उंडाळे येथील म.गांधी तंटामुक्ती समितीस मिळालेल्या रक्कमेची सत्यता मांडण्याबाबत निवेदन देण्यात आले.
उंडाळे येथील म.गांधी तंटामुक्ती समितीस मिळालेल्या रक्कमेची सत्यता मांडण्याबाबत निवेदन देण्यात आले.
उंडाळे - प्रतिनिधी
उंडाळे ता.कराड येथील ग्रामपंचायत लेखापरीक्षण अहवाल सन २०१२-१३ मधील म.गांधी तंटामुक्त समितीस मिळालेली रक्कम ३,७५०००रु पैकी फक्त ९०००रु रक्कमेचा उल्लेख ग्रा.पं.लेखापरीक्षण अहवालात आढळुन येत असुन सदर ९०००रु रक्कम नियमानुसार केला नसल्याचे नमुद करण्यात आले आहे.तसेच शिल्लक ३,६६०००रु रक्कमेचा कोठेही उल्लेख आढळत नाही. तत्कालीन काळामध्ये म.गांधी तंटामुक्त समितीने कोणतीही लक्षणीय कामगीरी न केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
सदरील निवेदन मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर संबधित प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व पुराव्यानिशी उंडाळे ग्रामस्थांना खुलासा देण्यात यावा व सदरील प्रकरणी कोणतीही अर्थिक गैरव्यवहार , अपहार,भ्रष्टाचार झाला असल्यास प्रचलित कायदे व अधिनियमानुसार संबधितावर फौजदारी कारवाई व गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदरील प्रकरणाचा लवकरच खुलासा न झाल्यास उंडाळे ग्रामस्थानकडुन तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प., उपविभागीय अधिकारी उपविभाग कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण पोलिस पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी पं.सं कराड तसेच तहसीलदार कराड या विभागांना देण्यात आली आहे.

Comments
Post a Comment