बौद्धाचार्य प्रमाण पत्र वितरण समारंभ उत्साहात साजरा.

 बौद्धाचार्य प्रमाण पत्र वितरण समारंभ उत्साहात साजरा.

शिराळा - प्रतिनिधि,

 सरूड बौद्ध विहार तालुका शाहूवाडी या ठिकाणी दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी बौद्धाचार्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. " द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा " संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. शाखा शाहूवाडी यांच्या वतीने मार्च महिन्यात बौद्धाचार्य परीक्षा घेण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले त्यांना बौध्दाचार्य प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी शाहुवाडी तालुक्याचे व सर्व पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक माननीय मा.सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाहूवाडी तालुका अध्यक्ष मा.दिलीप कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आकाराम तेलवेकर गुरुजी,सुदाम कांबळे,प्रा.विजय कांबळे,नंदू विरळेकर ,संजय कांबळे, शामराव कांबळे तसेच शाहूवाडी तालुक्‍यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिराळा तालुक्यातील सहा उपासकांना बौद्धाचार्य ही पदवी प्रदान करण्यात आली डॉ. संदीप कांबळे , अर्चना कांबळे ,प्रा.अमोल कांबळे,मा. कृष्णा कांबळे, मा.सौरभ कांबळे, प्रा. नामदेव कांबळे यांना बौध्दाचार्य प्रमाणपत्र देऊन भारतीय बौद्ध महासभा शाखा शाहूवाडी तालुका यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.यावेळी शाहुवाडी तालुक्यातील अनेक बौद्ध उपासक उपस्थित होते.*

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .