आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ संपन्न.

 आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ  संपन्न.

शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)

काळुंद्रे (ता. शिराळा) : येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा नेते विराज नाईक यांचा सत्कार, कोरोना महामारी काळात आदर्श काम केल्याद्दल कोकरूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तसेच अंगणवाडी सेविका व मदतीनस, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, भाजी विक्रेते, शिक्षक, किराना दुकानदार, पोस्टमन यांचा सन्मान, गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रमण खबाले, वकील झाल्याबद्दल निलम पाटील यांचा सत्कार झाला. अंगणवाडी सेविका व मदतनिस, अशा स्वयंसेविकांना साडी स्वरुपात भेट वस्तू देण्यात आल्या. दरम्यान 25/15 योजनेतून मंजूर झालेल्या दहा लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत ते कालेकर पाणंद पर्यंतचा काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ तर, आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या 12 लाख खर्चाच्या उबाळेवाडी व वरची गल्लीतील रस्ता काँक्रीटीकरण कारणे या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘विश्वास’चे संचालक संभाजी पाटील, शिवाजी पाटील व तानाजी वनारे, तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी, माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव पाटील, सरपंच विजय पाटील, सुहास पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, मांगल्याचे माजी सरपंच राहूल पवार, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, पाचगणीचे सरपंच शंकर पाटील, मानेवाडीचे उपसरपंच कृष्णा माने, आरळ्याचे उपसरपंच सदाजी पाटील, कोंडीबा चौगुले, मोरेवाडीचे सरपंच अशोक डिगे, कुसळेवाडीचे संभाजी मस्कर, खराळेचे सरपंच प्रकाश बनसोडे, काशीदवाडीचे माजी उपसरपंच सखाराम काशिद, बोरगेवाडी उपसरपंच टी. डी. चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष डफळे, मोहरेचे भगवान पाटील, मणदूरचे बाळासो पाटील, अस्वलवाडीचे सरंपच शिवाजी खोत. ॲड. महेश शेडगे, युवराज पाटील, बेरडेवाडीचे महेश बेरडे, सुधिर पाटील, आनंदा पाटील, रामचंद्र देसाई, गणपती पाटील, मारुती कालेकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .