नाटोलीत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.

 नाटोलीत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.


शिराळा - प्रतिनिधि,

                        नाटोली ता. शिराळा जि. सांगली  येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली. विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व व्याख्यानमाला असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच शिराळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.साठे साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रकाश नाईक सर यांचे प्रमुख व्याख्यान लाभले. अण्णाभाऊंनी अवघ्या दिड दिवसाचे शिक्षण घेऊन आपल्या साहित्याची प्रसिध्दी संपूर्ण जगभर मिळवली. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंचा आदर्श घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करावं असे प्राध्यापक प्रकाश नाईक म्हणाले.                    संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप कांबळे यांनी मत व्यक्त केले.ते म्हणाले अण्णाभाऊंचे विचार आपल्याला पोषक आहेत. तेच आपल्या विकासाची दारे खुली करतात म्हणून मातंग आणि बौद्ध समाजाने एकत्र येऊन संघर्षाला वाचा फोडावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी सातपुते सर व प्रकाश सातपुते सर यांनी केले. यावेळी विचारपीठावर माजी उपसरपंच शिवाजी सातपुते , ग्रामपंचायत सदस्य दादासो सातपुते , विकास निंबाळकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मंडळातील सर्व पदाधिकारी प्रमोद सातपुते , विजय सातपुते, मारुती सातपुते , देवदत्त सातपुते , वैभव सातपुते , प्रकाश सातपुते ,राजू वारे , सोन्या बनसोडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.तसेच संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र शाखा नाटोली यांच्यावतीने अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. शाखा नाटोलीचे अध्यक्ष अशोक पाटील , शिराळा तालुका प्रभारी शशिकांत चव्हाण , सचिव शंकर कांबळे , बाबासो कांबळे , ऋषिकेश कांबळे, सागर कांबळे यांच्यासह समाजातील महिला व जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Comments

  1. आभारी आहोत.
    गोंडवाना न्यूज परीवारात स्वागत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .