पाचवड फाटा ते कोकरुड महामार्गावर अपघातात वाढ .
पाचवड फाटा ते कोकरुड महामार्गावर अपघातात वाढ .
"पार्किंग व्यवस्थेवर प्रशासनाचे दुर्लक्ष, अस्तावस्त पार्किंग".
छेद रस्ता बोर्डसह, झेंब्रा क्राँसिंगची नितांत गरज..
गोंडवाना न्युज - प्रदिप पाटील, उंडाळे.
कराड तालुक्यातून जाणारा पाचवड फाटा ते कोकरुड महामार्गावर मोठ्या प्रमाणावर मृत्यूचा सापळा बनला असल्याचे अपघातांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. गत काही महिन्यापासुन अनेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले असले, तरी रस्ते प्राधिकरणाने अपघात घडू नये. यासाठी रस्ता दुभाजक, छेंदरस्ता क्राँसिंग बोर्ड व शाळा, बस स्थानक ठिकाणी झेंब्रा क्राँसिंगची कोणतीही उपाययोजना केली नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
या महामार्गावरील पाचवड फाटा ते कोकरुड दरम्यान आतापर्यंत अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जखमी होऊन अपंग झाले आहेत. महामार्ग संबधित प्राधिकरणाने या अपघाताच्या ठिकाणांची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
पाचवड फाटा-कोकरुड महामार्गावर दुचाकी, हलकी वाहने, जड वाहने, अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. यात शेतीमालाची आणि रत्नागिरी हुन होणाऱ्या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापुरहुन रत्नागिरी अथवा कोकणात जाण्याचा एक सरळ साधा मार्ग म्हणुन बहुतांश वाहनाची वर्दळ या मार्गावरुन होत असुन गत काही महिन्यापुर्वी नुतनीकरण झालेल्या या मार्गामुळे वाहनचालकाचा वेळ आणि पैसांची बचत होत असल्याने या मार्गाचा वापर प्रामुख्याने वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र कराड तालुक्यासह सांगली जिल्हातील बहुतांश गावाची वस्ती याच महामार्गालगत वसली असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुस लोकवस्ती व दळण-वळण होत असुन महामार्गावरुन होणाऱ्या भरधाव वाहतुकीत अनेक वेळा जिवघेण्या अपघाताच्या घटना घडत आहेत. नव्या तयार करण्यात आलेल्या मार्गावर वाहनधारकांना सुचनेसाठी दिशादर्शक, रस्ता दुभाजक, रस्ते क्राँसिंगसाठी झेंब्रा कोणतीच उपाय योजना राबवण्यात आली नसल्यामुळे वाहनधारकासह , पादचाऱ्यांरी व दुचाकी स्वारासाठी हा मार्ग म्रुत्यु चा सापळा बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महामार्गालगत असण्या-या मोठ्या बाजारपेठ उदयास येत असल्यामुळे त्या ठिकाणी रहदारीचे प्रमाणात वाढ होण्यासह रस्त्यावरच वाहनाच्या पार्किंग होताना दिसुन येते , तर त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करण्यास असमर्थता दाखल्यामुळे अपघातात वाढ होताना दिसुन येत आहे.
पाचवड फाटा ते कोकरुड महामार्गवरील बस स्थानक, मोक्याच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. या अपघातांत होणारी जीवितहानी व प्रवाशांना येणारे अपंगत्व, मालमत्तेचे होणारे नुकसान यांचा विचार करून येथील रस्त्यांवर झेंब्रा क्राँसिंग, सूचना फलक लावणे, गरजेच्या ठिकाणी दुभाजकांची, रबर पट्ट्या व इतर आवश्यक उपाययोजना त्वरीत करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment