Posts

Showing posts from January, 2026

कराड येथील एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025”

Image
कराड येथील एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025” कराड/प्रतिनिधी कराड येथील सुप्रसिद्ध एन. पी. फिश कंपनीला “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मासे विक्री आणि सीफूड उद्योगात गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहक विश्वास यांचे उच्च मानक निर्माण करणाऱ्या एन. पी. फिश कंपनीच्या कार्याची ही मान्यताच आहे. (स्व.) महादेव सदोजी पाटील आणि श्री. काशिनाथ महादेव पाटील यांनी घालून दिलेल्या परंपरेवर उभारलेल्या या उद्योगाची पुढील पिढीतील वाटचाल पाटील बंधूंनी – श्री. अजित पाटील व श्री. सुनिल पाटील – यांनी यशस्वीपणे पुढे नेली आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी एन. पी. फिश कंपनीला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेले आहे. ताज्या आणि शुद्ध उत्पादनांचा पुरवठा, पर्यावरणपूरक शाश्वत पद्धती, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी आणि कार्यक्षम पुरवठा साखळी यामुळे एन. पी. फिश कंपनीने मासे विक्री व सीफूड क्षेत्रात नवे मानक निर्माण केले आहे. या पुरस्कारामुळे कंपनीच्या संपूर्ण टी...

अर्थतज्ञांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधने शक्य:- प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे.

Image
  अर्थतज्ञांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधने शक्य:- प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे. कराड -प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 2025 मधील अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते या विषयावर भित्तीपत्रिकेचे उद्घाटन संपन्न झाले. प्रमुख उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, अर्थतज्ञांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधने शक्य आहे. जुन्या तंत्रज्ञानाची जागा नवीन कल्पना घेतात. अल्पकाळासाठी बाजारपेठेत कधीकधी मक्तेदारी निर्माण होते परंतु यातूनच आर्थिक वाढ ही होते. जगभरात अनेक अर्थतज्ञ आहेत ज्यांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. नवोपक्रम चलित आर्थिक वाढ आणि सर्जनशील विनाश यांचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल जोयल मोकीर, फिलिप ऑगीयन आणि पीटर हॉ्विट या संशोधकांना संयुक्तपणे पुरस्कार दिला गेला. त्यांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अशा तज्ञांचे संशोधन अभ्यासावे व राष्ट्राच्या प्रगतीस हातभार ल...

महिला महाविद्यालय, कराड येथे ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या विषयावर परिसंवाद.

Image
  महिला महाविद्यालय, कराड येथे ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या विषयावर परिसंवाद.   कराड - प्रतिनिधी. कराड येथील शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपास जल अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. विलास सुर्वे यांनी केले. या परिसंवादात प्रमुख वक्ते मा. श्री. अरुण काकडे यांनी मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने वाचन करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याविषयी मार्गदर्शन केले. कावळ्याच्या प्रतीकात्मक उदाहरणाद्वारे त्यांनी आपले विचार मांडले. कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय पिंडाला मुक्ती मिळत नाही, या लोकमान्य संकल्पनेचा संदर्भ देत वाचनालाही तितकेच संवेदनशील, सजग आणि अर्थपूर्ण असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कावळा आणि काळा रंग यांचे संकेत, विध्वंस आणि जागृती यांचे प्रतीक कसे घडते, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे वि...

ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय उद्योगाच्या संधी - डॉ. आशा सावंत.

Image
  ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून  युवकांना व्यवसाय उद्योगाच्या संधी - डॉ. आशा सावंत.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित,शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 'ग्रामीण उद्योजकता: एक संधी' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते.  त्याप्रसंगी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. आशा सावंत म्हणाल्या की, ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी  केवळ नोकरीच्या शोधात न राहता उद्योग व्यवसाय यामध्ये लक्ष केंद्रित करावे. यातील विशेष कौशल्य ज्ञान प्राप्त करून उद्योग व्यवसाय स्थापन केले तर ते स्वतः बरोबरच इतरांना सुद्धा रोजगार देतील त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल. राष्ट्र विकासात भर पडेल. ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा याची माहिती घेऊन त्या प्रकारचे उत्पादन घेतल्यास त्या मालाला निश्चित मागणी राहील.  तुमचा उद्योग व्यवसाय यशस्वी होईल. त्याकरिता शासन देखील अनेक योजनांतर्गत उद्योग व्यवस...

कर्तुत्ववान राजकारणी व्यक्तीस महाराष्ट्र मुकला.

Image
कर्तुत्ववान राजकारणी व्यक्तीस महाराष्ट्र मुकला. ब्युरो रिपोर्ट गोंडवाना न्यूज.   28 जानेवारी सकाळी झोपेतून उठून आपल्या कामावर जाण्याची तयारी करत असताना एखाद्या मोठ्या स्फोटाचा आवाज कानावर यावा अशी बातमी येऊन कानावर धडकली बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले मन ग्वाही देत नव्हते, अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.   मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. तो कुणाला कधी भेटेल आणि कसा भेटेल याचा काही नियम नाही असाच, बुधवार दिनांक 28 जानेवारी सकाळी 9:45 वाजता स्पष्ट परखड बोलणारे सडेतोड दिलदार आणि शब्दाला जागणारे नेतृत्व  अकाली  निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आणि महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला....!   अजित दादा यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे सुपुत्र होत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण  देवलाळी प्रवरा येथेच पूर्ण केले बी.कॉम ची पदवी मुंबई येथे पूर्ण केली. अजित पवारांनी 198...

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवार.

Image
  सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक रिंगणात उरलेले उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे.                       जिल्हा परिषद गट                    गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-  कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवार. 54 पाल - माधवराव निवृत्ती काळभोर - भारतीय जनता पार्टी - कमळ,  नयनेश बाबुराव निकम - शिवसेना - धनुष्यबाण, देवराज बाबासाहेब पाटील- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) - तुतारी वाजवणारा माणूस, शंकर सुखदेव वायदंडे - बहुजन समाज पार्टी- हत्ती, सविता भागवत कणसे -अपक्ष -रिक्षा, देवराज धोंडीराम पाटील -अपक्ष -दोरउडी. 55 उंब्रज - रणजीत जगन्नाथ कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन, रणजीत कृष्णराव जाधव भारतीय जनता पार्टी कमळ,  संग्रामसिंह जयवंतराव जाधव  नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) - तुतारी वाजवणारा माणूस, सुनील प्रकाश पाटील शिवसेना उबाठा मशाल, महादेव दिनकर साळुंखे शिवसेना धनुष्यबाण. 5...

५५ कोटींचे एमडी ड्रग्ज कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथून जप्त.

Image
  कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे महसूल गुप्तचर विभागाची(DRI) कारवाई   उंडाळे: प्रतिनिधी.    कराड तालुक्यातील पाचुुपतेवाडी या गावात पोल्ट्री शेडमध्ये तयार होत असलेल्या अमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मितीच्या कारखान्यावर पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआर आय) शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात ५५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले.कराड तालुक्यातील पाचुुपतेवाडी या गावात पोल्ट्री शेडमध्ये तयार होत असलेल्या अमली पदार्थ (ड्रग्ज) निर्मितीच्या कारखान्यावर पुणे विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात ५५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले.कराड तालुक्यातील डोंगरी भागात आणि कराड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाचुुपतेवाडी गावामध्ये एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना सुरू होता.अंमली पदार्थांचा कारखाना गावापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात होती. डीआयआरच्या पथकाने शनिवारी सायंकाळी या शेडवर छापा टाकला. शेडमध्ये एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त करण्यात आला, तसेच संशयितांना ताब्यात घेऊन पोल्ट्री श...

कराड येथे बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

Image
  कराड येथे बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न  कराड :- शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रशांत देसाई, डॉ. पारस कोठारी, डॉ. शेखर कोगनुळकर, डॉ. वैशाली चिंचकर, मंगल जानकर. आदी. कराड - प्रतिनिधी.  कराड येथे बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.ता. 15 ते जानेवारी 18  अखेर  सिव्हिल हॉस्पिटल सातारा व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या समन्वयाने कराड येथील उपजिल्हा रुग्णालय  येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मार्फत 0 ते 18 वयोगटातील बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात झाले.होते. जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल हॉस्पिटल  सातारा डॉ युवराज करपे,  वैद्यकीय अधिक्षक  उपजिल्हा रुग्णालय कराड डॉ.सुनिला लाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पारस कोठारी व त्यांची टीम यांनी शिबिरात68बालकांवर  हर्निया, UNDT इ 23मोठ्या व Phimosis ,Tounge Tie इ  48अश्या एकूण 71शस्त्रक्रिया केल्या.सदर शिबिरास डॉ प्रशांत देसाई  ,डॉ मोहोळकर ,डॉ आरती माने , श्रीमती कांबळे व श्रीमती मंगल जानकर, नर्सिंग इन्चार्ज व श्रीमती आसिया पठ्ठनकुडे  यांनी विशेष सहकार्य क...

चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात अशोक पाटील यांच्या प्रचारात महिलांची आघाडी.

Image
  चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात अशोक पाटील यांच्या प्रचारात महिलांची आघाडी. शिराळा - प्रतिनिधी. (नानासाहेब कांबळे.) चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून, या प्रचारात महिलांनी पुढाकार घेतला आहे. मतदार संघातील कुरळप वशी, लाडेगाव ,चिकूर्डे,देवर्डे,ऐतवडे खुर्द, इटकरे आदी गावात, घरोघरी जाऊन सौ अपर्णाताई  अशोक पाटील व युवक क्रांती महिला आघाडीच्या महिलांनी थेट मतदारांशी संवाद साधत अशोक पाटील यांच्या कार्याची माहिती दिली आहे. महिलांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचाराला वेगळीच उर्जा मिळाली असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. “विकास, सुरक्षितता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारा उमेदवार म्हणून अशोक पाटील यांच्यावर विश्वास आहे,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली. घरभेटी दरम्यान महिलांनी मतदारांशी संवाद साधत अशोक पाटील यांच्या सामाजिक कार्याचा, विकासकामांचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. यावेळी प्रचाराला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असू...

विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली:- प्राचार्य शशिकांत काटे.

Image
विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली:- प्राचार्य शशिकांत काटे.   कराड - प्रतिनिधी. श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड व ग्रामपंचायत मौजे कालवडे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 3 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत उत्साहात संपन्न झाले. शिबिराच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शशिकांत काटे सातारा जिल्हा विभाग प्रमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर हे  होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमदानाचे संस्कार तर होतातच, परंतु विविध प्रबोधन पर कार्यक्रमातून ज्ञानविज्ञानाची ही ओळख होते. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे आपल्या सर्वांना विचारविश्व दिले. शिबिरामध्ये देखील विद्यार्थी ज्ञान विज्ञान तर घेतातच परंतु श्रम संस्काराचे धडे देखील गिरवतात. ग्रामीण भागात अशा ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी रॉमन्स बायोलाईफ लि. ठाणे यांच्यावतीने जेनेसीस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, राधानगरी (कोल्हापूर) येथे घेण्यात आलेल्या पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. सायली गिरीगोसावी व अस्मिता बावडेकर यांनी मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी वर्किंग मॉडेल ऑफ पॅथोफिजिओलॉजी अँड फार्माकोलॉजीकल ॲक्शन ऑफ कारडिओटोनिक्स या विषयावरती मॉडेलचे सादरीकरण केले होते. तर दिक्षा साबळे व धनश्री नाईक या विद्यार्थिनींनी पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी मॉडर्न इन्वोशन इन ड्रग डिलिवरी टेक्नॉलॉजी या विषयावरती पोस्टर प्रेसेंटेशन केले होते. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. मोनिका शिंदे यांनी केले. त्यांच्या समवेत प्राध्यापिका तेजस्वी कांबळे या उपस्थिती...

तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन.

Image
  तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन______ प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व मराठी भाषा पंधरवडा यानिमित्ताने ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञान शिदोरी दिन, उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन, व ग्रंथदान करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला सुसंस्कारित करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ग्रंथ वाचन होय. आज महाविद्यालयात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन साजरा होत असताना ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन व ग्रंथदान हा अतिशय स्तुत्य उपक्रम ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या वतीने राबविण्यात आल...

महाविद्यालयीन विविध स्पर्धातून मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मोठा ऊर्जा स्त्रोत.

Image
  महाविद्यालयीन विविध स्पर्धातून मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मोठा ऊर्जा स्त्रोत ___ मा. बिपीन मोरे.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे दिनांक 12 जानेवारी पासून सुरू असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहातील विविध स्पर्धांचा आज पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने आयोजित केला होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. बिपिन मोरे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कराड हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन विविध स्पर्धातून मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मोठा ऊर्जा स्त्रोत आहे. पूर्वीची शिक्षण पद्धती व आजची शिक्षण पद्धती यात अमुलाग्र बदल झाला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीने विद्यार्थी ठराविक चौकटीत शिकत जातो परंतु ऑफलाइन शिक्षणाने विद्यार्थ्यांच्यात अनेक गुण प्रत्यक्ष रुजवले जातात. विवेकानंद सप्ताहासारख्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सुसंस्कार कोरले जातात.  स्पर्धेतील प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्यात जबाबदारीची जाणीव नि...

समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे आरोग्य जपणे काळाची गरज.

Image
  समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचे आरोग्य जपणे काळाची गरज :- अश्विनी आलदर.   कराड - प्रतिनिधी.  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्षाच्या वतीने महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते प्रमुख मार्गदर्शिका अश्विनी आलदर संस्थापक कॉटन ग्रीन सॅनिटरी नॅपकिन्स या होत्या आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या प्रगतीसाठी महिलांचे आरोग्य जपणे काळाची गरज आहे.   स्त्री ही कुटुंबाची आणि समाजाची आधारस्तंभ असते. त्यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. विशेषतः मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे हे स्त्रीच्या आरोग्याशी थेट संबंधित असते. या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर केल्याने शरीर स्वच्छ राहते. संक्रमण टळते आणि आत्मविश्वास वाढतो. पूर्वी अनेक स्त्रिया वापरलेले कापड पुन्हा वापरत असत. ज्यामुळे संसर्ग आणि त्वचेचे आजार होण्याचा धोका वाढायचा. परंतु सॅनिटरी नॅपकिनच्या वापरामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी ...

विकसित भारताच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट साधन-: डॉ. अभय कुमार पाटील.

Image
  विकसित भारताच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट साधन-: डॉ. अभय कुमार पाटील.   कराड - प्रतिनिधी. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण, अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत "विकसित भारतासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान" या विषयावरती झालेल्या कार्यशाळेत बोलताना सत्र एकचे साधन व्यक्ती डॉ. अभयकुमार पाटील म्हणाले, विकसित भारताच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना हे उत्कृष्ट साधन आहे. महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 1969 ला एनसीसी ला पर्याय म्हणून  महाविद्यालयात एनएसएस निर्माण झाले. युवकांना राष्ट्रकार्याकडे वळवणे हा हेतू होता. आज विकसित भारताची उभारणी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील युवक युवती शेती, आरोग्य, विज्ञान, शासकीय योजना इत्यादींची जनजागृती चांगल्या प्रकारे करू शकतात. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण इत्यादी बाबी वरती विविध उपक्रम राबवून समस्या सोडविण्यास मदत होईल. या सर्व बाबीसाठी युवकांच्यात निर्णय क्षमता हवी. रूढी परंपराच्या बंधनातून मुक्त होऊन ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणी क्षेत्र भेट.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणी क्षेत्र भेट. कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमांमध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता  विविध ठिकाणांच्या  क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड येथील जैविक कचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी भेट दिली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कंपोस्टिंग खत कसे तयार केले जाते तसेच जैविक कचरा म्हणजे काय, जैविक खत तयार करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत तसेच जैविक कचऱ्यापासून कंपोस्टिंग खते कशी तयार केली जातात. तसेच ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण कसे केले जाते आणि या सर्वामुळे कोणकोणते फायदे होतात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालय उंडाळे येथील भेटीमध्ये रुग्णालयामध्ये असणारी वेगवेगळे डिपार्टमेंट जसे की एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, आयसीयू, सिटीस्कॅन मशीन, तातडीक सेवा विभाग, प्रसूती विभाग तसेच मेडिकल विभाग याविषयी माहिती देण्य...

राष्ट्रभिमानाची तेजोमय फडकती पताका म्हणजे श्री स्वामी विवेकानंदांची विचारधारा.

Image
  राष्ट्रभिमानाची तेजोमय फडकती पताका म्हणजे श्री स्वामी विवेकानंदांची विचारधारा. ________मा.ॲड.संभाजी मोहिते कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे दिनांक 12 जानेवारी पासून श्री स्वामी विवेकानंद सप्ताह सुरू आहे. सप्ताहातील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी "श्री स्वामी विवेकानंद तुमचे आणि आमचे" या विषयावरती मार्गदर्शन करताना प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट मा.संभाजी मोहिते म्हणाले, राष्ट्र अभिमानाची तेजोमय फडकती पताका म्हणजे श्री स्वामी विवेकानंदांची विचारधारा आहे विवेकानंद हे व्यक्तिमत्त्वच असे आहे कोणत्याही एका चौकटीत त्यांच्या विचारांना बंदिस्त करता येत नाही. बंधू भावाची शिकवण देणारे सर्वधर्मसमभावाची बीजे पेरणारे, राष्ट्रीयत्वाची भावना जपून युवकांना दिशा देणारे, असे थोर व्यक्तीमत्व आहे. एका जातीपुरते, धर्मापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून समग्र हिंदुस्तान ची महती सांगणारे त्यांचे ज्ञान आहे. लहानपणापासूनच कष्टाळू चिकित्सक वृत्तीचे विवेकानंद कर्मकांड जातीयता न मानणारे होते. अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात साधी राहणी ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे शिवाजी नेर्ली यांचे व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे शिवाजी नेर्ली यांचे व्याख्यान संपन्न. कराड :- प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे मूल्य व तंत्रशिक्षण व पर्यावरण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास  या विषयावरती  समाज प्रबोधक शिवाजी नेर्ली यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणती मूल्ये असावीत तसेच सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वर्तन, शिस्त व आदर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. मूल्य संवर्धन व पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्यांनी रचलेले स्वयंरचित काव्यरचना यावेळी सादर करण्यात आली. या व्याख्यानाचा उद्देश म्हणजे समाजामध्ये सुशिक्षित होत असलेल्या व झालेल्यांना कर्तव्यदक्ष बनविण्यासाठी मदत करणे व जागतिक पर्यावरणाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत करणे असा होता. यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून समाजप्रबोधनाच्या पुढील कार्यासाठी स्वेच्छेने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.  या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गिरीश देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गिरीश देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न. उंडाळे :- प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे ओव्हरविव्ह  ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड इनवेंटरी कंट्रोल  या विषयावरती टेक्निकल सर्विस टेक्नोफ्युशन लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर गिरीश देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये लागणारा कच्चा माल, मनुष्यबळ, मशिनरी, वेळेचे व्यवस्थापन आणि नियोजन हे योग्यरितीने कसे पार पाडायचे की ज्यामुळे कमी खर्चात आपले उत्पादन पूर्ण होईल आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील. तसेच उत्पादन नियंत्रणाचे मुख्य घटक जसे की प्रगतीचा मागवा घेणे, तुलना करणे, विचलन शोधणे, दुरुस्ती करणे तसेच त्याची वैशिष्ट्ये व फायदे काय आहेत याविषयी मार्गदर्शन केले. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी

Image
  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात  रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी _____  उत्तरेश्वर कांबळे. सोलापूर - प्रतिनिधी. देशाचीच नव्हे तर जगाची अस्मिता असलेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीयवादी मनुवादी आठ ते दहा लोकांनी पोस्टर ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) या ठिकाणी जाळून, पायाखाली चिरडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे, हे संतापजनक कृत्य केले असून यामुळे समस्त आंबेडकरी समाजातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे देशभरात याचे तीव्र पडसाद उमटून कायदा व सुवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकार करणाऱ्या मनुवादी अनिल मिश्रा, मोहित ऋषिश्वर ऊर्फ मोहित शर्मा, अमित दुबे, ध्यानेंद्र शर्मा, कुलदीप कांकेरिया, अमित भदौरिया, गौरव व्यास या जातीयवादी लोकांवर रासुका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे रासुका अंतर्गत कारवाई न झाल्यास  भीम आर्मी स्टाईलने देशभरात तीव्र स...

महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

Image
  महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित  "बँकिंग परीक्षेची तयारी व संधी" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न. कराड - प्रतिनिधी. शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड व नॅशनल इन्स्टिटयूट फॉर बँकिंग एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने "बँकिंग परीक्षेची तयारी व संधी" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा महिला महाविद्यालय कराड येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मा. विजय भागवत (माजी व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र), मा. अजित देशपांडे (औदयोगिक क्षेत्रातील तज्ञ) व मा. नारायण आचलेरकर (माजी व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन मा. बाळासाहेब कुलकर्णी हे होते.  मा. विजय भागवत यांनी बँकिंग परीक्षेची तयारी करताना बेसिक संकल्पना सांगितल्या.  मा. अजित देशपांडे यांनी बँकिंग परीक्षेतील गणितीय उदाहरणे सोप्या पद्धतीने कशी सोडवता येतात हे प्रत्यक्ष उदाहरणे सोडवून सांगितले. मा. नारायण आचलेरकर यांनी बँकिंग परीक्षेचे स्वरू...

स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.

Image
  स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था  यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.   उंडाळे - प्रतिनिधी. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. याच कारण म्हणजे, बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 ला 'दर्पण' हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून, मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी रोजीच्या जयंतीनिमित्त स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था  यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि शाल, श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ.

Image
 रा.से.यो विशेष श्रमसंस्कार शिबिरात काव्य सुरांनी रंगली सायंकाळ. कराड- प्रतिनिधी.  श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिरात कवी संमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कवी थळेन्द्रकुमार लोखंडे व कवी उद्धव पाटील यांच्या काव्य सुरांनी सायंकाळची वेळ रंगून गेली. अनंत अडचणीतून संघर्षाची वाट तुडवताना कविता जन्म घेते. कविता जगायला शिकवते. जनसामान्याच्या वेदनेला वाचा फोडते. चळवळीतील तरुणाला ऊर्जा देते. थकलेल्या भागलेल्या देहाला जगायची स्फूर्ती देते. असे प्रतिपादन कवी थंळेन्द्र कुमार लोखंडे यांनी केले.                कवी उद्धव पाटलांनी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांची आठवण आपल्या काव्यातून करून दिली. युवकांना खऱ्या तारुण्याची जाणीव करून दिली. त्यांनी प्रेम कविता, सामाजिक व देशभक्तीपर कवितांचे गायन केले. तसेच स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापकांनीही आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमा...

काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.

Image
  काव्य गायनाने रंगला माता सावित्रीबाईंच्या जयंतीचा सोहळा.    कराड - प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी .बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सबलीकरण आणि लैंगिक समानता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई उत्सव काव्यवाचन अतिशय उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्या मार्गदर्शनात   ते म्हणाले,  सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे नवीन वर्षातला पहिला उत्सव. त्यामुळे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हायलाच  हवी. जेव्हा आपण एखाद्या थोर व्यक्तीमत्वाची वेशभूषा परिधान करत असतो. तेव्हा नकळतपणे त्यांचे विचार त्यांचे व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये संचारत असते. तसेच दैनंदिन जीवनात आपण तसे वागावे याची जाणीव करून देत असते. तात्कालीन परिस्थितीमध्ये स्त्रीला माणूस म्हणूनच अधिकार नसताना शिक्षणाचा अधिकार मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. सावित्रीबाईंनी त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समस्त...

जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटना करणार आंदोलन.

Image
  जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटना करणार आंदोलन.   कराडातील कृष्णा नदी पुलावर  संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी.   निवेदनाद्वारे 26 जानेवारी रोजी दिला आंदोलनाचा इशारा. कराड - प्रतिनिधी.  जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटना यांनी मा. जिल्हाधिकारी सातारा यांना कराडातील कृष्णा नदीवर पुलावर पुलावर संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. 26 जानेवारी 2025 पर्यंत मागणीची पूर्तता न झाल्यास 26 जानेवारी रोजी कराड येथील कृष्णा पुलावरच आंदोलन करण्यात येईल असं निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे.  कृष्णा नदीच्या पुलावरून नागरिक नदीपात्रामध्ये केरकचरा टाकून प्रदूषण घडवून आणतात. त्याचबरोबर पुलावरून होणाऱ्या आत्महत्याच्या घटना रोखण्यासाठी कृष्णा नदीच्या कराड येथील पुलावर संरक्षक जाळी बसवावी याची मागणी निवेदनाद्वारे केली. वारंवार या पुलावर संरक्षक जाळी बसवण्याची मागणी होत असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. 26 जानेवारीपर्यंत ही संरक्षक जाळी बसली नाही तर आंदोलन करणार असं जान फाउंडेशन व मानव कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी मा .जावेद नायकवडी, मा.सलीम पटेल, म...

सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना

Image
  सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना  ____प्रा. अधिकराव कणसे. कराड - प्रतिनिधी. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. शिबिरातील राजकीय सेवा योजना व स्फूर्ती गीते प्रबोधन पर कार्यक्रमात पहिले पुष्प गुंफण्यासाठी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अधिकराव कणसे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपण्याची सुवर्णसंधी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. मन, मनगट, मेंदूच्या बळावरती माणसं शून्यातून विश्व निर्माण करतात. याची अनेक उदाहरणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पहावयास मिळतात. आपल्या वक्तृत्वाच्या जीवावरती राजकीय पटलावरती आपले व्यक्तिमत्व उंची वरती नेणारे आर. आर. (आबा) पाटील राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले . समाजाची सेवा करून बाबा आमटे यांनी जनमानसात आपले अढळ स्थान निर्माण केले. गावातील ग्राम स्वच्छता करता करता पर...

वारणा विद्यालय, सागाव मध्ये 'अभ्यासाचा भोंगा' उपक्रमाकरिता पालक - मेळावा.

Image
  वारणा विद्यालय, सागांव मध्ये  'आभ्यासाचा भोंगा' उपक्रमाकरिता पालक - मेळावा.   शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,सागांव मध्ये सागांव ग्रामपंचायत व वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव संयुक्त विद्यमाने'अभ्यासाचा भोंगा'उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागांव गावच्या लोकनियुक्त सरपंच मा. आस्मिता पाटील मॅडम होत्या.या पालकमेळाव्यात पालक-शिक्षक समिती,सखी सावित्री समिती, विद्यार्थी सखी सुरक्षा समिती इत्यादी सर्व समितीचे अध्यक्ष व सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए.सी. सदावर्ते, सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या उपक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. व्ही.डी. पाटील  यांनी केले.याप्रसंगी प्रा. बी.एम.नलवडे  यांनी अभ्यासाचा भोंगा उपक्रमात ग्रामपंचायत सागांव मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले. तसेच अभ्यास भोंगा ही काळाची निकड असून प्रत्येक विद्यार्थी अभ्यासकेंद्री बनावा, विद्यार्थ्यामध्ये वाढता मोबाईलचा वापर,टी. व्ही. वर...