ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्यावरील मु.पो.सेलू जिल्हा परभणी येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली जिल्ह्याच्या वतीने निषेध .


ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगली जिल्ह्याच्या वतीने निषेध .

सांगली दि.३१ : ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या गाडीवर मु.पो. सेलू जिल्हा परभणी येथे काही समाजविघातक प्रवृत्ती कडून गाडीवर दगडफेक करून जीवघेणे हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाअध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे, रोहित कांबळे, संतोष कांबळे, डीपीआयचे जिल्हा अध्यक्ष अविनाश वाघमारे यांनी केला. आरोपींना तत्काळ अटक करावी, दीपक केदार यांना पोलीस संरक्षण देण्यात द्यावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत आदी माग्णायचे निवेदन पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली यांचे मार्फत गृहमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

या भ्याड हल्ल्यात गाडीमधील भीमराज गोटे हा कार्यकर्ते जखमी झाला आहे.  पोलिसांना वारंवार फोन करून सुद्धा पोलिसांनी घटनास्थळी येण्यास विलंब केला.  दीपक भाई केदार हे दि.३०.०७.२०२१ रोजी दिवसभर गंगाखेड, पालम, माजलगाव असा दौरा करून रात्री सुमारास १० वाजता सेलूला मुक्कामासाठी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत आले होते. सेलू स्थित येथे एका हॉटेलकडे गाडी नेली. आधीच पाळीत ठेवून असणाऱ्या समाजकंटकाच्या हातात कोयता, असे हत्यारे होते. या समाजकंटाकानी त्यांच्या हातातील दगड दीपकभाई केदार यांच्या गाडीवर फेकण्यात आले, भ्याड जीवघेणे हल्ला करण्यात आला. राज्यातील जातीय अत्याचार बाबत भूमिका, सामाजिक, आर्थिक, सांकृतिक, शैक्षणिक प्रश्नाबाबत दीपक केदार हे सतत आवाज उठवत असतात. त्यांचा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून होताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .