अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणी सभा संपन्न.

 अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणी सभा संपन्न.

"पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव डिसेंबरमध्ये."

कराड - प्रतिनिधि,

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक चांदूर रेल्वे विश्रामगृह येथे शुक्रवारी  घेण्यात आली. यात संघटनेला २५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल डिसेंबर मध्ये रौप्य महोत्सवी अधिवेशन घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या सभेच्या अध्यक्षस्थानी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने, प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय उपाध्यक्ष युसूफ खान, राजेंद्र भुरे, महासचिव सुरेश सवळे, मानद सचिव अशोक पवार, कोषाध्यक्ष प्रकाश यावुल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माणिकराव ठाकरे, मनोहर चरपे, प्रदेश सरचिटणीस प्रा.रविंद्र मेंढे, विदर्भ प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगिवकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज संस्थान चे कार्यकारी व्यवस्थापक कर्मयोगी शंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे केंद्रीय सरचिटणीस सुरेश सवळे यांनी भाऊंच्या निष्काम, निस्वार्थी व सेवाभावी जीवन प्रणालीवर प्रकाश टाकला. तसेच कोरोना महामारीत महाराष्ट्रातील कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाने महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कलावंतांना ५ हजार रूपयांची आर्थिक मदत करण्याचे जाहिर केल्याबद्दल तसेच पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषीत करुन त्यांना सुविधा देण्याची  मागणी पत्रकार संघाने मुख्यमंत्र्यांना केली होती, त्याची दखल घेऊन शासनाने दोन्ही मागण्या मान्य केल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा व शासनाचा अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाला २५ वर्ष पुर्ण होत असुन रौप्य महोत्सवानिमित्त राज्यस्तरिय अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा दर्शविणारा "भरारी" विशेषांक प्रकाशित करणे तसेच नविन वर्षाचे कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. बैठकीत संघाचे अध्यक्ष मनोहर सुने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना संघाचे उपाध्यक्ष युसुफ खान यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. बैठकीचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष अशोक याऊल यांनी केले. तर आभार विदर्भ सचिव बाळासाहेब सोरगीवकर यांनी मानले. यादरम्यान चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथाल पत्रकार राहूल देशमुख यांनी अ. भा. ग्रा. पत्रकार संघात प्रवेश केल्यामुळे त्यांचा मनोहरराव सुने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ही बैठक यशस्वी करण्याकरिता चांदूर रेल्वे येथील पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .