टाळगाव (ता-कराड )येथील पुराने बाधित कुटुंबाना ब्लँकेट व चटई वाटप .
" राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते,रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते मदतीच केलं वाटप."

उंडाळे - प्रतिनिधि,
टाळगाव तालुका कराड येथील पूरग्रस्तांना पंचायत समितीचे सदस्य टाळगाव गावचे सुपुत्र काशिनाथ कारंडे यांच्या वतीने पूरग्रस्तांना ब्लँकेट व चटई वाटप कार्यक्रम कराड दक्षिण चे राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते,रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्या वेळी बोलताना म्हणाले कारंडे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन आपल्याच गावातील पूरग्रस्तांना फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांच्या दुःखा मध्ये सामील होण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी कारंडे कुटुंबांना या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो. त्याचबरोबर मी आणि शासन बाधित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपण सर्वांनी घर, शेती, विहिरी. यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी प्राध्यापक धनाजी काटकर सर शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन बी एल .पाटील गुरुजी पंचायत समिती सदस्य काशिनाथ कारंडे सरपंच शालन मोहिते , उपसरपंच सचिन पाटील, सोसायटीचे चेअरमन के एन.जाधव सर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय जाधव ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक राजेंद्र सुतार सर यांनी मांडले.
Comments
Post a Comment