डॉ. गेल ऑम्वेट यांचे कार्य भारतीय नव्हे तर जगातील सर्वच युवा वर्गाने अभ्यासावे .

 डॉ. गेल ऑम्वेट यांचे कार्य भारतीय नव्हे तर जगातील सर्वच युवा वर्गाने अभ्यासावे.   

"  संत गाडगे महाराज स्मृती भवन, शिराळा, येथे पुरोगामी संघटनांतर्फे आदरांजली. "


शिराळा - प्रतिनिधि,

           आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तत्वज्ञ , समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट, एक विद्वान कार्यकर्त्या आणि अभ्यासक होत्या. फुले-आंबेडकर-मार्क्स विचारांची जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शोषित, वंचित, पिडितांचा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला. 

     त्या भारतामध्ये व्हिएतनाम युद्धानंतर जगाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या आणि महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, चळवळींचा अभ्यास करताना त्या इथल्या चळवळींत इतक्या एकरूप होऊन गेल्या की त्या याच देशाच्या नागरिक झाल्या. 

     कॉम्रेड गेल यांचे निधन झाल्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात एक भावनिक पोकळी निर्माण झाली आहे, असे डॉ. गेल ऑम्वेट यांना अभिवादन करताना चळवळींतील ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रा. विजयकुमार जोके सर यांनी व्यक्त केले, चळवळीत अनेक वर्षे काम करत असताना डॉ. गेल यांच्यासोबत समाजसेवा करण्याचे भाग्य लाभले , युवा वर्गाने डॉ. गेल यांच्या साहित्याची संशोधन ,मांडणी समजून घेणे गरजेचे आहे ,असेही मत प्रा.विजयकुमार जोके यांनी व्यक्त केले. 

       पुरोगामी युवा कार्यकर्ते मा. सुधीर दाभाडे म्हणाले, डॉ. गेल ऑम्वेट यांची इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी सर्व पुरोगामी युवकांनी प्रयत्न करावे जेणेकरून कॉम्रेड गेल यांचे सबंध साहित्यविचार हे महाराष्ट्रातील सर्वच तळागाळापर्यंत पोचतील, हीच त्यांना आदरांजली ठरेल .

      त्यांचे विचार जिवंत ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे मत सुधीर दाभाडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपापली डॉ. गेल ऑम्वेट यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 

     या कार्यक्रमासाठी प्रा. विजयकुमार जोके सर , मा. सुधीर दाभाडे, मा. बाबासो कांबळे, पत्रकार सचिन पाटील,मा.पोपट बनसोडे ,मा. मारुती रोकडे , मा.गोरक्ष घेवदे, मा. सुभाष कदम असे अनेक मान्यवर उपस्थित होते. 

      सुधीर दाभाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .