नितीन पाटणकर यांची अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार .
नितीन पाटणकर यांची अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार .
कराड - प्रतिनिधी,
नितीन पाटणकर यांची अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार . कराड तालुक्यातील कासार शिरंबे गावचे सुपुत्र चे अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल व नागपूर सध्या अमरावती चे आयुक्त म्हणून काम पाहत असलेले श्री नितिन पाटणकर साहेब यांचा रयत संघटनेचे अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांच्या वतीने ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना उदयसिंह पाटील म्हणाले की, एका शेतकरी कुटुंबातील पाटणकर साहेबांनी आपल्या बुद्धीच्या व प्रशासनातील कामाच्या जोरावर आज नागपूर सारख्या उपराजधानी असणाऱ्या विभागांमध्ये अतिरिक्त कामगार आयुक्त म्हणून यशस्वीपणे कार्यभार स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर सध्या ते अमरावती कामगार आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांना मिळालेल्या पदोन्नती बद्दल रयत संघटनेच्या वतीने मी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो.
या सत्कारप्रसंगी बोलताना नितीन पाटणकर म्हणाले, लोकनेते व माजी सहकार मंत्री कै.विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 40 ते 45 वर्ष चालणाऱ्या संस्थांच्या वतीने व सध्या या संस्थांचे नेतृत्व करत असलेल्या उदयसिंह दादांच्या शुभहस्ते आपल्याच भागातील माझ्यासारख्या शासकीय अधिकाऱ्याचा सत्कार करून मला जी प्रेरणा दिली त्या बद्दल मी नेहमीच ऋणी राहील.
यावेळी संघटनेचे प्राध्यापक धनाजी काटकर सर महादेव देसाई बापू शेती उत्पन्न बाजार समिती सभापती .व कासार शिरंबेगावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment