वडगाव हवेली येथे उमेद अभियाना अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.
वडगाव हवेली येथे उमेद अभियाना अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कार्वे - प्रतिनिधि.(प्रवीण पाटिल.)
शासनाच्या उमेद अभियान अंतर्गत काम करीत असलेल्या येथील नवदुर्गा महिला ग्रामसंघाच्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळावा व महिलांसाठी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
शासन आज महिला साक्षमीकरणासाठी विविध स्तरावर काम करत आहे.बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बचतीबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधनेसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
येथील नवदुर्गा महिला ग्रामसंघा च्या वतीने कोरोना नियमांचे पालन करत परिसरातील महिलांचा मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, दांडिया आदी स्पर्धांमधून महिलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रदूषण नियंत्रण काळाची गरज, मुलगी वाचवा देश वाचवा, स्वच्छता अभियान, निसर्गाची देणगीतसेच कोरोना योध्याचा लढा, कोरोना सुरक्षा साधनांचा वापर अस्या अनेक सामाजिक विषयांवर महिलांनी रांगोळी द्वारे तर पाककले तुन शरीराला लागणाऱ्या पौष्टिक आहारा साठी कमीत कमी खर्चात घरच्या घरी विविध प्रकारची धान्य वापरून चविष्ट व रुचकर खाद्य पदार्थातून सकस आहार कसा मिळेल हे दाखवून दिले.
यावेळी महिलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपसरपंच राजेंद्र थोरात, उमेद अभियान च्या आर्थिक साक्षरता सखी सिमा निकम, कार्वे च्या बचत गट प्रेरीका स्वाती मुळीक, वडगांव हवेली बचत गट प्रेरीका सुजाता जगताप, संघाच्या अध्यक्षा शुभांगी जगताप, सचिव रेश्मा जगताप, कोशाध्यक्षा मीनाक्षी जगताप,अस्मिता थोरात, भारती कुंभार माया जगतापआदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या. स्वागत व सूत्रसंचालन रेश्मा जगताप यांनी तर आभार सुजाता जगताप यांनी मानले.
Comments
Post a Comment