराव मोहिते,शंकरराव थोरात,मोहनराव थोरात,शंकरराव पाटील,माजी सभापती प्रदीप पाटील,फरीदा इनामदार,किसनराव जाधव,महेशकुमार जाधव,फत्तेसिंह जाधव,हणमंतराव चव्हाण,कृष्णेचे माजी संचालक पांडुरंग पाटील,जयंतराव थोरात,मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, सागर जाधव, जयंत कुराडे,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील,स्वा सै हिंदुराव जाधव,सुदाम चव्हाण, कराड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी ,शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .