स्वा.दादासाो उंडाळकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान प्रेरणादायी.

    स्वा.दादासाो उंडाळकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान  प्रेरणादायी.

" 24 ऑगस्ट 1942 च्या मोर्चाचा 80 वा स्मृतिदिनाचे औचित्य साधून 'लोकमान्य टिळक' ग्रंथ प्रकाशन सोहळा."


कराड - प्रतिनिधि,

24 ऑगस्ट 1942 च्या मोर्चाचा 80 वा स्मृतिदिनाचे औचित्य साधून 'लोकमान्य टिळक' ग्रंथ प्रकाशन सोहळा हॉटेल अलंकार कुंजन हॉल कराड येथे नुकताच संपन्न झाला.

'लोकमान्य टिळक' या ग्रंथाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मा. विनोद शिरसाठ संपादक साप्ताहिक साधना पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 प्रमुख पाहुणे प्राध्यापक सदानंद मोरे यांनी 'भारतीय स्वातंत्र्य लढा' या विषयी व्याख्यान दिले. यावेळी  ते म्हणाले स्वातंत्र्याचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला तर महात्मा गांधी यांनी त्यावर कळस चढवला तरी या मधल्या टप्प्यात स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अनेकांनी लढ्यात सक्रिय सहभाग घेतला यामध्ये दादा उंडाळकर यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून ते युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अँड .उदयसिंह पाटील दादा चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना,जि.प.सदस्य, यांनी केले .या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अँड. उदयसिंह पाटील म्हणाले, काकांच्या पश्चात पहिलाच कार्यक्रम होत आहे. काकांची उणीव प्रत्येक पावलावर जाणवतेय त्यांचे विचार कार्य पुढे नेण्यासाठी 'रयत संघटना' प्रयत्नशील राहील.

कार्यक्रमास पत्रकार विनोद शिरसाठ रयत कारखान्याचे चेअरमन व जि प सदस्य अँड. उदयसिंह पाटील ,गणपतराव कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचबरोबर प्राध्यापक धनाजी काटकर सर, रंगराव थोरात ,वसंतराव जगदाळे, आनंदराव थोरात, महादेव देसाई, नगरसेवक आप्पा माने, नगरसेवक राजेंद्र यादव मलकापूर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील तसेच संघटनेचे विविध संस्थांमधील सर्व पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गणपतराव कणसे सर व्यवस्थापकीय विश्‍वस्त स्वा. दादासाो उंडाळकर स्मारक समिती उंडाळे यांनी मानले. 




 





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .