Posts

Showing posts from October, 2021

शिराळा तालुक्यात विपश्यना केंद्र उभारणार.

Image
  शिराळा तालुक्यात विपश्यना केंद्र उभारणार. शिराळा - प्रतिनिधि,   चिंचोली ता. शिराळा जि. सांगली याठिकाणी शिराळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तालुक्यांमध्ये विपश्यना केंद्र उभारणार असल्याची माहिती दिली.या केंद्राचा शिराळा तालुक्या बरोबरच  परिसरातील तालुक्यांनाही ध्यानधारणा करण्याची संधी मिळणार आहे. त्याकरिता हे केंद्र उभारण्यासाठी सर्वजण शक्तीचे प्रयत्न करत आहेत. आयु.प्रकाश बोरसे ( विपश्यनाचार्य) पुणे, आयु.संजय भोसले ( कराड ) आयु.नथु कांबळे(मुंबई) यांच्या मोलाच्या सहकार्यातून हे केंद्र उभे रहाणार आहे.  मा. सुनील घोलप यांनी बैठकीचे नियोजन केले होते. डॉ.संदीप कांबळे,     डॉ.रोहित वाघमारे ,  मा.वैभव वाघमारे ,  डॉ.विनोद झाडे,           अजय एटम,भारत मोहीते, हरीश काळे , सुरेश घोलप इ.कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.भविष्यकाळात विपश्यना केंद्र उभारण्याकरिता शिराळा तालुक्यातील विविध संघटनेत काम करणाऱ्या धम्म बांधवांनी या विपश्यना केंद्रासाठी सहकार्य द्यावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

इन्स्पायर अवॉर्ड नामांकन मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रमध्ये विभागात प्रथम.

Image
  इन्स्पायर अवॉर्ड नामांकन मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रमध्ये विभागात प्रथम. कराड प्रतिनिधी:- प्रवीण पाटील इन्स्पायर अवॉर्ड योजना 2021- 2022 मध्ये विद्यार्थी नोंदणी साठी सातारा जिल्हा महाराष्ट्र मध्ये तिसरा तर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थी नोंदणी एकूण 2170 एवढी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त कराड तालुक्यात 435 झाली आहे. जावळी तालुक्यात 138, खटाव 153, कोरेगाव 150 महाबळेश्वर 232,माण 114, फलटण 138, सातारा 285, वाई 132, पाटण 285 तर सर्वात कमी खंडाळा तालुक्यात 108 एवढी झाली आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात 2170, सांगली 1328, कोल्हापूर 1198, रत्नागिरी 693, सिंधुदुर्ग 137 एवढी या जिल्ह्यात विद्यार्थी नोंदणी इन्स्पायर अवॉर्ड 2021- 2022 मध्ये झाली असल्याची माहिती जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे यांनी दिली आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे मॅडम जिल्हा परिषद सातारा यांनी विद्यार्थी नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले....

कृष्णा कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन.

Image
  कृष्णा कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन. रेठरे बुद्रुक, ता. २९ : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२०२२ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुसज्ज अशी तोडणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तेव्हा सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस कृष्णा कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सेक्रेटेरी मुकेश पवार, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, असि. जनरल मॅनेजर डिस्टलरी प्रतापसिंह नलवडे, शुगर गोडाऊन किपर रामचंद्र कदम, कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, कार्यालयीन अधीक्षक निलेश देशमुख...

जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न .

Image
  कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुरेश भोसले. जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात. कराड - प्रतिनिधि.  जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय हे कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, येत्या काळात त्यादृष्टीने महाविद्यालयात स्वतंत्र संशोधन विभाग सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कृषी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.           व्यासपीठावर कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, प्रा. आर. डी. पवार होते. याप्रसंगी कृष्णा कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉ. भोसले यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच प्रथम क्रमांक विजेत्या अंकिता शेळके या विद्यार्थीनीला सुवर्णपदक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की कृष्णा कारखान्याने कृषी महाविद्यालयाची स्थापना करू...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन नियोजन बैठक उत्साहात.

Image
  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन नियोजन बैठक उत्साहात. ब्यूरो रीपोर्ट -  प्रवीण पाटील. अमरावती येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने 5 डिसेंबर 2021 रोजी पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे त्या अनुषंगाने हाॅटेल प्राईम पार्क येथे शनिवार दि 23 रोजी विशेष बैठक पार पडली. यात संघटनेच्या राज्यातील केंद्रीय पदाधिकारी सह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मधील संघटना प्रमुख व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी सुने तर प्रमुख अतिथी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापु देशमुख होते.. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाला 25 वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने संघाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा हा स्मरणिकेचे माध्यमातून घेतला जाणार आहे त्या साठी संघाच्या वतीने भरारी स्मरणिकेचे प्रकाशन व कार्यालयीन दिनदर्शिका नियोजनाची माहिती  या बैठकीत देण्यात आली. या बैठकीस केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे केंद्रीय सचिव अशोक पवार, या सह पत्रकार संघाचे विविध जिल्ह्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी मोठय़ा संख्य...

ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा,

Image
  ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग  महत्वाचा. 'महिलांची स्वतंत्र ग्रामसभा  बंधनकारक .' ब्यूरो रीपोर्ट - पी.डी. पाटील. म हिला सदस्य या नात्याने महिला ह्या ग्रामसभेच्या घटक आहेत. त्यांच्या उपस्थिती आणि सहभागाशिवाय ग्रामसभा उचित कार्य प्रभावीपणे करू शकणार नाहीत. ग्रामसभेच्या नियमित सभांना उपस्थित राहून महिलांनी निर्णय घेण्याचा आपला हक्क बहावला पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रवृत्त व्हावे याची विशेष व्यवस्था नव्या दुरुस्तीने केली आहे.महिला ग्रामसभा अनिवार्य.महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या विकास कार्यक्रमात महिलांचाही सहभाग असावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. महिला ग्रामसभेला जरी हजर असल्यातरी पुरुषांपुढे बोलण्यास तसेच आपली मते मोकळे पणाने न मांडण्यामागे त्यांच्यावर दबाव मानसिक असतो. त्यामुळे महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन त्यांनी खुली चर्चा करून त्यांचे प्रश्न,समस्या मांडल्या पाहिजेत व त्याप्रमाणे त्यांच्या हिताचे व सोईस्कर निर्णय त्यांना घेता आले पाहिजेत या उद्देशाने महिला ग्रामसभांना अतिशय महत्व आहे. अशा रितीने महिला ग्रा...

मलकापुरात कवचकुंडल अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

Image
  मलकापुरात कवचकुंडल अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद. मलकापुर नगरपरिषदेची लसीकरण मोहिमेत आघाडी.८०% नागरिकांचे लसीकरण पूर्ण. मलकापूर :   उपस्थित  तानाजी देशमुख,राजेंद्र यादव,ज्ञानदेव साळुंखे, रामभाऊ शिंदे व इतर.   मलकापुर - प्रतिनिधि. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मलकापुर नगरपरिषदेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल अभियानाला शहरवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. मलकापुर नगरपरिषद व आरोग्यविभाग यांच्यावतीने प्रभाग निहाय लसीकरण मोहिम राबवण्यात येत असुन. ज्यांनी आज पर्यंत कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेली नाही अशा नागरिकांची यादी तयार करुन प्रत्येक प्रभागातील नोडल अधिकारी आरोग्यसेविका यांच्यावतीने सर्वे करुन संबधीत प्रभागामध्ये विशेष अभियान राबवण्यात येत आहे. मलकापुर शहरामध्ये कोरोनारुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चिञ आहे. शहरामध्ये झालेल्या उच्चांकी लसीकरणाचा परिणाम समाधानकारक असा असल्याने यावर पूर्ण नियंञण मिळवण्यासाठी  मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शहराच्या प्रभागातील प्रत...

वंदना संतोष नांगरे यांचे निधन.

Image
  वंदना संतोष नांगरे यांचे  निधन. शिराळा - प्रतिनिधि. करूंगुली गावचे ग्रामपंचायत सदस्य, संतोष नांगरे यांच्या पत्नी वंदना संतोष नांगरे यांचे मंगळवार दिनांक  26 / 10/ 2021 रोजी दुःखद निधन  झाले.  रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक 29/ 10/ 2021 रोजी 10 वाजता करूंगुली ता.शिराळा जि.सांगली

पणूम्ब्रे वारूण या गावातील पाणीपुरवठा पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा तीव्र आंदोलनचा इशारा.

Image
  पणूम्ब्रे वारूण या गावातील पाणीपुरवठा पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा तीव्र आंदोलनचा इशारा.  शिराळा - प्रतिनिधि.(नानासाहेब कांबळे.) शिराळा तालुक्यातील पणूम्ब्रे वारूण या गावातील पाणीपुरवठा गेले 12 दिवसापासून ठप्प असलेने तात्काळ येत्या 24 तासात पाण्याची पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा सोमवार दि. 25 ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडणेचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार मा. गणेश शिंदे यांना देणेत आला.     यावेळी उपस्थित सांगली जिल्हा उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष मा. राजेश गायगवाळे, तालुकाध्यक्ष निखिल कांबळे, महासचिव अल्केश कांबळे, आकाश कांबळे, संघटक पोपट बनसोडे, आकाश पोळ, सचिव संदीप बागडे, जिल्हा सदस्य मुरली बनसोडे व तालुक्यातील पदाधिकारी.

शासनमान्य "प्रेस मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या" पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी स्वाती देसाई यांची निवड.

Image
  शासनमान्य "प्रेस मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या"  पुणे जिल्हा महिला  अध्यक्षपदी स्वाती देसाई यांची निवड. सातारा (प्रदिप पाटील) : पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी व सबंध महाराष्ट्रात कार्यरत असलेली  शासनमान्य पत्रकार संघटना "प्रेस मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन   च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी स्वाती अनिल देसाई यांची निवड करण्यात आलीय. संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष सागर पाटील यांनी ही निवड केलीय.  पुणे जिल्हाध्यक्ष पदावर असतानासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल माळवदकर, राज्य उपाध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिक पणे पार पाडुन, पत्रकार बांधवांनच्या समस्या विचारात घेऊन सोडवण्याचे प्रामाणिक काम करेन असे निवडीनंतर स्वाती देसाई यांनी पत्रकारांनशी बोलतांना सांगितले . पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेस मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना संघटीत करण्यासाठी  लवकरच पुणे जिल्ह्यातील  प्रत्येक तालुक्यात  निवडी करण्यात येतील, अशी माहिती संघटनेचे नुतन आद्यक्षा स्व...

ड्रीम फाऊंडेशन करणार डाॅ.संदीप डाकवे यांचा गौरव.

Image
  ड्रीम फाऊंडेशन करणार डाॅ.संदीप डाकवे यांचा गौरव. तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गेली 5 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले जात आहे. याची दखल घेत ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय डाॅ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार जाहीर केला आहे. अशी माहिती सोलापूर येथील ड्रीम फांऊडेषन चे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी व चाणक्य गुरुकुल अकॅडमी च्या संगीता भतगुणकी यांनी दिली आहे. यशदाचे उपमहासंचालक डाॅ.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा चे अतुल कुलकर्णी, कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव होणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून ड्रीम फाऊंडेशन व चाणक्य गुरुकुल अकॅडमी यांनी हा सोहळा पत्रकार भवन पुणे येथे शनिवार दि.23 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केला आहे. यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे 4  पु...

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी अ‍ॅड. रवि पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल.

Image
  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी अ‍ॅड. रवि पाटील यांचा उमेदवार अर्ज दाखल. शिराळा - प्रतिनिधि. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची  पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस आय  पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री करे यांच्या कडे शिराळा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष ऍड रवि पाटील याचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला.सोबत सागावचे माजी सरपंच शशिकांत पाटील .मा रविंद्र कोकाटे. श्री. उत्तम कदम, रामभाऊ संकपाळ आ मान्यवर यावेळी उपस्थित होते

प्रा.डॉ.अनिल विष्णू निकम यांचे निधन.

Image
  प्रा.डॉ.अनिल विष्णू निकम यांचे निधन. कार्वे प्रतिनिधी :-                     शेरे ता.कराड येथील प्रा.डॉ.अनिल  विष्णू निकम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे शिक्षण बी.एस.सी.,एम. बीए, एम.सीए, एम.एस. डब्ल्यू, एम.फील.,पीएच.डी. झाले होते. ते भारती विद्यापीठ मध्ये  आयटी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख तसेच दूर शिक्षण विभाग भारती विद्यापीठाचे संचालक होते. त्यांना क्रिकेट क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी कॉलेजला खेळांमध्ये अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्याच बरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व तीन भाऊ असा एकत्रित मोठा परिवार आहे.  रक्षा विसर्जन मंगळवारी 19/10/2021रोजी सकाळी 10:00 वाजता कृष्णा घाट कराड येथे होणार आहे.

आरळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धक्का.शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश.

Image
  आरळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धक्का.शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश. शिराळा - प्रतिनिधि.( नानासाहेब कांबळे.)       आरळा ता. शिराळा  येथील  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधून 25 हुन अधिक  प्रमुख कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार भाजपचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख भाऊ  व युवा नेते माजी जि.प सदस्य रणधीर नाईक पापा यांनी केला.     यावेळी माजी प.स.सभापती एस.वाय कासार, माजी सरपंच हिंदुराव नांगरे,माजी उपसभापती एन डी लोहार,संचालक प्रकाश जाधव, सरपंच आनंदा कांबळे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड,मणदूर सरपंच वसंत पाटील,सोनवडे सरपंच रवि यादव, पोपट गुरव, बबन भुसारी, विश्वनाथ देशपांडे, अशोक बेर्डे, माजी उपसरपंच वसंत पाटील , पै संदीप चव्हाण, रणजित येसले, संजय पाटील,ज्ञानदेव बेर्डे, संजय घोडविल, आनंदराव पाटील, माजी चेअरमन निवृत्ती पाटील, रणजित भुसारी,शंकर चव्हाण , विजय भाडुगळे,नारायण चव्हाण,नाना पाटील, विष्णू पाटील,संजय पाटील, लक्ष्मण बाबर, महादेव पाटील, वसंत पाटील,...

विकास पर्व अर्बन निधी बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Image
  विकास पर्व अर्बन निधी बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली. _________पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले. कराड - प्रतिनिधि.  कराड येथील विकास पर्व अर्बन निधी बँकेच्या मुख्य कार्यालयात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान करण्यात आला या वेळी संस्थेचे संस्थापक  सिद्धेश्वर वाघमारे, संस्थेचे उपाध्यक्ष अमोल कणसे संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे कराड सारख्या शहरात विकास पर्व अर्बन निधी बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे बँकेचे माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेले उपक्रम आदर्शवत आहेत. संस्थापक सिद्धेश्वर वाघमारे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.

जयवंत शुगर्स’चे ७ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट.

Image
  'जयवंत शुगर्स ' चे ७ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट. ११ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ. कराड - प्रतिनिधी.  धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ झाला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या हंगामात कारखान्याने ७ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. याप्रसंगी श्री. पृथ्वीराज भोसले, श्री. विनायक भोसले, ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सत्यजीत पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली पवार यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या हंगामात जयवंत शुगर्सचे अतिशय चांगली कामगिरी करून शेतकऱ्यांचे हीत साधले आहे. या हंगा...

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शाखा वाळवा तालुका यांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Image
  भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शाखा वाळवा तालुका यांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कासेगाव - प्रतिनिधि.(उमेश कांबळे.) या वेळी भारतीय बौद्ध महासभा ता. अध्यक्ष आयु.सचिन कांबळे, उपाध्यक्ष आयु. चंद्रकांत पवार ( संरक्षण विभाग ),जिल्हा सचिव आयु.प्रा. राजेंद्र पवार ( संरक्षण विभाग ),सचिव आयु. जितेंद्र पवार (संरक्षण विभाग ),सरचिटणिस आयु.बापूराव बसवंत, ता. संघटक,आयु.अभिजित रसाटे, आयु. मिलींद माने, आयु. जितेंद्र भिलवडीकर आयु. सुनिल कांबळे ,आयु सागर कांबळे,ता. संघटक आयु. जयसिंग कांबळे,ता. संघटक आयु. सचिन कांबळे,आयु. लहू वाघमारे,आयु आनंदा कांबळे,  तक्षशिला ज्ञान केंद्र इस्लापूरचे अध्यक्ष आयु. प्रकाश कांबळे ,वंचित बहूजन आघाडी राज्य महीला कार्यकारणी सदस्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आयु. संजय बनसोडे व आंडेकर चळवळीतिल असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.

भारतीय बौद्ध महासभा,याचे वतीने धम्म अभ्यास दौरा.

Image
भारतीय बौद्ध महासभा,याचे वतीने  धम्म अभ्यास दौरा. कासेगाव - प्रतिनिधि.(उमेश कांबळे.) भारतीय बौद्ध महासभा,याचे वतीने आगाशिवनगर मलकापूर ता. कराड जि सातारा.येथे दि. १७ ऑक्टोबर 2021 रोजी धम्म अभ्यास दौरा आयोजित केला आहे.आपल्या परिसरातील सर्व   धम्माशी निगडित ठिकाणांना भेटी देणे,त्यांचा अभ्यास करणे व समाजापर्यंत माहिती पोहचवून लोकांना त्या ठिकाणांना भेटी देण्यास प्रेरित करणे या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित केला आहे.तरी सर्वांनी सहभागी व्हावे,ही विनंती.स्वतःचे जेवण , पाणी,औषधे  व स्व खर्चाने मेळाव्यास येणे.सर्वांनी १० वाजता डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारक  पेठ येथे १० .०० वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे.                      

इन्स्पायर अवार्डची मुदत वाढ.

Image
  इन्स्पायर अवार्डची मुदत वाढ.   प्रतिनिधी -  प्रवीण पाटील.      इन्स्पायर अवार्ड 2021 - 22 साठी होणाऱ्या प्रदर्शनाच्या विद्यार्थ्याचे नाव नोंदणीची मुदत वाढ 15 ऑक्टोबर पर्यंत होती. ती आता 24 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. इन्स्पायर अवार्ड 2021 - 22 विद्यार्थी नोंदणीमध्ये नेहमी प्रमाणे सातारा जिल्हा सर्वात अधिक अग्रेसर आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन विभागांमध्ये सातारा जिल्हा विभागात पहिला आहे. तर महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर नोंदणी मध्ये आहे. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये इन्स्पायर अवॉर्डसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी 1131 एवढी झाली आहे. तसेच सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी कराड, पाटण आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यातील शाळेमधील विद्यार्थ्यांची झाली आहे. अशी माहिती सातारा जिल्हा समन्वयक उबाळे एल.एच श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे तालुका सातारा यांनी दिली आहे.        तसेच शिक्षण विस्तार अधिकारी विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे जिल्हा परिषद सातारा यांनी विद्यार्थी नॉमिनेशन वाढवण्यासाठी विशेष प्...

६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

Image
  ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.      'समता नगर नाटोली ता- शिराळा  येथे संपन्न.' कराड - प्रतिनिधि,  दि.१४ ऑक्टोंबर २०२१ संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. समता नगर नाटोली तालुका शिराळा जिल्हा सांगली याठिकाणी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका यांच्या अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले."धर्मांतर झाले परंतु परिवर्तनाचे काय" या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.अमोल कांबळे सर यांनी महत्त्वपूर्ण व्याख्यान देत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्त्वनेच आपली प्रगती होईल,त्याशिवाय आपण सर्वजण शून्य आहोत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉ.बाबासाहेबांचे वाक्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून देत प्राध्यापक अमोल कांबळे सर यांनी उपस्थित बौद्ध उपासक- उपासिकांना व्याख्यानाद्वारे सांगितले. यावेळी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक /अध्यक्ष डॉ. संदीप कांबळे यांनी परिवर्तन घडवायचे असेल तर बाबा...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमोल साठे तर जिल्हा संघटक पदी संजय पाटील यांची निवड.

Image
  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमोल साठे तर जिल्हा संघटक पदी संजय पाटील यांची निवड. कराड - प्रतिनिधि,  कराड येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सातारा जिल्ह्यातील कार्यकारिणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी या बैठकीस सदर निवडी जाहीर करण्यात आल्या या निवडी केंद्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापु देशमुख, केंद्रीय सचिव अशोक पवार केंद्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे यांच्या आदेशानुसार निवडी ची घोषणा पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांनी केली या वेळी महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या की गेल्या  काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कार्यकारिणी ची नियुक्ती करण्यात आली नव्हती कारण राज्या वर कोरोना चे संकट होते आणि अजून सुद्धा आहे त्याच बरोबर फक्त पदा साठी काम न करता संघटना वाढी साठी चांगल्या व्यक्तींची निवड व्हावी म्हणून ...

वडगाव हवेली येथे उमेद अभियाना अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Image
  वडगाव हवेली येथे उमेद अभियाना अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न. कार्वे  - प्रतिनिधि.(प्रवीण पाटिल.) शासनाच्या उमेद अभियान अंतर्गत काम करीत असलेल्या येथील नवदुर्गा महिला ग्रामसंघाच्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्त आयोजित करण्यात  आलेल्या  महिला मेळावा व महिलांसाठी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.         शासन आज महिला साक्षमीकरणासाठी विविध स्तरावर काम करत आहे.बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बचतीबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधनेसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.      येथील नवदुर्गा महिला ग्रामसंघा च्या वतीने कोरोना नियमांचे पालन करत परिसरातील महिलांचा मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये  रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, दांडिया आदी स्पर्धांमधून महिलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रदूषण नियंत्रण काळाची गरज, मुलगी वाचवा देश वाचवा, स्वच्छता अभियान, निसर्गाची देणगीतसेच कोरोना योध्याचा लढा, कोरोना सुरक्षा साधन...

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी डॉ.संदीप कांबळे यांची घेतली सदिच्छा भेट .

Image
    डेमोक्रेटिक  पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी  डॉ.संदीप कांबळे यांची घेतली सदिच्छा भेट . समतानगर नाटोली :  प्रा.सुकुमार कांबळे सर,  डॉ.संदीप कांबळे,व इतर.    कासेगाव - प्रतिनिधि (उमेश कांबळे.)                     डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे यांची सदिच्छा भेट घेतली. शिराळा तालुक्यातील दलित समाजातील वेगवेगळ्या समस्या व अडचणीवर कशा पद्धतीने मात करता येईल याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. प्रा.सुकुमार कांबळे सरांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून संघटन कसे मजबूत होईल या विषयावर भाष्य केले.यावेळी डॉ.संदीप कांबळे यांनी सरांच्या विचारांना पाठिंबा देत भविष्यकाळात संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र आपल्या खांद्याला खांदा लावून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल तिथे आम्ही आपल्या सोबतच असू असे अभिवचन दिले. यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष...

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते 'कोरोना योध्दा सन्मान' सोहळा संपन्न.

Image
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  'कोरोना योध्दा सन्मान'   सोहळा  संपन्न. कासेगाव - प्रतिनिधि.(उमेश कांबळे.)   शिराळा  येथील पोलिस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत तालुक्यातील सर्व पोलीस पाटीलांचा कोरोना योध्दा सन्मान व पोलीस ठाण्याच्या आवारात दहा लाख खर्च करून बसवलेल्या दोन हायमास्ट पोलचे उदघाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी   श्री.  पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार नाईक म्हणाले,   " कोरोनाच्या कठीण परिस्थतीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य जबाबदारीने पार पडले, त्या सर्व घटकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. तुम्हीं समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनिय आहे."  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पिंगळे, पोलीस निरीक्षक श्री. चिल्लावार, महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वि...

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश.

Image
  भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश.   कासेगाव प्रतिनिधी - उमेश कांबळे. शिराळा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. प्रवेश केलेले  पै.  शहाजी संजय गायकवाड,  पै.  संदीप संजय गायकवाड, ओंकार मानसिंग गायकवाड, विनायक प्रकाश गायकवाड, योगेश दिनकर कदम यांचे स्वागत व सत्कार आमदार नाईक यांनी केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज नाईक, अमित गायकवाड, सुशीलकुमार गायकवाड, संजय कदम, जितेंद्र गायकवाड, आकाश गायकवाड, अविनाश गायकवाड, वैभव गायकवाड, रोहीत गायकवाड, प्रथमेश गायकवाड, कुलदीप नावगेकर, रोहन गायकवाड, सनी गायकवाड, विश्वजित गायकवाड, सौरभ गायकवाड, प्रणव गायकवाड, ओंकार गायकवाड व इंद्रजित गायकवाड आदी उपस्थित होते.

ग्रामसभा" सूत्रधाराच्या" मर्जीवर.. सरपंच ,सदस्य फक्त नावापुरतेच..?

Image
  ग्रामसभा" सूत्रधाराच्या" मर्जीवर.. सरपंच ,सदस्य फक्त नावापुरतेच..?   ग्रामस्थांची ग्रामसभेकडे पाठ.. चांगल्या कामाच्या अपेक्षा दिल्या सोडुन..?     उंडाळे - पी.डी. पाटिल.(गोंडवाना न्युज.)     ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली. ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्...

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन.

Image
  आमदार मानसिंगराव नाईक  यांच्या हस्ते  सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन. शिराळा - प्रतिनिधी  (नानासाहेब कांबळे.) चिंचोली आत्मलिंग मंदिरासमोर मा आ मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या प्रयत्नातून 25/15योजनेतू मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन व भाऊंचा ग्रामस्थांच्या वतीने विषेश सक्तार सभाऱंभ आयोजित करण्यात आला  या वेळी बोलताना भाऊ म्हणाले आत्मलिंग मंदिर क वर्गात घालून पर्याटण स्थळ विकसित करू  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रास्ताविक प्रकाश जाधव सर यांनी केले प्रमुख उपस्थितीत डॉ नंदकुमार पाटील यांनी भरगोष मंदिरासाठी देणगी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला मनोगत पै संपतराव जाधव सुनिल घोलप  यांनी व्यक्त केले जेष्ठ नेते नारायण जाधव शेठ ,पै .संपतराव जाधव, पै.प्रल्हाद जाधव प्रकाश जाधव ,ओंकार जाधव मा. सरपंच अमर जाधव,पंडित लोंढे गुरुजी ,बाळू जंगम  उपस्थित होते  कार्यक्रमाचे आयोजन सरपंच फत्तेसिंग जाधव उप सरपंच सुरेश जाधव मधुकर जाधव यांनी केले सुत्रसंचलन शिवाजी जाधव यांनी केले आभार पै संजय जाधव यांनी मानले

अपघाती निधन झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत.

Image
  अपघाती निधन झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत.  शिराळा - प्रतिनिधि.( नानासाहेब कांबळे.) शिराळा येथील प्लंबिंगचे काम करणारे संजय पोपट शेटे (वय- 46)  यांचे दि.१५ सप्टेंबर रोजी  कामावरून घरी येत असताना अपघाती निधन झाले.त्यांच्या कुटुंबाला शिराळा तालुका कामगार परिषदेच्या माध्यमातून शिराळा परिसरातील प्लंबिंग व्यवसायिक  , दुकानदार आणि दानशूर लोकांच्या सहकार्याने आर्थिक मदत देण्यात आली.असंघटीत क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिराळा तालुका कामगार परिषद कार्यरत आहे.  पाडळी ता.शिराळा येथे शिरशी - शिराळा मार्गावर झालेल्या अपघातात संजय शेटे यांचा   उपचारा दरम्यान मृत्यू झाला . कुंटुंबाचा ते प्रमुख आधार होते. त्यांच्या मृत्यूनंतर शिराळा तालुका कामगार परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष मारूती रोकडे यांनी आधार देण्याचे काम केले आहे. त्यांनी शिराळा परिसरातील  प्लंबिंग व्यवसायिक  , दुकानदार आणि दानशूर लोकांच्या सहकार्यातून शेटे कुटुंबाला आर्थिक मदत केली.शिराळा ट्रेडर्स असोशियनचे अध्यक्ष  विश्र्वास कदम यांच्य...

काँग्रेसला न ‘भावलेले ‘ मधुकर भावे.

Image
  काँग्रेसला न ‘भावलेले ‘ मधुकर भावे. प त्रकाराने एखादी विशिष्ट विचारसरणी फॉलो करावी किंवा नाही,हा हल्ली खूपच चर्चेचा विषय झाला आहे.महाराष्ट्राच्या पत्र इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतील की, ज्यांनी विचारसरणीचा पाठपुरावा केला,चळवळीत सक्रिय सहभाग घेतला,यशस्वीही करुन दाखवला.अगदी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,प्र.के.अत्रे यांच्या पासून अलीकडच्या संजय राऊत यांच्या पर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील.या सर्वांत एक साम्य म्हणजे,ते फक्त 'लिहते ' नव्हते तर ' कर्ते ' सुद्धा होते.आणि त्यांच्या या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारणावर उमटलेला दिसून येतो.पण प्रदीर्घ अनुभव,व्यासंग आणि महाराष्ट्राच्या स्थापने पासून प्रत्येक ऐतिहासीक प्रसंगाचा साक्षीदार असलेला, एक निरपेक्ष अवलिया मात्र महाराष्ट्राच्या कौतुकापासून थोडासा दूरच राहिला.अगदी निरपेक्ष भावनेनं.त्यांना त्याची खंत आहे ना खेद.  'करमण्ये वाधिकारस्ये ' या तत्त्वाने ते चालत राहिलेत,अजूनही चलाताहेत. वयाची ८२ वर्षे पार केलेल्या या सळसळत्या रक्ताच्या चैतन्यमूर्तीचं कौतुक महाराष्ट्रानं फारसं केलं नाही,याची खंत माझ...

सौ.शारदा भस्मे सरपंच सेवा महासंघाच्या पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती.

Image
 सौ.शारदा भस्मे सरपंच सेवा महासंघाच्या पुणे  विभागीय महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती. सातारा - प्रतिनिधी. सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडुज येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.शारदा सजंय भस्मे यांची पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी  महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे.  आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने  शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.          सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडुज हे गाव सर्वात मोठ  आहे येथील सामाजिक कार्यकर्त्या विविध क्षेत्रातील पुरस्कारकार प्राप्त सौ. शारदा संजय भस्मे त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन, संघटना वाढीसाठी त्यांच्या खांद्यावर पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणी च्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके, राज्य स...

बहूजन युथ पँथर तर्फे प्रांतअधिकारी ईस्लामपुर यांना निवेदन.

Image
  बहूजन युथ पँथर  तर्फे प्रांतअधिकारी ईस्लामपुर यांना  निवेदन. शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.) उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या शेतकर्‍यांच्या क्रूर हत्ये संबंधात बहूजन युथ पँथर तर्फे प्रांतअधिकारी ईस्लामपुर यांना  निवेदन देण्यात आले ,संबंधित दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी बहूजन युथ पँथर ने निवेदनात   मागणी  केली आहे.यावेळी उपस्थित महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष मा सुशांत पवार , वाळवा तालुका युवा अध्यक्ष मा. रोहन धुमाळे, वाळवा तालुका युवा उपाध्यक्ष मा. प्रकाश पवार , दिन कर बोकने , विनोद कुरणे,  अनिकेत धुमाळे , हे उपस्थित होते.

सुनिल घोलप चिंचोली यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.

Image
  सुनिल घोलप चिंचोली यांनी पर्यावरण संवर्धनाचा  दिला संदेश. शिराळा - प्रतिनिधी. कुटूंब पहीले प्रथम मग समाज सेवा पण ती प्रामाणिकपणे केली पाहिजे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे स्वता काही करायचे नसेल तर करणाराला विरोध करू नये नेहमी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे मी डॉ.बबन घोलप दादा यांच्या प्रेरणेने बुद्ध धम्म म्हणजे काय ते शिकण्याचा प्रयत्न करीत आहे मला सार्वजनिक काम करण्यात आनंद वाटतो त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे काम करीत राहणार आहे डॉ बबन घोलप दादा यांनी सांगितले की वनमोहत्सव सुरू करा मी येथील त्यांना घेऊन सुरुवात केली आज त्याचे चीज झाले लावलेल्या झाडांना फळे कधी लागतील ते माहीत नाही पण किमान फुले तरी माझ्या हातात मिळाली व ती फुले भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वाहिली मी सर्वांना विनंती करेन अजून पाऊस पडतो आहे तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी अजूनही झाडे फुले विहार व मोकळ्या जागेत लावा व त्याचा आनंद घ्या. यावेळी अजित घोलप ,शिवाजी घोलप, गणेश घोलप, सिध्दार्थ घोलप, पांडुरंग घोलप ,अमृत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिरशी ता.शिराळा येथे प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांची विभागीय बैठक संपन्न.

Image
शिरशी ता.शिराळा येथे प्रमुख  भाजपा कार्यकर्त्यांची विभागीय बैठक संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. शिरशी ता.शिराळा येथे प्रमुख कार्यकर्त्यांची विभागीय बैठक संपन्न झाली .यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील,विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजीतसिह  नाईक,शिराळा बाजार समितीचे सभापती सुजित देशमुख, प्रकाश पाटील, शिरशी सरपंच एम पी भोसले, उपसरपंच सर्जेराव महिंद, संजय महिंद, भटवाडी सरपंच विजय महाडिक ,भास्कर महिंद,गणपती भोसले, भिमराव नाटूलकर, संपत नाटूलकर ,जयसिंग ढवळे,  सुरेश दंडवते, संतोष दंडवते ,तात्यासो धुमाळ ,सचिन चव्हाण, सुरेश चव्हाण ,बाबाजी चव्हाण ,सुनील माने, सरपंच शरद गुरव,दत्ताजी महाडीक,हरीश पाटील, महादेव पाटील ,युवराज पाटील, तात्यासो धुमाळ ,सुभाष धुमाळ, प्रकाश पाटील, वसंत शेटके ,तानाजी जाधव, संभाजी पाटील ,डॉक्टर एम सी पाटील ,प्रकाश पाटील पाचुंब्री, विश्वास पाटील ,बाबाजी चव्हाण, बजरंग कुंभार ,महेश साळुंखे पिनू पाटील ,शा...

भूमीपूजन समारंभ संपन्न.

Image
  जि. प. सदस्या सौ. आशाताई  झिमुर यांचे हस्ते भूमीपूजन समारंभ संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. वाकुर्डे मतदार संघातील घागरेवाडी येथे गेली ३० वर्ष स्मशानभूमीचा प्रश्न  प्रलंबित होता. जि. प. सदस्या सौ. आशाताई विजय झिमुर  यांच्या अथक प्रयत्नाने तो योजनेतून पूर्ण होणार आहे. याबद्दल   ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. या कामाचे भूमीपूजन जि.प सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. उषा गागरे, उपसरपंच सौ. लक्ष्मी घागरे, ग्रा. सदस्य मारूती घागरे, वैजयंता खोचरे, राजू पाटील, मनस्वी ग्रुपचे सूर्यकांत गायकवाड, रोहीत झिमुर व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिराळा तालुका प्रवासी संघामार्फत शिराळा रा. प. आगार व्यवस्थापकांना निवेदन.

Image
शिराळा तालुका प्रवासी संघामार्फत  शिराळा रा. प. आगार व्यवस्थापकांना  निवेदन. शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.) शिराळा तालुक्यातील मुंबईकर तसेच स्थानिक प्रवाशांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन, शिराळा रा. प. आगार व्यवस्थापिका श्रीमती विद्या कदम यांना सादर करण्यात आले. शिराळा तालुका प्रवासी संघामार्फत देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये, एसटी महामंडळाच्या प्रचलित वाहतूक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.  सर्व सोयींनी युक्त अशा आरामदायक गाड्या पुरविणे, एसटी रिझर्वेशनची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, स्थानिक गाड्यांच्या फे-या वाढविणे तसेच एसटी वाहतुकीच्या वापर वाढण्याबाबत युध्दपातळीवर जनजागृती करणे अशा बहुविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिराळा रा. प. आगार प्रशासनाने शिराळा- पाडळी- अंत्री- शिरशी- वाकुर्डे- येळापूर- शेडगेवाडी फाटा- कराडमार्गे मुंबई गाडी सुरु करण्याबाबत, तसेच उपरोक्त मागण्यांच्या पुर्ततेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.  याप्रसंगी वाहतूक नियंत्रक सद्दाम मुल्ला, चालक- वाहक आणि प्रवासी उपस्थित होते. सदर निवेदनावर, प्रणव सुतार, उत्तम स...

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ संपन्न.

Image
  आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ  संपन्न. शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.) काळुंद्रे (ता. शिराळा) : येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा नेते विराज नाईक यांचा सत्कार, कोरोना महामारी काळात आदर्श काम केल्याद्दल कोकरूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तसेच अंगणवाडी सेविका व मदतीनस, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, भाजी विक्रेते, शिक्षक, किराना दुकानदार, पोस्टमन यांचा सन्मान, गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रमण खबाले, वकील झाल्याबद्दल निलम पाटील यांचा सत्कार झाला. अंगणवाडी सेविका व मदतनिस, अशा स्वयंसेविकांना साडी स्वरुपात भेट वस्तू देण्यात आल्या. दरम्यान 25/15 योजनेतून मंजूर झालेल्या दहा लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत ते कालेकर पाणंद पर्यंतचा काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ तर, आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या 12 लाख खर्चाच्या उबाळेवाडी व वरची गल्लीतील ...

धोत्रेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटी ची मिटिंग संपन्न.

Image
  धोत्रेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटीची मिटिंग संपन्न. कासेगाव  - प्रतिनिधी.( उमेश कांबळे)  सांगली जि.प माजी अध्यक्ष आपले लाडके युवा नेते देवराज पाटील(दादा) यांच्या अध्यक्षतेखाली  धोत्रेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटीची मिटिंग संपन्न  झाली यावेळी आदरणीय दादांनी,  आगमी जि.प, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक साठी बुध कमिटी मजबूत करून पक्षाला सर्व निवडणूकीत चांगल यश कस मिळवता येईल या साठी मार्गदर्शन केले , तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झालेबद्दल आदरणीय आपले लाडके नेते देवराज पाटील (दादा) व पोपट जगताप (आबा) यांचा सत्कार ग्रामस्थ व ग्रामपंचायत याच्या वतीने करण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच व डे.सरपंच तसेच  रामभाऊ माळी(भाऊ),प्रदीप माने (आबा),शंकरराव जाधव (दादा),वसंत माने,गणपती जाधव, (आप्पा),बाळकृष्ण जाधव,वंसत माळी, वनिता माळी, जालिंदर जाधव,आनिल माने,किरण सावंत,सुभाष यादव बळीराम माने, गुणवंत माने, दिनकर माने ,संजय माळी, तात्या पवार, हबीराव जाधव, संभाजी माने ,संजय जाधव,शैलेश जाधव,महादेव जाधव, व राजेंद्र खंडागळे ,सर्जेराव माळी ...