सातारा जिल्ह्यात इफको नॅनो युरियाचा कराड मध्ये शुभारंभ.
सातारा जिल्ह्यात इफको नॅनो युरियाचा कराड मध्ये शुभारंभ.
कराड - प्रतिनिधि,
इंडियन फारमर्स फर्टिलायझर्स को.ऑपरेटिव्ह लिमिटेड व कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कराड यांच्या संयुक्त विद्यमाने युरिया द्रवरूप विक्री शुभारंभ नामदार श्री शंभूराज देसाई गृहनिर्माण वित्त नियोजन पणन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार श्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सारंग पाटील सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अँड. उदयसिंह पाटील चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड शेवाळवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून, सदरचा कार्यक्रम रविवारी दिनांक 29/ 8 /2021 रोजी सकाळी 11 वाजता खरेदी विक्री संघ लिमिटेड कराड, गुळ मार्केट यार्ड गेट 2 कराड येथे आयोजित केला असून या कार्यक्रमास शेतकरी बंधूनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान इफको कंपनीचे आर.जी.बी सदस्य हणमंतराव चव्हाण व कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात यांनी केले आहे.
Comments
Post a Comment